Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, आता 20 नोव्हेंबरला मतदान!
LIVE Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
Maharashtra Assembly Election 2024 News LIVE : महाराष्ट्र विधानसाभ निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ठिकठिकाणी राजकीय नेत्यांच्या सभा होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. तर शरद पवार आणि अजित पवार यांची बारामतीत सभा होणार आहे. या सभेत कोण काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
ADVERTISEMENT
अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
- 05:50 PM • 18 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, आता 20 नोव्हेंबरला मतदान!
महाराष्ट्रात आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून उमेदवारी अर्ज ते प्रचार अशी रणधुमाळी सुरु होती. अखेर आज त्याची सांगता झाली आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील 288 जागांवर मतदान होणार आहे.
- 02:17 PM • 18 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : येवल्यात मंत्री छगन भुजबळांकडून शक्ती प्रदर्शन
येवल्यात मंत्री छगन भुजबळांनी प्रचार रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं. “हे माझं नाहीतर जनतेचं शक्ती प्रदर्शन. ठिकठिकाणी स्वागत करत असल्याने या जनतेच्या प्रेमामुळे निवडणूक मला सोपी जाईल. वीस तारखेला कोणाला न घाबरता, जातीपातीचं राजकारण न करता मतदान करा. पाच वर्षे मी तुमचा सेवक आहे. अर्धा तास वेळ काढून मतदान करा,” असं आवाहन भुजबळ यांनी केलं.
- 02:12 PM • 18 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून दमदाटी करता का?- शरद पवार
भोर मतदारसंघात शरद पवारांनी सभा घेतली. काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटेंसाठी त्यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर ताशेरे ओढले. “तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून दमदाटी करता का? उपमुख्यमंत्रीपदाचा वापर जनतेची काम करण्यासाठी करा,” असं ते म्हणाले.
- 02:03 PM • 18 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : राज ठाकरे आज वडाळ्यातील उमेदवार स्नेहल जाधव यांच्या कार्यालयाला देणार भेट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईतील वडाळ्याचे उमेदबार स्नेहल जाधव यांच्या कार्यालयाला भेट देणार. प्रचाराचा आजच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरे मुंबईत सभा आणि बाईक रॅलीसाठीही उपस्थित असतील. वडाळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून श्रद्धा जाधव तर भाजप कडून कालिदास निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
- 02:01 PM • 18 Nov 2024
Murbad Vidhansabha : भाजपचे उमेदवार किसन कथोरे यांच्या प्रचारासाठी CM शिंदेंची जाहीर सभा
मुरबाड विधानसभेचे महायुतीचे भाजपचे उमेदवार किसन कथोरे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आज पार पडणार आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बदलापुरात आयोजित गौरी हॉल या ठिकाणी सभेसाठी राहणार उपस्थित राहणार आहेत. मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये दुहेरी लढत पार पडत आहे. शरद पवार गटाचे सुभाष पवार तर दुसरीकडे भाजपचे किसन कथोरे यांच्यामध्ये सामना पाहायला मिळणार आहे.
- 01:59 PM • 18 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : AIMIM माजी जिल्हाध्यक्षांच्या घरावर गोळीबार, 3 राऊंड केले फायर
जळगावात एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे. पहाटे ४ वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या २ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर ३ राऊंड फायर केल्याची माहिती समोर आली आहे. अहमद हुसेन शेख यांच्या घराच्या खिडकीला गोळी लागली.
- 01:58 PM • 18 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : बार्शीत शिवसेना शिंदे गटाच्या प्रचार रॅलीवर दगडफेक! दोन महिला जखमी
बार्शीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या प्रचार रॅलीवर दगडफेक करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप सोपल यांच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी केला आहे. ही दगडफेक बनावट असून व्यक्तिगत वादातून हा प्रकार झालेला आहे. या दगडफेकीमध्ये रॅलीतील दोन महिला जखमी झाल्या आहेत.
- 01:57 PM • 18 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : राहुल गांधींचा पंतप्रधान मोदी, गौतम अदानींवर हल्लाबोल!
राहुल गांधी यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून राहुल गांधी यांनी 'एक हैं तो सेफ हैं'या घोषणेच्या माध्यमातून उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दाखवत धारावीच्या मुद्द्यावर निशाणा साधला. राहुल गांधींनी यावेळी एक तिजोरी उघडली, ज्यावर लिहिलेलं होतं 'एक हैं तो सेफ हैं'. या तिजोरीमधून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती यांचा फोटो दाखवला. एकत्र येऊन यांना धारावीचा 1 लाख कोटींचा धंदा सुरू आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT