लाइव्ह

Maharashtra Election Date Live Updates: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम! 20 नोव्हेंबरला...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

EC to Announce Maharashtra Election Date News Live:  लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील जनतेचे लक्ष महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे. अखेर आज (15 ऑक्टोबर) दुपारी 3.30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

ADVERTISEMENT

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर... 

ADVERTISEMENT

लाइव्हब्लॉग बंद

  • 05:09 PM • 15 Oct 2024

    Manoj Jarange Patil : आधी आमची बैठक होणार, मग ठरवणार- जरांगे पाटील 

    सरकारने वाईट दिवस आणलेत. आता मैदानात सामना आमच्याशी आहे. बैठक घेऊन ठरवणार. आता आरक्षणाचा विषय संपला. यांनी आपली जिरवली आता आपण यांची जिरवायची. मी त्याच वेळेस सांगितलेलं गुलाल उधळू नका. आरक्षणाच्या विषयात वेळ घालवून उपयोग नाही. निवडणूक झाल्यावर आरक्षणाचा विषय आहे, आता सामना वेगळा आहे. आता म्यानाच्या बाहेर तलवार काढावी लागणार.

  • 04:34 PM • 15 Oct 2024

    Maharashtra Election 2024 Date Live Updates : ईव्हीएम हॅकवर निवडणूक आयुक्त काय म्हणाले? 

    ईव्हीएमच्या 20 तक्रारी आल्या आहेत. या सर्व तक्रारींचे आम्ही निराकारण केले आहे. मतदानाच्या सहाव्या आणि सातव्या दिवशी त्यात चिन्ह पडतात.नवीन बॅटरी तेव्हाच टाकतो आणि ती टाकताना एजंटची साईन घेतो. त्यानंतर ईव्हीएस स्ट्रॉग रूममध्ये जाईल त्यावर डबल लॉक लावला जातो तीव लेयरची सिक्युरीटी लावली जाते. त्यानंतर पोलिंगच्या डीस्ट्रिब्युशनसाठी निघते तेव्हा देखील ही प्रोसेस होते. आणि ही सगळी प्रोसेस व्हिडिओसग्राफी होईल. व्हिडिओसग्राफ झाल्यानंतर मशीन फिल्डवर पोहोचलीत. त्यानंतर मशीनचे नंबर शेअर केले जातात. बुथमध्ये पोहोचल्यावर त्याची चाचणी होते. त्यानंतर संपूर्ण दिवस मतदान झाले. प्रत्येक मत मशीनमध्ये कैद झाली. त्यानंतर मशीन बंद झाल्यानंतर अधिकाऱ्याची सही घेतली जाते. पुन्हा फॉर्म 17 सी दिला, अशा सगळ्या गोष्टी अधिकाऱ्यांच्या समक्ष होतात, असे निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.

  • 04:20 PM • 15 Oct 2024

    Maharashtra Election 2024 Date Live Updates : महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल

    • अधिसूचना- 22 ऑक्टोबर
    • अर्ज भरता येणार- 23 ऑक्टोबर
    • अर्जाची शेवटची तारीख- 29 ऑक्टोबर
    • छाननी- 30 ऑक्टोबर
    • अर्ज मागे घेता येणार- 04 नोव्हेंबर
  • 04:17 PM • 15 Oct 2024

    Maharashtra Election 2024 Date Live Updates : 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना करता येणार अर्ज दाखल

    विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवरांना 29 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. 30 ऑक्टोबरल उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर, 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. यानंतर 20 नोव्हेंबरला राज्यात एका टप्प्यात मतदान होईल आणि 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागेल.  

  • ADVERTISEMENT

  • 04:11 PM • 15 Oct 2024

    Maharashtra Election 2024 Date Live Updates : 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचा शेवचटा दिवस

    महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर, 23 नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल लागतील. 30 ऑक्टोबरला उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार असून 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्रात होणारी ही विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. यावेळी महायुती की महाविकास आघाडी कोण बाजी मारणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 04:07 PM • 15 Oct 2024

    Maharashtra loksabha bypoll election 2024 : नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर 

    2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी ठरलेले काँग्रेसचे आमदार वसंत चव्हाण यांचे 26 ऑगस्ट रोजी अकाली निधन झाले होते. त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक होणार होती. या पोटनिवडणूकीची आता घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

  • ADVERTISEMENT

  • 03:56 PM • 15 Oct 2024

    Maharashtra Election 2024 Date Live Updates : महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक! निकाल कधी?

    महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्याच निवडणूक पार पडणार आहे. तर निकाल हा  23 नोव्हेंबर 2024 ला लागणार आहे

  • 03:52 PM • 15 Oct 2024

    Maharashtra Election 2024 Date Live Updates : लोकसभेप्रमाणे विधानसभेला मतदारांच्या रांगा लागणार नाही

     
    लोकसभेच्या मतदानावेळी मुंबईत काही ठिकाणी रांगा लागल्या होत्या, सुविधांसह संथ गतीने प्रक्रिया झाली. यावेळी मात्र हे होणार नाही. याबद्दल संबंधितांना सक्त आदेश देण्यात आलेले आहे. मतदारांना सुविधा मिळतील, तसेच अन्य प्रकारचे रिसोर्सेसही पुरवले जाणार आहे.

  • 03:49 PM • 15 Oct 2024

    Maharashtra Election 2024 Date Live Updates : महाराष्ट्रात 9 कोटी 63 नागरीक मतदानाचा हक्क बजावणार 

    महाराष्ट्रात एकूण 9 कोटी 63 लाख मतदार आहेत. यापैकी 4 कोटी 97 लाख पुरूष मतदार आहेत. तर 4 कोटी 66 लाख इतक्या महिला मतदार आहेत. तर नवतरुण मतदार 1 कोटी 85 लाख आहेत. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांची सख्या 20 लाख 63 हजार आहेत.

  • 03:49 PM • 15 Oct 2024

    Maharashtra Election 2024 Date Live Updates : महाराष्ट्रातील मतदार संख्या...

    पुरुष मतदार - 4 कोटी 97 लाख 
    महिला मतदार - 4 कोटी 66 लाख
    नवतरुण मतदार 1 कोटी 85 लाख 
    पहिल्यांदाच मतदान करणारे मतदार - 20 लाख 63 हजार

  • 03:47 PM • 15 Oct 2024

    Maharashtra Election 2024 Date Live Updates : 26 नोव्हेंबरआधी महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होणार

    'लोकसभेच्या मतदानावेळी मुंबईत काही ठिकाणी रांगा लागल्या होत्या, सुविधांसह संथ गतीने प्रक्रिया झाली. यावेळी मात्र हे होणार नाही. याबद्दल संबंधितांना सक्त आदेश देण्यात आलेले आहे. मतदारांना सुविधा मिळतील, तसेच अन्य प्रकारचे रिसोर्सेसही पुरवले जाणार आहे.' असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले.

  • 03:31 PM • 15 Oct 2024

    Maharashtra Election 2024 Date Live Updates : सुभाष भांबरे विधानसभा निवडणुकीत उतरण्याची शक्यता

    राजधानी दिल्लीत काल झालेल्या बैठकीत सुभाष भांबरे यांच्या नावाची चर्चा आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर विधानसभा निवडणूकीत नाव चर्चेत.

     

  • 03:24 PM • 15 Oct 2024

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date Live: निवडणुका जाहीर होण्यासाठी उरले फक्त काही मिनिटं!

    महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका आज जाहीर होण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 नोव्हेंबरला मतदान होण्याची शक्यता आहे. तर, 22 नोव्हेंबरला निकाल येऊ शकतात. 23-24 नोव्हेंबरला नवीन विधानसभा अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात दोन टप्प्यांत मतदान होईल असाही अंदाज आहे. 

  • 12:15 PM • 15 Oct 2024

    Maharashtra Election 2024 Date Live Updates : महायुती सरकार न्यायव्यवस्थेलाही जुमानत नाही – वरुण सरदेसाई

    विधानपरिषदेतील 12आमदारांच्या नियुक्तीचे प्रकरण कोर्टात असताना, निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. हा विषय न्यायप्रविष्ट असताना हे सरकार नेमणूक कशी करू शकते? महायुती सरकार न्यायव्यवस्थेलाही जुमानत नाही, हेच यावरुन दिसते, अशी टीका शिवसेना उबाठा गटाचे नेते वरूण सरदेसाई यांनी केली आहे.

  • 12:06 PM • 15 Oct 2024

    Maharashtra Election 2024 Date Live Updates : निवडणुकांची रणधुमाळी, महायुती लोकसभेचा वचपा काढणार?

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date Live:

    • आजपासून राज्यात निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात
    • दुपारी 3.30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
    • महाराष्ट्रात लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती होणार? 
    • लोकसभेनंतर महायुती कमबॅक करणार? 
    • लोकसभेनंतर महायुतीनं कशी बदलली स्ट्रॅटजी? 
    • मविआ लोकसभेतील कामगिरी कायम राखू शकणार?
  • 12:02 PM • 15 Oct 2024

    Maharashtra Election 2024 Date Live Updates : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी

    महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यातच आता  केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद पार पडत असल्याने सर्वांचेच लक्ष त्याकडे लागले आहे. महाराष्ट्रातील निवडणूक यंत्रणेची तयारीही अंतिम टप्प्यात सुरु आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष दिल्लीकडे लागले आहे.

  • 12:00 PM • 15 Oct 2024

    Maharashtra Election 2024 Date Live Updates : महाराष्ट्र विधानसभेची मुदत कधीपर्यंत?

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date Live: महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. पण यंदा हरियाणा विधानसभेची निवडणुकांची घोषणा आधी झाली.

follow whatsapp

ADVERTISEMENT