Maharashtra Assembly Session Live Updates : परभणी आणि बीडमधील प्रकरणाचा मुद्दा सभागृहात, कोण काय म्हणालं?
Maharashtra Assembly Winter Session Live Updates : राज्याच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. कालच नागपुरात महायुतीच्या 39 मंत्र्यांचा शपथविधी काल पार पडला. यामध्ये काहींचा पत्ता कट झाला तर काही नव्या लोकांना संधी मिळाली. त्यानंतर अजूनही गृहखातं कुणाला मिळणार याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. तर आज अधिवेशनात काय चर्चा होणार यावर राज्याचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra Assembly Winter Session Live Updates : राज्याच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परभणीमधील घटनांवर तसंच बीडमधील संतोष देशमुख प्रकरणावर सभागृहात काय चर्चा होणार यावर सर्वांचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT
कालच नागपुरात महायुतीच्या 39 मंत्र्यांचा शपथविधी काल पार पडला. यामध्ये काहींचा पत्ता कट झाला तर काही नव्या लोकांना संधी मिळाली. त्यानंतर अजूनही गृहखातं कुणाला मिळणार याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे.
महाराष्ट्रातील सर्व घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत राहा... 'मुंबई Tak'
Maharashtra Cabinet : शपथविधी घेताच वाढवली मंत्र्यांची धाकधूक? शिंदे-फडणवीसांनी अडीच वर्षाबद्दल केलं सूचक वक्तव्य
ADVERTISEMENT
- 11:33 AM • 16 Dec 2024
Maharashtra Politics Live Updates : "परभणी आणि बीडच्या घटनांमुळे राज्यात हाहाकार"
आज स्थगन नाहीये हे मला माहिती आहे. पण राज्यात बीड आणि परभणीत घडलेल्या घटना या सरकार आल्यानंतर घडल्या आहेत. काल परभणीमध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता मृत्यूमुखी पडला असं नाना पटोले म्हणत असतानाच राहुल नार्वेकर यांनी आज शोकप्रस्ताव आहेत, स्थगन नसणार असं म्हटलं. पुढे पटोले म्हणाले, बीडच्या घटनेमुळे राज्यात हाहाकार माजला आहे. ही गंभीर बाब आहे, राज्यात लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने यावर भूमिका मांडावी असं पटोले म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, संविधानाचा अपमान कोणीच करु नये. ज्याने अपमान केला, तो मनोरुग्ण आहे. त्याच्यावर कारवाईही झाली आहे. अशी एखादी घटना घडल्यानंतर संविधानिक पद्धतीनं प्रतिक्रिया उमटल्या पाहिजेत. विरोधी पक्षानेही राजकारण न करता, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी भूमिका घेतील असं फडणवीस म्हणाले. - 10:32 AM • 16 Dec 2024
Maharashtra Politics Live Updates : बीडच्या डिघोळ अंबामध्ये रास्तारोको, संतोष देशमुख प्रकरणावरुन आक्रमक
बीड जिल्ह्यातील डिघोळ अंबा येथे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणी येथील न्यायालयीन कोठडीत झालेला युवकाचा मृत्यू या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ डिघोळ अंबा येथील गामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन कर्त्यांकडून सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी पोलीस प्रशासनाला ग्रामस्थांच्या वतीने मागण्याचे निवेदन देण्यात आले. वाहनांच्या दोन्ही बाजुंनी रांगा लागल्या होत्या. - 10:03 AM • 16 Dec 2024
Maharashtra Politics Live Updates : अजित पवारांच्या किती आमदारांना मंत्रिपद?
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी
- हसन मुश्रीफ
- धनंजय मुंडे
- दत्तात्रय भरणे
- आदिती तटकरे
- माणिकराव कोकाटे
- नरहरी झिरवाळ
- मकरंद पाटील
- बाबासाहेब पाटील
- इंद्रनील नाईक (राज्यमंत्री)
- 09:43 AM • 16 Dec 2024
Maharashtra Politics Live Updates : भाजपने 'या' मंत्र्यांचा पत्ता केला कट
भाजपने 'या' मंत्र्यांचा पत्ता केला कट
- सुरेश खाडे
- विजयकुमार गावित
- रवींद्र चव्हाण
- सुधीर मुनगंटीवार
भाजपने चार दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही. ज्यापैकी सुधीर मुनगंटीवार यांचं नाव नसणं हे अनेकांसाठी धक्कादायक असल्याचं बोललं जात आहे. कारण सुधीर मुनगंटीवार हे राज्यातील भाजपमधील बडं प्रस्थ मानलं जात होतं. मात्र, त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान न देऊन फडणवीसांनी सूचक असा संदेशही दिला आहे.
- 09:15 AM • 16 Dec 2024
Maharashtra Assembly Session Live Updates : पहिल्या दिवशी कोणते मुद्दे गाजणार?
राज्याच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परभणीमधील घटनांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये काय चर्चा होणार यावर सर्वांचं लक्ष असणार आहे, बीडमध्ये संविधानाच्या प्रतिकृती विटंबना केल्यानंतर काही दिवसांपासून वातावरण तणावपूर्ण आहे. तर दुसरीकडे बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर काहीसं तणावाचं वातावरण आहे. या मुद्द्यावरुनही आमदार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT