लाइव्ह

Maharashtra Assembly Election 2024 Live : महिलांच्या खात्यात खटाखटा 3000 रुपये टाकणार, राहुल गांधींची मोठी घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra Assembly Election 2024 News LIVE in Marathi :  राज्यात विधानसभेची रणधुमाळी असताना सभांचा धडाका सुरु आहे. इंडिया आघाडीची आज मुंबईत पहिली सभा होत आहे. आज संध्याकाळी सहा वाजता मुंबईतील बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा होणार आहे. या सभेला राहुल गांधी, शरद पवार उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत. 

ADVERTISEMENT

त्याचबरोबर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. जाहीरनाम्यात राष्ट्रवादीकडून कोणती आश्वासन दिली जाणार याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पहिल्यांदाच जाहीरनामा प्रसिद्ध होतोय. आज बारामतीत अजित पवार तर मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. 

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर... 

ADVERTISEMENT

  • 12:13 AM • 07 Nov 2024

    महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीच्या ५ गॅरंटी

    • महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३००० रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास.

    • शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन.

    • जातनिहाय जनगणना करणार, ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील.

    • २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत औषधे.

    • बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४००० रुपयांपर्यंत मदत.

  • 07:57 PM • 06 Nov 2024

    महिलांना 3000 रुपये देणार: राहुल गांधी

    महाविकास आघाडीची मुंबईत आज संयुक्त प्रचार सभा पार पडली. ज्यामध्ये भाषण करताना राहुल यांनी मोठी घोषणा केली. जर त्यांचं सरकार राज्यात आलं तर महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३००० रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास दिला जाईल. 
     

  • 03:28 PM • 06 Nov 2024

    सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह आणि नाव याप्रकरणी सुनावणीला सुरुवात

    सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह आणि नावाप्रकरणी सुनावणीला सुरुवात झाली आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करतो आहे, असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. तर त्यांच्याकडून पुरावे मिटवण्याचे काम सुरु असल्याचा आरोप शरद पवार गटाकडून केला गेला आहे. तसेच अजित पवार गट जूने व्हीडीओ वापरतात. तसेच अजित पवारांच्या स्वतःच्या मतदासंघात घड्याळ चिन्हासोबत मजकूर छापत नाहीत, असा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.

     

  • 03:23 PM • 06 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 : सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह आणि नाव याप्रकरणी सुनावणीला सुरुवा

    सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह आणि नावाप्रकरणी सुनावणीला सुरुवात झाली आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करतो आहे, असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. तर त्यांच्याकडून पुरावे मिटवण्याचे काम सुरु असल्याचा आरोप शरद पवार गटाकडून केला गेला आहे. तसेच अजित पवार गट जूने व्हीडीओ वापरतात. तसेच अजित पवारांच्या स्वतःच्या मतदासंघात घड्याळ चिन्हासोबत मजकूर छापत नाहीत, असा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.

     

  • ADVERTISEMENT

  • 03:21 PM • 06 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 : दत्तात्रय भरणे यांच्यासाठी इंदापूरात अजितदादांची सभा

     

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या इंदापूर येथील झालेल्या सभेत आप्पासाहेब जगदाळे आणि पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

     

  • 03:18 PM • 06 Nov 2024

    इम्तियाज यांचा नक्की पराभव करु – अतुल सावे

     

    इम्तियाज जलील यांच्यापुढे आजपर्यंत ताकतवार उमेदवार नव्हता मी यापूर्वी दोन वेळेस निवडणुका जिंकलेलो आहे आताही जिंकेल असे भाजपचे नेते अतुल सावे यांनी म्हटले आहे.

     

  • ADVERTISEMENT

  • 03:18 PM • 06 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राला माझं सांगण आहे की, या राज ठाकरेच्या हातात सत्ता देऊन बघा- राज ठाकरे

    “महाराष्ट्राला माझं सांगण आहे की, या राज ठाकरेच्या हातात सत्ता देऊन बघा. मी विनाकारण बोलत नाही. मी सत्ता न पाहिलेला माणूस नाहीये. मी सत्ता पाहिली आहे. मला कोणत्याही खुर्चीची अभिलाषा नाही. मी तुम्हाला सांगतो राज्यातील एकही तरुण आणि तरुणी हाताला कामाविना राहणार नाही,” असं राज ठाकरे म्हणाले.

     

  • 11:52 AM • 06 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जाहीरनाम्यात नेमकं काय?

    'आमचे उमेदवार असलेल्या सर्व मतदारसंघात वेगवेगळा जाहीरनामा असेल. आमचं व्हिजन काय असेल हे जाहीरनाम्यातून सांगितलं आहे.' असं अजित पवार म्हणाले.

    अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर 

    • बारामतीनं प्रगती आलेख गाठणं हे आमचं 33 वर्षांपासूनचं ध्येय
    • बारामाती प्रगत तालुका बनवण्याचं आमचं ध्येय आहे.
    • फूड प्रोसेसिंग युनिटचं नेटवर्क स्थापन करणार 
    • बारामतीत कर्करोगावर उपचारासाठी रूग्णालय उभारणार
    • बारामतीत लॉजिस्टिक पार्क उभारणार
    • बारामतीत जागतिक दर्जाची क्रीडा अकादमी सुरू करणार
    • अद्ययावत आरोग्य व्यवस्था निर्माण करण्याचा आमचा वादा आहे.
    • दर्जेदार रस्ते आणि पायाभूत सुविधांचा वादा
    • शेतकऱ्यांच्या विकासाचा आमचा वादा आहे. 
    • सामाजिक विकासाचा वादा
       
  • 11:37 AM • 06 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 : लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देणार- एकनाथ शिंदे

    लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देणार… 25 हजार महिलांना पोलीस दलात भरती करणार… निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली.

  • 11:36 AM • 06 Nov 2024

    आज बीकेसीत इंडिया आघाडीची पहिली जाहीर सभा

    मुंबईतील बीकेसीत इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे. बीकेसीतील या सभेत राहुल गांधींची तोफ धडाडणार आहे.  त्यांच्या स्वाभिमान सभेची तयारी सध्या जोरात सुरू आहे. या सभेला मविआचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खर्गे , वर्षा गायकवाड सहीत इतर मान्यवर या सभेला उपस्थित राहणार आहेत. तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात काँग्रेसच्या 5 गॅरंटी आज राहुल गांधी विधान सभा निवडणुकांपुर्वीजाहीर करणार आहेत.

     

follow whatsapp

ADVERTISEMENT