लाइव्ह

Maharashtra Live Updates: विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई तक

ADVERTISEMENT

New NCW Chairperson apppointed
New NCW Chairperson apppointed
social share
google news

Maharashtra Assembly Election 2024 LIVE : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय मोर्चेंबाधणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जागावाटपाबाबच सर्वच पक्षांमध्ये खलबतं सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर मोठ्या प्रमाणात सुरु आहेत.

अशातच बागझरी येथील दत्त मंदिराचं दर्शन घेऊन धनंजय मुंडे यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. 'ज्याला तुम्ही निर्माण केले त्याला कोणी संपवण्याचे आव्हान देत असेल, तर त्याला 20 नोव्हेंबर रोजी मतातून दाखवून द्या, असं थेट आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर... 
 

ADVERTISEMENT

लाइव्हब्लॉग बंद

  • 03:20 PM • 19 Oct 2024

    विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

    भाजपच्या राष्ट्रीय सचिव, राजस्थानच्या सहप्रभारी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. विजय रहाटकर यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही आपला ठसा उमटवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत.  

  • 10:30 AM • 19 Oct 2024

    ठाकरे-पवार गटात जागावाटपाबाबत वाद नाही - संजय राऊत

    "प्रत्येक आघाड्या निर्माण होतात, तेव्हा जागावाटपांमध्ये कुठेतरी अडतळा निर्माण होतो. भाजप आणि शिवसेना जेव्हा एकत्र होते, तेव्हा त्यांच्यातही असे अडथळे होते. काँग्रेस पक्ष हा खूप मोठा पक्ष आहे. राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही प्रादेशिक पक्ष आहोत. प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय पक्षांनी त्या त्या राज्यांमध्ये स्थान दिलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. ठाकरे आणि पवार गटात जागावाटपाबाबत वाद नाही. शरद पवार गटासोबत असलेले पेच सूटत आहेत. रमेश चेन्निथल्ला आज ठाकरेंची भेट घेणार आहेत", अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  • 09:11 AM • 19 Oct 2024

    पट्टीवडगाव सर्कल मधून प्रचारास प्रारंभ; 2002 ची होणार पुनरावृत्ती!

    पट्टीवडगाव जिल्हा परिषद गटातील बागझरी येथील दत्त मंदिरात दर्शन घेऊन आरती करत धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा शुभारंभ केला आहे. धनंजय मुंडे यांनी सर्वात पहिल्यांदा लढवलेल्या 2002 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा प्रचाराचा शुभारंभ बागझरीच्या याच दत्त मंदिरात दर्शन घेऊन केला होता. धनंजय मुंडेंच्या प्रत्येक निवडणुकीची सुरुवात बागझरी येथील दत्त मंदिराच्या दर्शनाने होत असते.
     

follow whatsapp

ADVERTISEMENT