live blog active
लाइव्ह

Maharashtra Assembly Election 2024 LIVE : मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍यांना पाडा- मनोज जरांगे पाटील

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra Assembly Election 2024 News LIVE  : विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये एकनाथ शिंदे यांच्या एकूण तीन सभा होणार आहेत.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बारामती विधानसभेचे उमेदवार अजित पवार यांचा आज गाव भेट दौरा करत आहेत.

पुण्यात चंद्रकांत पाटलांसह तीन प्रमुख उमेदवारांना नोटीस आली आहे. कोथरूडमधील तिन्ही उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून नोटीस आली आहे. उमेदवारांनी दिलेल्या दैनंदिन खर्चात तफावत आढळल्याने कारणे दाखववा नोटीस आली आहे. महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील, महाविकास आघाडीचे चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना नोटीस पाठवण्यात आली.

ADVERTISEMENT

निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चावर निबंध ठेवण्यासाठी 40 लाख खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. याच खर्चात तफावत असल्याने ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

  • 02:58 PM • 16 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 : मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍यांना पाडा- मनोज जरांगे पाटील

    मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍यांना पाडा, असे थेट वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी येवल्यात केले आहे. मी कोणाचे नाव घेणार नाही मात्र ज्यांनी ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा असाही संदेश दिला. मनोज जरांगे पाटील यांचा सकल मराठा समाज बांधवांना संदेश दिला आहे.

     

  • 02:02 PM • 16 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत शिंदेच उरले?

    • फडणवीस, अजितदादांची शर्यतीतून माघारीची चर्चा
    • फडणवीस, अजितदादांचा शर्यतीत नसल्याचा दावा
    • शिंदेंनी करुन दिली शाहांच्या भाषणाची आठवण
    • विनोद तावडेंनी नवीन चेहरा देण्याची शक्यता वर्तवली

     

  • 01:58 PM • 16 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 : ओबीसी वर्गातील तीनच अधिकारी- राहुल गांधी

     

    राज्यात दलित १५ टक्के आहे. पण ९० अधिकाऱ्यांमध्ये तीन अधिकारी तुमचे आहे. १०० रुपये वाटले जात असतील तर सर्व अधिकारी निर्णय घेतात. दलित एक रुपयाचा निर्णय घेतात. आदिवासी १० पैशाचा निर्णय घेतात. ओबीसी वर्गातील तीन अधिकारी आहे. त्यांना छोटे विभाग दिले आहेत. ओबीसी अधिकाऱ्यांना जोडलं तर ते फक्त पाच रुपयांचा निर्णय घेतात, असे राहुल गांधी यांनी प्रचारसभेत सांगितले.

     

  • 01:07 PM • 16 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 : पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय – राहुल गांधी

     

    “मोदी-शाहंनी महाराष्ट्रातल सरकार चोरलं. मोदी-शाह, अदानींच्या बैठकीत आमदार खरेदीचा प्लान. धामणगाव रेल्वे मतदारसंघात राहुल गांधींची सभा. पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

     

  • ADVERTISEMENT

  • 01:06 PM • 16 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 : 60 जागांपैकी 10 टक्के जागा मुस्लिम समाजाला दिल्या – अजित पवार

     

    “मी यावेळी सोशल इंजिनियरिंग केले. 60 जागांपैकी 10 टक्के जागा मुस्लिम समाजाला दिल्या. विधान परिषदेत अल्पसंख्याक समाजाला एकही जागा नव्हती. त्यामुळे मी लगेच इंद्रिस नायकवाडी यांना आमदार केले. काँग्रेसने पण केले नाही. त्यामुळे सगळ्यांना एका चष्म्यातून बघू नका. मी 10 टक्के जागा महिला, मागासवर्गीय, आदिवासी समाजाला देऊन न्याय दिला” असं अजित पवार म्हणाले.

     

  • 12:34 PM • 16 Nov 2024

    महायुतीने आता मुख्यमंत्री नाही तर विरोधी पक्षनेत्याच्या चेहऱ्यावर चर्चा करायला हवी- बाळासाहेब थोरात

    महायुतीकडे बोलण्यासारख काही नाही त्यामुळे धर्मावर , जातीवर बोलत आहेत अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. महागाई, रोजगारावर ते बोलत नाहीत.

    आम्हाला अगोदर महायुतीचं सरकार घालवायचय, मुख्यमंत्री कोण हे नंतर ठरवू.   महायुतीने आता मुख्यमंत्री पदाचा नाही तर विरोधी पक्षनेत्याचा चेहरा कोण यावर चर्चा करायला हवी असेही थोरात म्हणाले.

  • ADVERTISEMENT

  • 11:32 AM • 16 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 : 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही' अजित पवारांचं मोठं विधान!

    मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्रीपदावरून फडणवीसांपाठोपाठ अजित पवार यांचं हे विधान समोर आलं आहे. निकालानंतर आमदारांची बैठक होईल आणि मग मुख्यमंत्री ठरवू. आम्ही 175 पेक्षा अधिक जागा जिंकणार असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला .

     

  • 10:52 AM • 16 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 : प्रियांका गांधी आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

     

    प्रियांका गांधी आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर… नगर – मनमाड महामार्गाच्या शिर्डीजवळील दौलतबाग परिसरात सभेचं आयोजन… जिल्ह्यातील मविआ उमेदवारांसाठी प्रियंका गांधी यांची सभा…

     

  • 10:40 AM • 16 Nov 2024

    Maharashtra News: भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

     

    पुण्यातील निवासस्थानी माजी राष्ट्रपतींनी केले मतदान. प्रतिभाताई पाटील यांचं वय 89 असून, निवडणूक आयोगाच्या होम वोटिंग उपक्रमानुसार घरीच बजावला मतदानाचा हक्क…

     

  • 10:37 AM • 16 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 : मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक

    मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झाला आहे. कायगाव टोका येथील गोदावरी नदी पात्रावर ठोक मोर्चाचे आंदोलन सुरू आहे. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या पुतळ्यांचं दहन करणार आहेत. पुतळ्याचे दहन करून गोदावरी नदी पात्रात जलसमाधी देणार आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अनेक कार्यकर्ते कायगाव टोका नदी पुलावर एकत्र आलेत.

     

  • 09:59 AM • 16 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 : राज ठाकरे यांच्या आज नाशिकमध्ये दोन सभा

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आज नाशिकमध्ये दोन सभा होणार आहेत. नाशिकच्या सातपूर आणि सिडको मध्ये दिनकर पाटील यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतली राज ठाकरे यांची नाशिक मधली पहिलीच जाहीर सभा होत आहे. नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे नाशकात राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष आहे.

     

follow whatsapp

ADVERTISEMENT