Maharashtra Assembly Election 2024 Live : भाजप पदाधिकाऱ्यांचा मतदानाच्या दिवशीच अमित ठाकरेंना पाठिंबा, 'राज' काय?
Maharashtra Election Exit Poll Results 2024 Live Updates महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं असून आता सरकार कुणाचं येणार यावर सर्वांचं लक्ष आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra Assembly Election 2024 Exit Poll: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी काल (20 नोव्हेंबर) मतदान पार पडलं. ज्यानंतर आता वेगवेगळे एक्झिट पोल समोर येत आहेत. त्यामुळे कोणत्या एक्झिट पोलचा नेमका अंदाज काय आणि कोणाला किती जागा मिळू शकतात याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील यंदाची निवडणूक ही पूर्णपणे वेगळी ठरली आहे. कारण पहिल्यांदाच प्रमुख सहा पक्ष हे विधानसभेच्या रिंगणात उतरले होते. अशावेळी राज्यातील जनतेचा नेमका कौल कुणाला आहे हे आपण एक्झिट पोलच्या माध्यमातून जाणून घेऊया. जाणून घ्या या एक्झिट पोलचे क्षणाक्षणाचे अपडेट.
ADVERTISEMENT
- 12:43 PM • 21 Nov 2024
परळीमध्ये पुन्हा धनंजय मुंडे यांचाच बोलबाला? काय सांगतायत एक्झिट पोल?
परळी वैजनाथ : मराठवाड्यात सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या जागांपैकी एक जागा म्हणजे परळी वैजनाथ मतदारसंघ. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली. तर राजेसाहेब देशमुख हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मैदानात होते. या मतदारसंघात पुन्हा एकदा धनंजय मुंडेच विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
- 11:21 AM • 21 Nov 2024
Maharashtra Election 2024 Live : भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मतदानाच्या दिवशी अमित ठाकरेंना पाठिंबा, 'राज' काय?
राज्यात चर्चेत असलेल्या असणाऱ्या मतदारसंघामध्ये दादर-माहीम हा मतदारसंघ आहे. ज्यामध्ये शिवसेना (UBT) चे महेश सावंत हे विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असं झाल्यास ते खऱ्या अर्थाने जायंट किलर ठरू शकतात. कारण याच मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमित ठाकरे यांच्या विजयासाठी काही गणितं राज ठाकरेंनीही बांधली असल्याचं कळतंय. कारण ऐन मतदानाच्या दिवशी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मनसेला पाठिंबा दिला.
- 10:26 AM • 21 Nov 2024
Maharashtra Election 2024 Live : कोपरी-पाचपाखडीमधून पुन्हा एकनाथ शिंदे जिंकणार?
ठाणे जिल्ह्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसं. या मतदारसंघावर सध्या राज्याचं लक्ष लागून आहे. काही दिवसांपूर्वी राज्याच्या पहिल्या फळीत थेट मुख्यमंत्री म्हणून एन्ट्री शिंदेंनी अनेकांना धक्का दिला होता. याच एकनाथ शिंदेंचा हा मतदारसंघ. या कोपरी-पाचपाखाडी हा मतदारसंघ बालेकिल्ला असून, तेच पुन्हा येथून निवडून येतील असा अंदाज सर्व्हेत वर्तविण्यात आला आहे.
- 10:02 AM • 21 Nov 2024
फडणवीसांच्या मतदारसंघात कुणाची ताकद जास्त? बाजी कोण मारणार?
राज्यातल्या चर्चेतल्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा हा मतदारसंघ. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला मतदारसंघ मजबूतपणे बांधला आहे. त्यामुळे नागपूर द. प. मतदारसंघातून पुन्हा फडणवीस विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांच्याशी त्यांचा सामना झाला.
ADVERTISEMENT