Maharashtra Assembly Election 2024 LIVE : दुसऱ्या यादीबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी बातमी...
Maharashtra Election Live Updates : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
Maharashtra Assembly Election 2024 LIVE News and Updates in Marathi : महायुतीच्या जागवाटपाच्या मुद्यावर अंतिम तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार आहेत. कालचा त्यांचा दौरा रद्द झाला होता, मात्र आज ते पुन्हा राजधानीत जाणार असून उपुमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
ADVERTISEMENT
राज्यात मविआ आणि महायुती च्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे पक्ष , काँग्रेस, राष्ट्रवादी , शरद पवार पक्ष यांना प्रत्येकी 85 जागांचे वाटप निश्चित करण्यात आल्याची माहिती तर उर्वरित 33जागांसाठी पुन्हा चर्चा करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेसमधून तीव्र नाराजी आहे.
अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
- 10:08 PM • 24 Oct 2024
Maharashtra assembly election 2024: भाजपची दुसरी यादी उद्या येणार...
BJP Second list of Candidate: 'उद्यापर्यंत एक आमची यादी येईल. जागावाटप चर्चा सकारात्मक झाली आहे. 10 जागांवर चर्चा बाकी आहे लवकरच ते पण आम्ही चर्चा करून फायनल करू. जागावाटप फॉर्म्युला 10 जागांवर चर्चा पूर्ण झाल्यावर सांगितला जाईल. 288 पैकी 10 जागा उरल्या आहे म्हणून तणाव कमी झाला आहे.' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
- 03:57 PM • 24 Oct 2024
बीडमध्ये भाजपला मोठा झटका
बीडमध्ये भाजपाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते रमेशराव आडसकर यांनी तुतारी हाती घेतली आहे. त्यामुळे आता माजलगाव मतदार संघातून रमेश आडसकर तुतारी चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
- 01:49 PM • 24 Oct 2024
Maharashtra Assembly Election 2024 : महाविकास आघाडीकडून माजी सुभाष भोईर यांनी भरला उमेदवारी अर्ज
डोंबिवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कल्याण ग्रामीण मतदार संघाकडून सुभाष भोईर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. गुरुवारी 24 तारखेला भोईर यांनी डोंबिवली पूर्वेकडील बालाजी मंदिर येथे तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज भरण्याकरता निघाले. तेथून पाथर्ली येथून घरडा सर्कल येथून क्रीडा संकुल येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी सामील झाले होते.
- 01:48 PM • 24 Oct 2024
Maharashtra Assembly Election 2024 : वरळीत आदित्य ठाकरेंचं मोठं शक्तिप्रदर्शन! थोड्याच वेळात अर्ज भरणार
आदित्य ठाकरे हे वरळी मतदार संघातून अर्ज भरणार आहेत.
- 12:47 PM • 24 Oct 2024
अनेक लोक तिकीटसाठी दिल्लीला गेले, परंतु आमच्या पक्षात दिल्लीला जायची गरज नाही- सुप्रिया सुळे
“अनेक लोक तिकीटसाठी दिल्लीला गेले, परंतु आमच्या पक्षात दिल्लीला जायची गरज नाही. हर्षवर्धन पाटील महाराष्ट्र राज्याचे नेते आहेत, शरद पवार हे हर्षवर्धन पाटील यांचा विचारविनिमय करून निर्णय घेत होते. हर्षवर्धन पाटील यांना राज्यात प्रचार करायचा आहे. ही निवडणूक राज्याची महत्वाची आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
- 12:44 PM • 24 Oct 2024
Maharashtra Assembly Election 2024 : माझ्यावर एक रुपयाचा भ्रष्टाचार असेल तर मला फासावर लटकवा- वैभव नाईक
“आज तुम्ही माझ्यासाठी भर उन्हात बसला आहात, मी तुमचे ऋण कधी विसरणार नाही. 50 खोके मंत्री बघून मी नाही गेलो. मला अनेक ऑफर होत्या. माझ्यावर एक रुपयाचा भ्रष्टाचार असेल तर मला फासावर लटकवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत झालेला भ्रष्टाचार मी बाहेर काढला,” असं वैभव नाईक म्हणाले.
- 11:54 AM • 24 Oct 2024
Maharashtra Assembly Election 2024 : एकनाथ शिंदेंचा ‘या’ जागांना नकार, महायुतीची Amit Shah यांच्याबरोबर बैठक का होतेय?
- 11:24 AM • 24 Oct 2024
Maharashtra Assembly Election 2024 : धनंजय मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल
परळी विधानसभा मतदारसंघासाठी धनंजय मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नाथरा या मूळ गावातून धनंजय मुंडे यांनी दौऱ्याला सुरुवात केली. आई रुक्मिणी व स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांच्या समाधी भवनावर नतमस्तक झाले आहेत. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथ गडावर जाऊन धनंजय मुंडे हे समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यासोबतच धनंजय मुंडे परळीतील पंडिता अण्णा यांच्या समाधी स्थळाकडे रवाना झाले आहेत.
- 11:24 AM • 24 Oct 2024
Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीचे उमेदवार सुनील शेळके आज उमेदवारी अर्ज करणार दाखल
मावळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील शेळके आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आज तुकोबांचं दर्शन घेऊन आज उमेदवारी अर्ज भरणार आहे. भाजप नेते वेठीस धरत आहेत. ही चुकीची पद्धत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तोडगा काढतील, असेही सुनील शेळकेंनी म्हटले.
- 11:22 AM • 24 Oct 2024
Maharashtra Assembly Election 2024 : सुलभा गायकवाड आज दाखल करणार उमेदवारी अर्ज
कल्याण पूर्वेमध्ये भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांच्याकडून मोठे शक्ती प्रदर्शन केले जात आहे. सुलभा गायकवाड या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुलभा गायकवाड यांच्याकडून शक्ती प्रदर्शनाच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
- 11:22 AM • 24 Oct 2024
Maharashtra Assembly Election 2024 : अतुल भातखळकर यांची भव्य रॅली
आमदार अतुल भातखळकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भव्य रॅली काढली. ढोल वाजवत अतुल भातखळकर यांच्या रॅलीत मोठ्या संख्येने लोक सामील झाले. यावेळी जनता एक लाखाहून अधिक मतांनी विजयी करेल, असं अतुल भातखळकर यांनी सांगितलं.
- 10:08 AM • 24 Oct 2024
Maharashtra News : दक्षिण सोलापूरची जागा दिलीप मानेंना जागा सुटण्याची आशा
दक्षिण सोलापूरची जागा शिवसेना ठाकरे गटाला गेल्यानंतरही काँग्रेसच्या दिलीप मानेंना जागा सुटण्याची आशा आहे. फेसबुक पोस्ट करत माजी आमदार दिलीप माने यांनी आशा व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीत सोलापूर दक्षिणची जागा ठाकरे गटाच्या अमर पाटील यांना जाहीर झाली आहे. काल उद्धव ठाकरेंनी अमर पाटील यांना बी फॉर्म देत उमेदवारी जाहीर केलीय. माझा काँग्रेस पक्ष, त्याचे नेतृत्व आणि काँग्रेसच्या विचारधारेवर संपूर्ण विश्वास आहे. आपल्या काँग्रेसचा पारंपरिक सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळणार आहे आणि तो आपणच लढणार आहोत..!, अशी पोस्ट दिलीप माने यांनी शेअर केलीय.
- 09:22 AM • 24 Oct 2024
Maharashtra News : माढ्यात आमदार बबनराव शिंदेचे पुत्र रणजितसिंह शिंदे आज उमेदवारी दाखल करणार अर्ज
विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी माढा येथे आमदार बबनराव शिंदेचे पुत्र जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
- 09:13 AM • 24 Oct 2024
Maharashtra News: राजापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार किरण सामंत आज दाखल करणार उमेदवार
रत्नागिरी- राजापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार किरण सामंत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी पत्नीसह ग्रामदेवतेचे दर्शन घेतले. किरण सामंत यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT