लाइव्ह

Maharashtra Breaking News : आजच्या घटनेनंतर बदलापूरमध्ये इंटरनेट ठप्प, नेमकं काय घडतंय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Badlapur Thane School case
बदलापूरमध्ये इंटरनेट ठप्प
social share
google news

Maharashtra breaking news in marathi : कोलकाता येथील डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्या प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टात आज सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने स्वतःहून दखल घेतली असून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. सीबीआयचे वकीलही सुप्रीम कोर्टात उपस्थित राहणार आहेत.

ADVERTISEMENT

उद्या महाविकास आघाडीची बैठक होणार असून समन्वय समितीतील नेते उपस्थित राहणार आहेत. गामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. जागा वाटपाच्या मुद्यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. पोलीस भरती मध्ये लेखी परीक्षा देत असताना मोबाईल द्वारे कॉपी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

ADVERTISEMENT

लाइव्हब्लॉग बंद

  • 09:20 PM • 20 Aug 2024

    बदलापूरमध्ये इंटरनेट ठप्प

    बदलापूर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आज नागरीकांनी रस्त्यावर उतरुन निषेध आंदोलन केले. काही आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात पोहोचून रेल्वे मार्ग रोखून धरला होता. तब्बल 9 ते 10 तास रेल्वे मार्ग रोखून धरण्यात आला होता. या आंदोलनासह शाळेत देखील आंदोलकांनी आंदोलन केले होते. या सगळ्या घटनाक्रमानंतर आता बदलापूरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. 

  • 07:09 PM • 20 Aug 2024

    बदलापूर आंदोलनाचा मध्य रेल्वेला फटका

    बदलापूर आंदोलनाचा मध्य रेल्वेला मोठा फटका बसला आहे.  या आंदोलना दरम्यान मध्य रेल्वेच्या 30 लोकल ट्रेन अंबरनाथ ते खोपोली दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत.
    11 लोकल गाड्या डायव्हर्ट (वळवण्यात) आल्या आहेत. मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी कोयना एक्सप्रेस, व्हाया कल्याण चालवण्यात आली आहे. आतापर्यंत 10 मेल-एक्सप्रेस गाड्या कर्जत-पनवेल-ठाणे स्थानकावरुन वळवण्यात आल्या आहेत. तर अंबरनाथ ते कर्जत रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प आहे.

  • 05:59 PM • 20 Aug 2024

    आंदोलनाला हिंसक वळण! संतप्त जमावावर पोलिसांनी केला लाठीचार्ज

    बदलापूरच्या आदर्श विद्यालयात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानं संतप्त पालकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन केलं. सकाळी ९ वाजल्यापासून बदलापूरच्या नागरिकांनी आंदोलनाला सुरुवात केली. लोकांनी रेलरोको केल्यानं जवळपास ९ तास रेल्वेसेवा ठप्प झाली होती. मंत्री गिरीश महाजन यांनीही आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरुच ठेवलं. त्यामुळे पोलिसांना जमावावर लाठीचार्ज करावा लागला.

    आंदोलनकर्त्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकाला वेढा घालून प्रशासनाला धारेवर धरलं होतं. तसच पोलिसांवरीह नागरिकांनी दगडफेक केली होती. त्यामुळे हे आंदोलन चिघळल्याची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, पोलिसांनी आता आक्रमक भूमिका घेतली असून जमवाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला आहे.

  • 04:08 PM • 20 Aug 2024

    Maharashtra Breaking News : 'दोषींना सोडलं जाणार नाही', बदलापूर प्रकरणावर गिरीश महाजनांनी सांगितलं ठणकावून

    भाजप आमदार गिरीश महाजन बदलापूरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी ते म्हणाले की,  'रेल्वे बंद आहेत, अनेक येणारे जाणारे लोक आहेत. गेल्या ५-६ तासांपासून हे आंदोलन सुरू आहे. शासनाची जी भूमिका आहे ती, आम्ही फास्टट्रॅकमध्ये प्रकरण दिलेलं आहे. शाळेचे मुख्याध्यापक, कर्मचारी यांना निलंबित केलेलं आहे. ज्या पोलिसांनी दिरंगाई केली त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. SIT ची नेमणूक गृहमंत्र्यांनी या ठिकाणी केलेली आहे. मुख्यमंत्री महोदय स्वत: याठिकाणी लक्ष घालत आहेत. शेवटी मला वाटत आहे रेल्वेने येणारे लाखो लोक आहेत त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. जे दोषी असतील त्यातील एकालाही सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई होईल, अशा शब्दात गिरीश महाजनांनी ठणकावून सांगितलं.      

  • ADVERTISEMENT

  • 03:23 PM • 20 Aug 2024

    Badlapur: बदलापुरातील आंदोलकांची आरोपीला फाशी देण्याची मागणी

    बदलापुरमध्ये गेल्या सात तासांपासून रेल रोको आंदोलन सुरू आहे. आंदोलकांकडून आरोपींना फाशी देण्याची मागणी केली जात आहे. 
     

  • 01:08 PM • 20 Aug 2024

    Badlapur Crime : बदलापूरच्या आंदोलनाला हिंसक वळण, संतप्त रेल्वे प्रवाशांची पोलिसांवर दगडफेक!

    बदलापूरच्या आंदोलनाला हिंसक वळण आलं आहे. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे, त्यानंतर पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला आहे. मुंबई- बदलापूरमधील एका शाळेतील चिमुकलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आंदोलन पेटलं आहे.

  • ADVERTISEMENT

  • 12:10 PM • 20 Aug 2024

    Badlapur : लैंगिक अत्याचाऱ्याच्या घटनेमुळं संतप्त नागरिकांचा रेलरोको! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

    बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाऱ्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक करण्यात आला आहे. संतप्त पालकांनी शाळेबाहेर मोर्चा काढला असून रेलरोकोही केला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील अप-डाऊन मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. अंबरनाथ स्थानकापर्यंत रेल्वे सेवा सुरु असल्याची माहिती आहे.

  • 11:00 AM • 20 Aug 2024

    राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात सद्भावना दौड

    माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्ताने कोल्हापुरात सद्भावना दौड होत आहे. दरवर्षी दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या उपस्थितीत ही दौड होत असते. मात्र 31 वर्षात पहिल्यांदाच पी. एन. पाटील यांच्या अनुपस्थित ही दौड होत आहे. शाहू महाराज यांच्या हस्ते सद्भावना दौडला सुरुवात होत आहे.

     

  • 10:48 AM • 20 Aug 2024

    Badlapur Crime News : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात रेल रोको आंदोलन!

    बदलापुरात एका नामांकित शाळेत तीन ते साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पालकांच्या भावना तीव्र आहेत. शाळेच्या गेटवर मोठ्या संख्येने पालक आणि स्थानिक नागरिक जमले असून, ते शाळेतील निष्काळजीपणावर रोष व्यक्त करत आहेत. गुन्हा दाखल होण्यासाठी कुटुंबियांना 12 तास वाट पाहावी लागली होती. अशा परिस्थितीत आता संतप्त बदलापूरकरांनी रेलरोको आंदोलन सुरू केलं आहे.  

  • 09:37 AM • 20 Aug 2024

    Pune News: पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी पोलिसांकडून आणखी दोघांना अटक!

    पुण्यातील कल्याणी नगर येथे झालेल्या पोर्श अपघाताप्रकरणी आणखीन दोघांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ससून रुग्णालयातील रक्त अदलाबदल प्रकरणात अटकेची ही कारवाई करण्यात आली असून आशिष मित्तल आणि आदित्य सूद अशी त्यांची नावे आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली

  • 09:29 AM • 20 Aug 2024

    Mumbai News : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत आज सद्भावना दिवस संकल्प मेळावा

    माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज काँग्रेसच्या वतीने सद्भावना दिवस संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेतही महाविकास आघाडीला दणदणीत विजय मिळवून देण्याचा संकल्प या मेळाव्यानिमित्त केला जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

     

  • 09:20 AM • 20 Aug 2024

    Maharashtra News : बदलापूरमधील नामांकित शाळेत तीन वर्षाच्या दोन मुलींवर अत्याचार

    बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या संतापजनक घटनेनंतर पालक आणि बदलापूरकर शाळेबाहेर ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. "आमच्या मुली इथे सुरक्षित नाहीत" अशी पालकांची भावना असून, त्यांनी शाळा प्रशासनाने मुलींच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

    ◆ शाळेतील तीन ते साडेतीन वर्षांच्या दोन विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पालकांच्या भावना तीव्र आहेत. शाळेच्या गेटवर मोठ्या संख्येने पालक आणि स्थानिक नागरिक जमले असून, त्यांनी शाळेतील निष्काळजीपणावर रोष व्यक्त केला आहे. शाळा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका मांडण्यात आलेली नाही, यामुळे संतप्त पालकांच्या मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. शाळेने मुलींच्या सुरक्षेचं गांभीर्य ओळखून तात्काळ पावलं उचलावीत, असं पालक आणि बदलापूरकर एकमुखाने सांगत आहेत.

    ◆ घटनास्थळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली आहे. पोलिसांच्या उशिरा गुन्हा दाखल करण्यावर नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. पालकांची मागणी आहे की शाळेने पुढे येऊन दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मुलींच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना कराव्यात.

     ◆ बदलापूरच्या आदर्श शाळेतील शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन मुलींवर सफाईचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदाराच्या एका कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. झालेल्या अत्याचारप्रकरणी काल कारवाई करण्यात आली आहे. आदर्श शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थिनींसोबत अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तो कंत्राटदारामार्फत शाळेत सफाईचे काम करीत होता. तसेच या प्रकरणात दडपशाहीचा आरोप ज्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्यावर कारवाई केली असून त्यांची तत्काळ बदली केली आहे. तर दुसरीकडे शाळा प्रशासनाने मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका यांचे निलंबन केले असून, मुलांना ने-आण करणाऱ्या सेविकांना बडतर्फ केले आहे. या घटनेमुळे सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.

follow whatsapp

ADVERTISEMENT