Maharashtra News Live : मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर
Maharashtra Live Updates : वाचा देशातील आणि महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या बातम्या, राजकीय घडामोडींबद्दलची माहिती आणि हवामान अपडेट्स लाईव्ह...
ADVERTISEMENT
Maharashtra News Updates : ऐन पावसाळ्यात विधान परिषदेची निवडणूक होत आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीची तयारीही सुरू झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापू लागले आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र विधानसभेची ऑक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची अंदाज आहे. त्यामुळे काही महिनेच राजकीय पक्षांच्या हातात असून, सगळ्यांनीच कंबर कसल्याचे दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपकडून यावर चिंतन सुरू आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीसंदर्भातील रणनीतीवरही काम सुरू केले आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसत आहे. पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघातूनच निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे म्हटले जात आहे.
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मराठा आरक्षणापाठोपाठ आता ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थही आंदोलन सुरु करण्यात आले आहे. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेले आहेत, तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, यासाठी अन्नपाण्याचा त्याग केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण आता आरक्षणाच्या मुद्द्याभोवती फिरताना दिसत आहे.
या सगळ्या संदर्भातील ताजे अपडेट्स आणि विश्लेषण वाचा लाईव्ह ब्लॉगमध्ये....
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 08:48 PM • 20 Jun 2024
अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली कथित मद्य घोटाळ्या प्रकरणात ईडीकडून अरविंद केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर आज दिल्लीच्या राऊन एव्हेन्यू न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे.
- 02:37 PM • 20 Jun 2024
Mahayuti : "अजित दादांमुळे तुमची लंगोट तरी वाचली", महायुतीत उफाळला संघर्ष
रामदास कदमांच्या एका विधानाने महायुतीमध्ये नवा संघर्ष उफाळला आहे. अजित पवार उशिरा आले असते, तरी चालले असते. या कदमांच्या विधानाने राष्ट्रवादीत नाराजी आहे. त्याला अमोल मिटकरी उत्तरही दिले आहे.
रामदास कदम नक्की काय बोलले?
"महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्याने असे निर्णय घेतले नाहीत, असे निर्णय तुम्ही (एकनाथ शिंदे) घेतले. तुम्ही तिघांनी घेतले. देवेंद्र फडणवीसांचे देखील अभिनंदन. तुमचंही अभिनंदन. मागून आलेले आपले दादा... दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं."
"रामदास कदमजी आपण जोरात बोललात. 'मागून आलेले अजितदादा थोडे उशीरा आले असते, तर बरं झालं असतं.' माहितीसाठी सांगतो ते वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली. उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं. दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका", असे पलटवार अमोल मिटकरींनी केला.
- 12:17 PM • 20 Jun 2024
OBC Reservation : "पंकजा मुंडे, महादेव जानकरांना पाडण्यासाठी जरांगेंनी बैठका घेतल्या"
मनोज जरांगे यांच्या मागणीला विरोध करत लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केले आहे.
जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे हे उपोषण सुरू असून, हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केला.
"पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांना पाडण्यासाठी मनोज जरांगे यांनी बैठक लावल्या होत्या", असा गंभीर आरोप हाके यांनी केला.
"मनोज जरांगे यांच्या नादाला लागून कितीतरी तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. व्यवस्थेनं मराठा समाज आणि तरुणांमध्ये संभ्रम निर्माण केला", अशी टीकाही हाके यांनी केली आहे.
- 10:21 AM • 20 Jun 2024
OBC Reservation : प्रकाश आंबेडकरांनी घेतली लक्ष्मण हाकेंची भेटी
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मम हाके यांनी आंदोलन सुरू केले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हाके यांची उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली.
महाराष्ट्रात सामाजिक सलोखा राहायला हवा. ओबीसींच्या आरक्षणाचे ताट वेगळेच असले पाहिजे, अशी भूमिका यावेळी आंबेडकरांनी मांडली. आंबेडकरांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- ओबीसींचं आरक्षण अबाधित राहावं. त्यांच्या मागण्याच्या समर्थनार्थ त्यांनी हे उपोषण सुरू केलंय.
- मी त्यांना पाणी पिण्याची विनंती केली आणि ते पाणी घेतील अशी अपेक्षा आहे.
- शासनाने याकडे गांभीर्याने पाहायला पाहिजे. महाराष्ट्रात सामजिक सलोखा राहिला पाहिजे. महाराष्ट्रात मागील 5 वर्षात ओबीसी आणि मराठा समाज अनेक वेळा आमने सामने आलेला आहे.
- आम्ही याची जाणीव शासनाला करून दिलेली आहे, परिस्थिती स्फोटक आहे. ओबीसी समाजातील भीतीला हात घालून चर्चा केली पाहिजे. राजकीय पक्षाच्या नेत्यांना भूमिका घ्यायला पाहिजे.
- आम्ही आमच्या पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळंच असायला पाहिजे. ज्यांना आवश्यकता झालेली आहे, त्यांना मदत कशी करायची हा अधिकार शासनाचा आहे. पण एखादी व्यवस्था प्रस्थापित झालेली आहे, त्यात खुसपूस केल्याने सामाजिक सलोखा बिघडतो. शासनाने ताबडतोब याकडे गांभीर्याने लक्ष घालावे. ओबीसींच आरक्षण ओबीसींनाच असले पाहिजे.
- 09:42 AM • 20 Jun 2024
Uddhav Thackeray : ठाकरे भाजपसोबत जाणार का?
लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच उद्धव ठाकरे भाजपसोबत जाऊ शकतात, अशा चर्चा रंगल्या. नंदुरबारच्या सभेत पंतप्रधान मोदींनीही एनडीएमध्ये या, असे म्हटले होते. त्यानंतर काही नेत्यांनीही ठाकरे भाजपसोबत येतील असे दावे केले.
भाजपसोबत जाण्याच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या (UBT) वर्धापन दिनी भूमिका स्पष्ट केली. भाजपसोबत जायचं का असा सवाल ठाकरेंनी उपस्थित शिवसैनिकांना केला. शिवसैनिकांनी उत्तर दिल्यानंतर ठाकरेंनी यावर भाष्य केले. काय म्हणाले पहा व्हिडीओ
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT