लाइव्ह

Maharashtra Breaking News : अजित पवारांचा बारामती दौरा रद्द! अचानक मुंबईत का झाले दाखल?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra breaking news in marathi : अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचे बारामतीत आयोजन करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार बारामतीत होते. आजही ते बारामती दौऱ्यावर होते. मात्र अचानक अजित पवार हे मुंबईत दाखल झाले, त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

ADVERTISEMENT

यामागील कारण म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. आज अमित शाह हे लालबागचा राजाचे दर्शन घेणार आहेत. तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षांची आज एकत्र बैठक होण्याची शक्यता आहे. यामुळेच अजित पवारांचा बारामती दौरा रद्द करण्यात आला आहे.

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

ADVERTISEMENT

लाइव्हब्लॉग बंद

  • 02:07 PM • 09 Sep 2024

    Maharashtra News : अमित शाह यांनी लालबागच्या राजाचं घेतलं दर्शन

    केंद्रीय गृहमंत्री अमिक शाह दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, मंगलप्रभात लोढा हेही उपस्थित आहेत.

  • 02:03 PM • 09 Sep 2024

    Maharashtra News: ट्रिपल इंजिन सरकारमध्ये कामं होतं नाहीत ही देवेंद्र फडणवीस यांची कबुली- सुप्रिया सुळे

    “कालच्या दिवसात महाराष्ट्र सरकारकडून दोन विधानं आली. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की सरकारमध्ये फाईल गोगलगाईप्रमाणे चालते, हात लावून त्याला धक्का मारावा लागतो. हे देवेंद्र फडणवीस यांचे शब्द आहेत. हा गमतीचा भाग आहे. हात लागल्याशिवाय या सरकारमध्ये फाईल चालत नाही. ट्रिपल इंजिन सरकारमध्ये कामं होतं नाहीत ही देवेंद्र फडणवीस यांची कबुली आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

     

  • 02:03 PM • 09 Sep 2024

    Maharashtra News : 'शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा', दरेकरांनी केली टीका!

    एकीकडे ज्ञानेश्वर महाराव यांच्या उपस्थितीत हिंदू देवतांचा अपमान ऐकायचा आणि दुसरीकडे दर्शनासाठी यायचं हे ढोंग आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

     

  • 08:51 AM • 09 Sep 2024

    Maharashtra News : पश्चिम रेल्वे मार्गावर सहाव्या मार्गिकेमुळे वाहतूक धिम्या गतीने सुरु 

    पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव ते कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात आलेय. या कामामुळे मालाड स्थानकात प्रवाशांना चढण्याउतरण्यासाठी फलाटांच्या दिशेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक मंदावली आहे. सोमवारी लोकल गाड्या 10 ते 15 मिनिटे विलंबाने धावत होत्या.

follow whatsapp

ADVERTISEMENT