लाइव्ह

Paris Olympic 2024 : भारताने रचला इतिहास, हॉकीमध्ये कांस्यपदक

मुंबई तक

ADVERTISEMENT

paris olympic
paris olympic
social share
google news

Maharashtra breaking news in marathi : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून लवकरच पहिली उमेदवारी यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पहिल्या उमेदवारी यादीत 30 ते 40 उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. त्यानंतर लगेचच राज्यात निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू होईल. साधारण 20 सप्टेंबरच्या आसपास विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच भाजपकडून (BJP) आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली जाऊ शकते, असा अंदाज आहे.

ADVERTISEMENT

या महत्त्वाच्या मुद्द्यांबरोबरच महाराष्ट्र आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

ADVERTISEMENT

  • 07:23 PM • 08 Aug 2024

    भारताने रचला इतिहास, हॉकीमध्ये कांस्यपदक

    भारतीय संघाने हॉकीमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. भारतीय संघाने स्पेनचा 2-1 ने पराभव करत कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात आणखीण एक पदकाची भर पडली आहे. 

  • 05:59 PM • 08 Aug 2024

    उद्धव ठाकरे सोनिया गांधींच्या भेटीला रवाना,काय चर्चा होणार?

    शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे रश्मी ठाकरेंसह सोनिया गांधींच्या भेटीला रवाना झाले आहेत. या भेटीत काय चर्चा होते? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

  • 02:23 PM • 08 Aug 2024

    लाडकी बहीण योजनेवर अजित पवारांचं मोठं विधान

    देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्षे पुर्ण झाली. पण अजूनही महिलांची अवस्था बघा, म्हणून अडीच लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या महिलांना 1500 रुपये देण्याच्या निर्णय घेतला आहे, असे अजित पवारांनी सांगितले आहे. आता जुलै, ऑगस्टचा हफ्ता महिलांना 17 ऑगस्टपर्यंत मिळावा हा आमचा प्रयत्न आहे. यासाठी काल मी 6 हजार कोटींची फाईल वर सही करून आलोय, असे देखील अजित पवारांनी सांगितले. 

    - आम्ही जनतेचे सेवक आहोत. 
    - अनेक उन्हाळे पावसाळे बघितले, 30 वर्ष झाले
    - शेतकऱ्यांना 0 टक्के व्याजाने कर्ज दिले, भरले तर 0 टक्के, नाहीतर 12 % व्याजदर
    - माझी लाडकी बहीण योजना आणली, गावागावात चर्चा सुरू, 
     देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली आहेत. अजूनही महिलांची अवस्था बघा,  म्हणून अडीच लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या महिलांना 1500 रु देण्याच्या निर्णय घेतला आहे. 
    - आमचा प्रयत्न आहे 17 ऑगस्टपर्यंत पहिला हफ्ता जुलै ऑगस्ट ला मिळावा, काल मी 6 हजार कोटींची फाईल वर सही करून आलोय
    - महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो हे तात्पुरते नाही, तुम्ही आम्हाला पाठबळ द्या, सहकार्य द्या हे कायम राहील
    - महाराष्ट्र शासन आर्थिक बाबतीत सक्षम आहे
    - शेवटी राज्य कशाला करायचे असते, सर्वसामान्यांना जीव सुकर होण्यासाठी
    - आमच्यावर टीका करतात, मुलींचे काय, तर सर्व जाती धर्मातील मुलींना 100% फी माफ, 
    - विरोधक टीका करतात,भावांचे काय ?भावांनो तुम्हाला दिलंय, वीजबिल माफ करण्याचा निर्णय,44 लाख शेतकऱ्यांना फायदा,बिल भरायचे नाही, मागचेही द्यायचे नाही,वायरमन आला अजित पवार ने सांगितलंय देऊ नका
     

  • 11:18 AM • 08 Aug 2024

    Paris olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारा स्वप्नील कुसळे मायदेशात!

    पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारा स्वप्नील कुसळे मायदेशात दाखल झाला आहे. स्वप्नील पुणे विमानतळावर दाखल झाला असून ढोल-ताशांच्या गजरात त्याचे स्वागत करण्यात आले.

     

  • ADVERTISEMENT

  • 10:30 AM • 08 Aug 2024

    Nitesh Rane: नितेश राणेंविरोधात आजामीनपात्र वॉरंट!

    नितेश राणेंविरोधात आजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आला आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात नितेश राणे वारंवार न्यायालयात गैरहजर राहत होते. त्यामुळे माजगाव न्यायालयाने हा वॉरंट बजावला.. मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळीही नितेश राणे गैरहजर होते. नितेश राणे यांच्या वकिलांनी हजेरी पासून सूट देण्याची विनंती केली होती. प्रथम वर्ग न्यायदंडाधिका-यांनी ही विनंती फेटाळली. यादरम्यान नितेश राणे यांना अटक टाळण्यासाठी 17 ऑक्टोबरला न्यायालयात व्यक्तिशः हजर राहणं बंधनकारक असणार आहे. 
     

  • 09:00 AM • 08 Aug 2024

    Congress Lok Sabha MP Meeting : दिल्लीत आज काँग्रेस खासदारांची बैठक

    दिल्लीत आज काँग्रेसच्या लोकसभा खासदारांची सकाळी 9.30 वाजता पार्लमेंट एनेक्समध्ये ही बैठक होणार आहे. राहुल गांधी यांनी ही बैठक बोलावलीये. वक्फ बोर्ड विधेयकावर पक्षाच्या खासदारांची ही बैठक बोलवण्यात आलं आहे.

  • ADVERTISEMENT

  • 08:59 AM • 08 Aug 2024

    Vidhan sabha news : विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी निश्चित?

    विधानसभेची भाजपची पहिली यादी जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. निवडणूका जाहीर होण्यापूर्वी भाजप पहिली यादी जाहीर करणार आहे.. पहिल्या यादीत जवळपास 50 जागांवर उमेदवार असतील.. दिल्लीतून लवकरच ही यादी जाहीर होणार आहे.. ज्या जागांवर महायुतीत रस्सीखेच नाही अशा मतदारसंघात उमेदवार जाहीर केले जाणार आहेत..लोकसभेत उशिराने उमेदवार जाहीर केल्याने फटका बसला होता, त्यामुळे विधानसभेत याचा फटका बसू नये म्हणून महायुतीत खबरदारी घेतली जातेय

follow whatsapp

ADVERTISEMENT