लाइव्ह

Maharashtra Breaking News Live : शिंदेंचे मविआला चिमटे, विधानसभेत विरोधकांवर चढवला हल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
विधानसभेत भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
social share
google news

Maharashtra News Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी गणित जुळवून आणले जात आहेत, तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीचीही तयारी सुरू झाली आहे. 

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न विरोधकांकडून होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे विरोधकांचा आत्मविश्वास दुणावला असल्याचे अधिवेशनात दिसत आहे. 

महाराष्ट्रात पडद्यामागे मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असून, यासंदर्भातील सर्व महत्त्वाची माहिती वाचा लाईव्ह अपडेट्समध्ये...

 

 

लाइव्हब्लॉग बंद

  • 03:51 PM • 02 Jul 2024

    CM Shinde Live : 'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत, असली वाघांसोबत या', शिंदेंची ऑफर

    छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या वाघनखांच्या मुद्द्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटलांना हसत हसत महायुतीमध्ये येण्याची ऑफर दिली. 

    एकनाथ शिंदे म्हणाले, "जयंतरावांनी म्हटलं होतं की, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे कधी आणणार? ब्रिटनच्या म्युझियमशी सामजंस्य करार झाला आहे. लवकरच ही वाघनखे पाहायला मिळतील. जयंतराव, या महिन्यातच वाघनखे मिळतील. त्या वाघनखांचा योग्य वापर आम्ही नक्की करू. ही वाघनखे ठिकठिकाणी दर्शनासाठी ठेवू. जयंतराव, अजून तुम्ही तिकडे नकली वाघांबरोबर आहात. थोडं असली वाघांबरोबर या", असे शिंदे म्हणाले. 

  • 03:29 PM • 02 Jul 2024

    Eknath Shinde Live : शिंदेंचे मविआला चिमटे, विधानसभेत विरोधकांना उत्तर 

    राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. बघा संपूर्ण भाषण...

     

  • 03:24 PM • 02 Jul 2024

    Maharashtra Live: अंबादास दानवेंवर मोठी कारवाई, निलम गोऱ्हेंनी केलं निलंबन

    अंबादास दानवे यांनी काल विधानपरिषदेत प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. ज्यानंतर आता त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.  विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन केलं आहे.

  • 11:49 AM • 02 Jul 2024

    Maharashtra News Updates : 'पक्ष चोरण हे साहेबांचं हिंदुत्व नाही', दिघेंचे मुख्यमंत्री शिंदेंवर टीकास्त्र

    "पक्ष चोरण हे साहेबांचं हिंदुत्व नाही. साहेबांचं हिंदुत्व काय होतं हे आम्ही सांगणार आहोत. त्याची स्पेशल शिकवणी मिंधे गटाला आम्ही लावणार आहोत. एक चित्रपट काढला गद्दारी करायला आता दुसरा चित्रपट काढत आहेत स्वतःची गद्दारी पचवायला! जितक्या लवकर होईल तितक्या लवकर यांच्यापासून सावध व्हा!, असा शब्दात हल्लाबोल ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.

    धर्मवीर 2 या चित्रपटाचे पोस्टर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आले. यामध्ये 'हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही' अशी घोषणा वापरण्यात आली आहे. त्यावरून धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे व ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी शिंदेंना लक्ष्य केले आहे. 

     

     

  • ADVERTISEMENT

  • 10:51 AM • 02 Jul 2024

    Ambadas danve : 'प्रसाद लाडसारखे बाडगे धंद्या पाण्यासाठी...', दानवेंचा पुन्हा चढला पारा

    विधिमंडळाच्या बाहेर माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, "त्यांना जे करायचे ते करू द्या. आता त्यांना कायदे आणि संविधान आठवायला लागले आहे. इतके दिवस त्यांना कायदे त्यांच्या घरची जहागिरी वाटत होती."

    "मी माणूस आहे. समोरच्याचं सहन करायचे का? जो बोट दाखवेल त्याचे बोट तोडायची ताकद आहे. मी बोललो म्हणजे समर्थनच करतोय. मी पळपुटा नाही. मी त्यांच्यासारखा शेपूट घालणारा थोडी आहे."

    "हिंदुत्व वगैरे... प्रसाद लाड सारखे बाडगे लोक शिकवतात. जे धंद्या-पाण्यासाठी जिथे सत्ता आहे तिथे घुसतात. जिथे सत्ता आहे तिथे धंद्यापाण्यासाठी स्वतःच्या कंपन्या, स्वतः व्यवसाय वाढवण्यासाठी घुसतात. तसे आम्ही नाहीये. हे लोक काय हिंदुत्व शिकवणार. त्यांना काय माहितीये हिंदुत्व?"

  • 10:39 AM • 02 Jul 2024

    Maharashtra News live : माझ्या उमेदवारीत फडणवीसांचा फार मोठा वाटा -पंकजा मुंडे

    पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्या आज अर्ज दाखल करणार आहेत. विधानभवनात आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. 

    तुम्हाला विधान परिषदेची उमेदवारी मिळालेली आहे, त्यामध्ये फडणवीसांचा किती वाटा आहे? असा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला होता. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, "ते नेते आहेत आणि तेच निर्णय घेतात. त्यामुळे नक्कीच त्यांचा फार मोठा वाटा आहे."

  • ADVERTISEMENT

  • 10:27 AM • 02 Jul 2024

    Vidhan Sabha live Updates : दानवेंनी माफी मागावी, प्रसाद लाड यांचा ठिय्या

    विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यात सोमवारी खडाजंगी झाली. यावेळी अंबादास दानवे यांनी लाड यांना शिवीगाळ केली. त्याच्या विरोधात आता प्रसाद लाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 

    लाड यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या दिला. दानवे यांनी माफी मागणी अशी प्रसाद लाड यांची आहे. 

    सविस्तर वाचा >> 'भें@&# माझ्याकडे हात...', दानवे-लाड यांच्यात काय घडलं?

     

follow whatsapp

ADVERTISEMENT