Maharashtra News Live Updates : भाजपच्याच राज्यात हिंदू मंदिरे आणि हिंदू धोक्यात, ठाकरेंचा घणाघात
महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला पार पडला. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी फार पडला. मात्र, उर्वरीत मंत्रिमंडळाचा शपथविदी कधी होणार यावर सर्वांचं लक्ष लागून आहे. महायुतीमध्ये मंत्रिमंडळावरुन अजूनही बैठकाच सुरू आहेत. तर दुसरीकडे राज्यात परभणी आणि बीडमध्ये घडलेल्या काही घटनांमुळे वातावरण तापलेलं आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra News Live Updates : मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? कुणाचा नंबर लागणार? यावर सध्या सर्वांचं लक्ष लागून आहे. महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला पार पडला. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी फार पडला. मात्र, उर्वरीत मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार यावर सर्वांचं लक्ष लागून आहे. महायुतीमध्ये मंत्रिमंडळावरुन अजूनही बैठकाच सुरू आहेत. तर दुसरीकडे राज्यात परभणी आणि बीडमध्ये घडलेल्या काही घटनांमुळे वातावरण तापलेलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 04:17 PM • 14 Dec 2024
Maharashtra Politics Live Updates : आदित्य ठाकरे पोहोचण्यापूर्वीच सोमय्या हनुमान मंदिरात दाखल
ज्या उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं होतं. त्यांना हनुमान मंदिराबद्दल बोलण्याचा काय अधिकार असं किरीट सोमय्या म्हणाले आहे. दरम्यान, दादरमधील हनुमान मंदिराचा मुद्दा उपस्थित करत ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली होती. या मंदिराला नोटीस आली होती, मात्र कारवाई स्थगित केल्याचं रेल्वे प्रशासनाने जाहीर केलं आहे. त्यानंतर आता किरीट सोमय्या तिथे पोहोचले असून, त्यांनी आदित्य ठाकरेंच्या दर्शनाला येण्यापूर्वीच तिथे उपस्थिती लावली आहे.
- 04:13 PM • 14 Dec 2024
Maharashtra Politics Live Updates : आदित्य ठाकरेंच्या आधीच लोढा हनुमान मंदिरात, दर्शन घेत केली आरती
- 03:34 PM • 14 Dec 2024
Maharashtra Politics Live Updates : दादरमधील हनुमान मंदिराचा मुद्दा, ठाकरे म्हणाले भाजपचं हिंदुत्व दुतोंडी
आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे घेऊन भाजपच्या काही नेत्यांवर निशाणा साधला आहे. भाजपचं दुतोंडी हिंदुत्व आम्ही उघडं पाडलं, निवडणुका झाल्यावर यांच्याच राज्यात मंदिरं सेफ नसतात. सत्य परिस्थिती ही आहे की, भाजपचं सरकार आल्यावर हिंदू मंदिरे धोक्यात येतात. दादरमधील हनुमान मंदिराच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. मुंबईतील रस्त्यांचा कथित घोटाळ्यावरुन आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. घटनाबाह्य मुख्यमंत्री होते त्यांचा, पालकमंत्री केसरकर आणि लोढांचा यात हात आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. एकनाथ शिंदेंच्या देखरेखीत सुरू असलेल्या घोटाळ्याची चौकशी करा मी म्हणत होतो. पण भाजपला आता जाग आली असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
भाजप सरकार आल्यावर मुंबई महापालिकेला जाग आली सांगितलं की, कचरा गोळा करण्यासाठी फीस लावावी लागेल. हे आजवर कधीच झालं नाही, हे का करता तुम्ही? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. अदानीच्या घशात मुंबई घालण्याचा प्रयत्न केला जातोय. - 11:58 AM • 14 Dec 2024
Maharashtra Politics Live Updates : दादरमधील हनुमान मंदिरात सोमय्या, ठाकरे आमने-सामने येणार?
दादर रेल्वेस्टेशनजवळ असलेल्या एका हनुमान मंदिराला आलेल्या नोटीसवरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी यांनी यावरुन भाजपवर आरोप केले होते. त्यानंतर आज आदित्य ठाकरे 4:30 वाजता तिथे दर्शनासाठी जाणार आहेत. त्यातच आता किरीट सोमय्याही तिथे दर्शनासाठी जाणार असल्याचं म्हटले आहेत. "दादर पूर्वमध्ये आज दुपारी 4 वाजता मी दादर पूर्व हनुमान मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे. आम्हाला विश्वास आहे की, हे मंदिर पाडलं जाणार नाही. रेल्वे अधिकाऱ्यांनी मला आश्वासन दिलं आहे की, ते लवकरच स्पष्टीकरण जारी करतील" असं किरीट सोमय्या म्हणाले. त्यामुळे आता इथे आदित्य ठाकरे आणि सोमय्या आमने-सामने येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
- 11:15 AM • 14 Dec 2024
Maharashtra Politics Live Updates : "कोण मंत्री होणार आणि कुणाला जेलमध्ये टाकायचं, मविआचं सगळं ठरलं होतं"
महाविकास आघाडीला वाटत होता, त्यांचा विजय निश्चित. कोणत्या नेत्याला मंत्रिपद द्यायचं?, कोणतं खातं द्यायचं?, आमच्या कोणत्या नेत्याला तुरुंगात टाकायचं? हे सर्व ठरवलं होतं. पण, जनता समजूतदार आहे, त्यामुळेच मतदारांनी आम्हाला कौल दिला असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. पिपंरी चिंचवडमध्ये बोलताना ते म्हणाले, विरोधक अजूनही हा पराभव मान्य करायला तयार नाहीत. ते आता EVMला दोष देत आहेत. ते लोकांना दुसरं काही सांगू शकत नाही. गेल्या 45 वर्षांत आपण अनेक निवडणुका पाहिल्या आणि लढल्या. आम्हाला कधीच शंका आली नाही. आता आमचाच विजय झाल्यानं विरोधक EVM घोटाळ्याचा आरोप करत आहेत. लोकसभेत आम्ही अपयशी ठरलो. हरियाणा, कर्नाटकात हरलो. पण आम्हाला EVM वर शंका नव्हती. विरोधकांना पराभवाचं कारण सापडत नसेल, तर ते ईव्हीएमवर आरोप करतात असं मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं आहे.
- 10:13 AM • 14 Dec 2024
Maharashtra Politics Live Updates : माझी लढाई अजून संपलेली नाही... चित्रा वाघ असं का म्हणाल्या?
काही वर्षांपूर्वी झालेल्या एका तरूणीच्या आत्महत्येनंतर चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर अनेक दिवस आरोपांची राळ उठवली होती. मात्र आता त्याच संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चांवर चित्रा वाघ यांना सवाल करण्यात आला. यावर त्या म्हणाल्या, त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्लीनचीट दिलेली होती. त्यामुळे त्यांना मंत्रिपद देण्यात आलं असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. पण माझी लढाई अजून संपलेली नाही, यावेळेस काय होते हे पाहू असं म्हणत चित्रा वाघ यांनी आपली भूमिका मांडली.
- 10:09 AM • 14 Dec 2024
Maharashtra Politics Live Updates : दादरमध्ये हनुमान मंदिराचा मुद्दा तापणार? आदित्य ठाकरे आज दर्शनाला जाणार
दादर : रेल्वे स्थानक येथे असलेलं श्री. हनुमानाचे मंदिर हे सुमारे 80 वर्षांपूर्वी बांधलेलं आहे. ह्या मंदिरास अनधिकृत ठरवून केंद्रातील सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने पाडण्यासाठी नोटीस पाठवलेली आहे असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. तसंच हिंदूंची आस्था असलेलं हे मंदिर वाचवणे हे प्रत्येक हिदूचं कर्तव्य आहे. ह्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे आज 14 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी हनुमान मंदिराला भेट देणार आहे.
- 10:01 AM • 14 Dec 2024
Maharashtra Politics Live Updates : "तीन तंगड्या एकमेकांमध्ये अडकून महाराष्ट्राचं नुकसान होणार"
राजा उत्सवात मग्न आहे आणि रस्त्यावर खून पडतायत. गृहमंत्री नाही, आरोग्य मंत्री नाही हे कसलं राज्य? तुम्हाला तुमचे मंत्री ठरवता येत नाही. भाजपला दिल्लीत जावं लागतं. शिंदेंच्या लोकांमध्ये ताळमेळ नाही, अजित पवार स्वत: गडबडलेले आहेत. मला राज्याची चिंता वाटते. बहुमत असलेलं सरकार जर राज्य चालवू शकत नसेल तर या राज्याचं काय होणार? हळूहळू एकएक प्रकरण समोर येईल. कुणालाही मंत्री करा, तीन पक्षांचेच लोक एकमेकांविराधात फाईल आणून देणार, त्या फाईल यायला लागल्या आहेत. तीन तंगड्या एकमेकांमध्ये अडकून महाराष्ट्राचं नुकसान होणार, याच अधिवेशन काळात एखादा स्फोट होऊ शकतो असं म्हणत संजय राऊतक यांनी महायुतीवर निशाणा साधला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT