Maharashtra News Live Updates : अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ! कोर्टाने सुनावली 14 दिवसांची पोलीस कोठडी
महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला पार पडला. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी फार पडला. मात्र, उर्वरीत मंत्रिमंडळाचा शपथविदी कधी होणार यावर सर्वांचं लक्ष लागून आहे. महायुतीमध्ये मंत्रिमंडळावरुन अजूनही बैठकाच सुरू आहेत. तर दुसरीकडे राज्यात परभणी आणि बीडमध्ये घडलेल्या काही घटनांमुळे वातावरण तापलेलं आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra News Live Updates : मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? कुणाचा नंबर लागणार? यावर सध्या सर्वांचं लक्ष लागून आहे. महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला पार पडला. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी फार पडला. मात्र, उर्वरीत मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार यावर सर्वांचं लक्ष लागून आहे. महायुतीमध्ये मंत्रिमंडळावरुन अजूनही बैठकाच सुरू आहेत. तर दुसरीकडे राज्यात परभणी आणि बीडमध्ये घडलेल्या काही घटनांमुळे वातावरण तापलेलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 05:25 PM • 13 Dec 2024
Allu Arjun Arrest latest News: सुपरस्टार अल्लू अर्जुनला 14 दिवसांची पोलीस कोठडी
पुष्पा 2 फेम अल्लू अर्जुनला संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात हैदराबाद पोलिसांनी आज अटक केली. पुष्पा 2 चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंग दरम्यान चाहत्यांची मोठी गर्दी उसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी अल्लू अर्जुनला नामपल्ली न्यायालयात हजर करण्यात आले होते. नामपल्ली न्यायालयाने अल्लू अर्जुनला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
- 02:53 PM • 13 Dec 2024
Maharashtra Politics Live Update : मला पदमुक्त करा... नाना पटोलेंनी काँग्रेस हायकमांडकडे का केली मागणी?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी आपल्याला सध्याच्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं नेतृत्व चांगलं राहिले नाही आणि त्यामागचे कारण हायकमांडला माहीत आहे, असे त्यांनी नमूद केले. तसंच ते म्हणाले की, मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून ४ वर्षे पूर्ण केली आहेत त्यामुळे मला या पदातून मुक्त होण्याची वेळ आली आहे.
- 01:22 PM • 13 Dec 2024
Maharashtra Politics Live Updates : बांगलादेशमधील हिंदूंवर अत्याचार, ठाकरेंचा केंद्राला सवाल
उद्धव ठाकरे काय काय म्हणाले?
- बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारामुळे आम्ही आमच्या भूमीवर होणाऱ्या बांगलादेशी क्रिकेटपटूंसोबत होणाऱ्या क्रिकेट सामन्याला यापूर्वीच विरोध केला होता.
- बांगलादेशातील इस्कॉन मंदिर जाळण्यात आलं आहे. तरीही बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर आपण मौन बाळगून आहोत.
- याच मुद्द्यावर आमच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींकडे एक मागणी केली होती, पण पीएमओ कार्यालयाकडून आम्हाला अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
- बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांवर संसदेत चर्चा व्हावी अशी आमची मागणी आहे. याबाबत केंद्र सरकारची भूमिका जाणून घ्यायची आहे. या चर्चेसाठी एक दिवस दिला पाहिजे.
- दादर रेल्वे स्थानकाजवळील 80 वर्षे जुने हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस रेल्वेमंत्र्यांनी दिल्याचंही वृत्त आहे. तसंच सिडको मंदिरांच्या जमिनींवर दावा करत आहे. ते केवळ मतांसाठी मंदिराचे राजकारण करत आहेत का? ही मंदिरे कोण वाचवणार?
- वन नेशन वन इलेक्शन लागू करण्याआधी हिंदूंचे प्रश्न सोडवले पाहिजेत. त्यांचे हिंदुत्व फक्त निवडणुकीपर्यंत मर्यादित आहे का? त्यांना देशातील हिंदूंची पर्वा नाही का?
- एक है तो सेफ है असं ते म्हणत होते, पण आपल्या देशात मंदिरे सुरक्षित आहेत का?
- 12:39 PM • 13 Dec 2024
Maharashtra Politics Live Update : "दुसऱ्यांचं घर, पक्ष फोडण्यात भाजपला असुरी आनंद"
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पाच खासदार फोडले जाऊ शकतात अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरच विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला दुसऱ्याचं घर, पक्ष फोडण्याशिवाय चैन पडत नाही. भाजपला यात असुरी आनंद आहे असं वडेट्टीवार म्हणाले आहेत. तसंच अधिवेशनात फार काही निष्पन्न होणार नाही. फुकट कशाला नागपुरला अधिवेशन घेऊन लोकांना त्रास दिला जात आहे? अधिवेशन मुंबई घेतलं असतं तर बरं झालं असत? विदर्भात किमान दोन आठवड्याचं तरी अधिवेशन तरी घायला पाहिजे होत असं म्हणत वडेट्टीवारांनी अधिवेशनाचा कालावधी कमी असल्यानं टीका केली.
- 11:22 AM • 13 Dec 2024
Maharashtra Cabinet Expansion Live Updates : मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेनेमुळे विलंब ?
मंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी शिवसेनेतील आमदारांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय. दिल्लीतील भाजप श्रेष्टींसोबतच्या बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपने एकनाथ शिंदेंकडून मंत्रिपदासाठी नावांची फायनल यादी मागवली आहे. मात्र अद्याप शिवसेनेकडून नावांवर शिक्कामोर्तब झाला नसल्याची माहिती आहे. दोन ते तीन टर्म निवडून आलेल्या आमदारांची संख्या जास्त असल्याने मंत्रिपदासाठी मोठी रांग आहे. तसंच मंत्रिपदाची संधी न मिळाल्यास नाराज आमदारांना सांभाळण्याचं शिंदेंसमोर आव्हान आहे. त्यामुळे आता अडीच-अडीच वर्ष मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर शिंदेंकडून विचार सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामुळे जास्त आमदारांना मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.
- 10:27 AM • 13 Dec 2024
Maharashtra Live Updates Beed Bandha : बीडमध्ये आज बंदची हाक
काही दिवसांपूर्वी बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येमुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. खंडनीच्या वादातून हे प्रकरण घडलं असल्याची शक्यता असून, आरोपींनी अपहरण करुन अमानूष मारहाण करत संतोष देशमुख यांना संपवल्याची माहिती आहे. या घटनेनंतर बीडमध्ये मराठा समाजात संतापाची लाट निर्माण झाली असून, देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर अनेक नेत्यांनी बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यादरम्यान, आज बीड बंदची देखील हाक देण्यात आली आहे. या बंद दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT