Maharashtra Assembly Election 2024 Live : PM मोदी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 11 सभांना संबोधित करणार
LIVE Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
Maharashtra Assembly Election 2024 News LIVE in Marathi : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. महायुतीला 90 ते 95 टक्के बंडखोरी रोखण्यात यश आलं. पण महाविकास आघाडीला तितक्या प्रमाणात बंडखोरीला आवर घालता आलं नाही.
माहीममध्ये तिरंगी लढत होणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला नकार दिला. अखेरच्या क्षणी त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट... काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी माघार घेतली. काँग्रेसमध्ये जे काही घडलं, त्यामुळे काँग्रेसचे नेते सतेज पाटील ढसाढसा रडले.
अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
लाइव्हब्लॉग बंद
- 05:36 PM • 05 Nov 2024
PM मोदी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 11 सभांना संबोधित करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 ते 14 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रात सुमारे 11 सभांना संबोधित करणार आहेत. याशिवाय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी सुमारे 20 ते 22 सभांना संबोधित करणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुमारे 18 रॅलींचा प्रस्ताव दिला असून भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी सुमारे 13 रॅलींचा प्रस्ताव दिला आहे.
- 03:20 PM • 05 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 Live : मोठी बातमी! राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मांची नियुक्ती
केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना राज्याच्या पोलीस महासंचलकपदावरून हटवले होते. त्यानंतर गृहविभागाने विवेक फणसाळकर यांना प्रभारी महासंचालक पदाचा प्रभारी कार्यभार सोपविला होता. मात्र आज राज्याच्या पोलीस महासंचालकपदी IPS दर्जाचे अधिकारी असणारे संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- 01:27 PM • 05 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : शरद पवार राजकारणातून निवृत्ती घेणार?
शरद पवारांचे निवृत्तीचे संकेत
"मी खात्री एवढीच देऊ इच्छितो. मी सत्तेत नाही. राज्यसभेत आहे. अजून माझं दीड वर्ष आहे. आता या दीड वर्षानंतर आता राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार करावा लागेल. लोकसभा मी लढणार नाही. कसलीच निवडणूक लढणार नाही. आता किती निवडणुका लढणार? 14 निवडणुका केल्या. आणि तुम्ही असे लोक आहात की कधीच घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडून देताय. त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे. नवी पिढी आणली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलोय. याचा अर्थ समाजकारण सोडलेलं नाही. सत्ता नको. पण लोकांची सेवा आणि काम करत राहणार." - 12:33 PM • 05 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तरची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या हक्काची- विनायक राऊत
"बंटी पाटील यांनी काल दिलेली रिॲक्शन ही योग्यच... कोल्हापूर उत्तरची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या हक्काची होती. दुर्दैवाने आम्हाला मतदारसंघ मिळाला नाही. काँग्रेसला हा मतदारसंघ मिळाला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कोल्हापूरमध्ये आहेत ते या संदर्भातील योग्य तो निर्णय घेतील. राजापूर मत विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी संदर्भात तिन्ही पक्षांच्या नेत्यांची चर्चा झाली होती, वरिष्ठांचा आदेश न पाळता बंडखोरी झाली आहे." असं विनायक राऊत म्हणाले.
- 12:27 PM • 05 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : उद्धव ठाकरेंची पहिली प्रचारसभा कोकणात का? भास्कर जाधवांनी सांगितले कारण...
कोकणी जनता आणि ठाकरे परिवार यांचे अतूट नाते आहे. त्यामुळेच उध्दव ठाकरे यांनी पहिली प्रचार सभा कोकणात घेतली, असे विधान भास्कर जाधव यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उध्दव ठाकरे यांची सभा महत्त्वाची आहे. कोकणातील सर्व उमेदवारांच्या विजयाच्या दृष्टीने उध्दव ठाकरे यांची सभा आमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.पक्षासोबत गद्दारी केलेल्या एकाही खासदार अथवा आमदाराला उद्धव ठाकरे यांनी पक्षात परत घेतले नाही. राज्यातील जनतेची देखील हीच भावना, असे भास्कर जाधव म्हणाले.
- 12:25 PM • 05 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : उद्धव ठाकरे कोल्हापुरात! अंबाबाईचे दर्शन घेऊन फोडला प्रचाराचा नारळ
उद्धव ठाकरे कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. आता लवकरच ते कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी चंद्रहार पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात गर्दी केली आहे.
- 12:25 PM • 05 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : राजकारण फक्त सत्ता आणि निवडणुकीसाठी नाही – शरद पवार
शेती संकटात असेल तर दुसरा जोड धंदा पाहिजे. राजकारण फक्त सत्ता आणि निवडणुकीसाठी नाही, राजकारणाचा वापर लोकांच्या जीवनात झाला तर त्याचा उपयोग आहे , असं शरद पवार म्हणाले. बारामती विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ स्वाभिमान सभेचे शिरसुफळ येथे आयोजन करण्यात आलं होतं, तेथे ते बोलत होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT