Maharashtra Assembly Election 2024 LIVE: आदित्य ठाकरेंची मोठ्या पदासाठी निवड
LIVE Who is Maharashtra Chief Minister: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. ज्याबाबतच्या प्रत्येक घडामोडी आणि इतर सर्व अपडेट्स 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
Maharashtra News Live Update: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. पण आता महायुतीचा मुख्यमंत्री कोण? असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. ज्याचं उत्तर आज (25 नोव्हेंबर) मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आता राजधानी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
ADVERTISEMENT
महायुतीचा उमेदवार कोण असणार यावर आज मोदी-शाह हे मोहोर उमटवणार आहे. ज्याची घोषणा ही संध्याकाळपर्यंत केली जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे आता महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय घडतं, उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि राज्यातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 02:51 PM • 25 Nov 2024
Maharashtra News Live Updates: भास्कर जाधव, आदित्य ठाकरेंवर मोठी जबाबदारी
'मातोश्री'वर पार पडलेल्या शिवसेना UBT पक्षाच्या बैठकीत काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. शिवसेना UBT पक्षाच्या वतीने आदित्य ठाकरेंची विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर प्रतोद पदी सुनील प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय भास्कर जाधव यांची शिवसेना UBT गटनेते पदी निवड करण्यात आली आहे.
- 12:31 PM • 25 Nov 2024
Maharashtra News Live Updates: विधानसभा अधिवेशन सूचना
नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांचा शपथविधी तथा नव्या सरकारच्या स्थापनेसाठी विधानसभेचे अधिवेशन विधानभवन येथे बुधवार २७ किंवा गुरुवारी २८ नोव्हेंबर २०२४ रोजी होण्याची शक्यता विधिमंडळ सचिवलयाकडून वर्तवण्यात आली आहे.
- 10:57 AM • 25 Nov 2024
Maharashtra Election Results 2024 live updates: 'नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही'
Nana Patole: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस नेतृत्वाकडे आपला राजीनामा दिल्याचं वृत्त काही वेळापूर्वीच समोर आलं होतं. मात्र, आता हे वृत्त फेटाळून लावण्यात आलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नाना पटोले यांच्या राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले. "नाना पटोले दिल्लीत आहेत पण त्यांनी राजीनामा दिलेला नाही. या निवडणुकीत अनेक ज्येष्ठ नेते पराभूत झाले आहेत. एक प्रक्रिया आहे ती केली जात आहे. त्यामुळे तात्काळ निष्कर्षापर्यंत जायची गरज नाही."
- 09:26 AM • 25 Nov 2024
Maharashtra Chief Minister: मुख्यमंत्री पदाबाबत काही फॉर्म्युला ठरलेला नाही- अजित पवार
Ajit Pawar: 'मुख्यमंत्री पदाबाबत काही फॉर्म्युला ठरलेला नाही. आम्ही तिघे बसू आणि निर्णय घेऊ. वरिष्ठांशी चर्चा करू आणि राज्याला मजबूत तसंच स्थिर सरकार देऊ.' असं विधान अजित पवार यांनी केलं आहे.
- 09:24 AM • 25 Nov 2024
Maharashtra Election Results 2024 Live Updates: थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असतं तर...
Ajit Pawar vs Rohit Pawar: कराडच्या प्रीती संगमावर अजित पवार आणि रोहित पवार आले आमनेसामने.. रोहित पवार दिसताच अजित पवार म्हणाले की, 'दर्शन घे, दर्शन घे माझं... थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असतं तर काय झालं असतं?'
- 09:24 AM • 25 Nov 2024
Who is Maharashtra Chief Minister: एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार?
Eknath Shinde Banner: महायुतीच्या विजयानंतर मुख्यमंत्री कोण होणार या चर्चेला उधाण आले आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर्स मुंबईतील अनेक भागात लावण्यात आले असून, त्यात ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असल्याचे फोटो लावण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का? असा सवाल विचारला जात आहे.
- 09:24 AM • 25 Nov 2024
Maharashtra Election Results Live Updates: कराडमध्ये शरद पवार, रोहित पवार आणि अजित पवार
Sharad Pawar Ajit Pawar and Rohit Pawar: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेचा मुहूर्त कधी लागणार असे असताना कराड येथे शरद पवार, रोहित पवार आणि अजित पवार कराड दौऱ्यावर आहेत. शरद पवार कालच मुक्कामी कराडला आले असून त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली तर पदाधिकाऱ्यांकडून पराभवाची कारणे जाणून घेतली.
आज शरद पवार आठ वाजता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत, यावेळी त्यांच्यासोबत कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब पाटील असणार आहेत. तर अजित दादा थोड्या वेळात मुंबईहून कोल्हापूरला विमानाने जाणार असून तेथून हेलिकॉप्टरने कराडला येणार आहेत. नऊ वाजता ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करतील आणि पुन्हा कराड विमानतळावरून हेलिकॉप्टरने रवाना होतील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT