live blog active
लाइव्ह

Maharashtra News Live : फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळ काय म्हणाले? दिल्लीला जाणार? काय निर्णय घेणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra News Live Updates : राज्याच्या  विधानसभेचं हिवाळी अधिवेशन संपलं असून, खातेवाटपही जाहीर झालं आहे. यानंतर आता पालकमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यंदा एकापेक्षा जास्त इच्छूक असल्यानं संधी कुणाला द्यायची यावरुन तिढा असल्याचं दिसतंय. तर दुसरीसडे छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चांनीही जोर धरला आहे. विशेष म्हणजे छगन भुबजळ लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातंय. ते दिल्लीला जाणार असल्याचीही शक्यता आहे. 

सर्व महत्त्वाच्या घटनांसह राज्य आणि देशातील प्रत्येक घडामोडी आपल्याला जाणून घेण्यासाठी वाचत राहा 'मुंबई Tak'


ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 02:06 PM • 23 Dec 2024

    Maharashtra News Live : संजय शिरसाट मस्साजोगमध्ये, पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर काय म्हणाले?

    मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी मी पोलीस अधीक्षकांना केली आहे असं संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे. पोलीस अधीक्षक यांनी मला शब्द दिला आहे की, आम्ही गुन्हेगारांच्या मार्गावर आहोत, लवकरात लवकर आरोपी अटक करण्यात येतील. 28 तारखेच्या अगोदरच आरोपींना अटक करा असं मी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांना सांगितलं आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि खून प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाठ यांनी बीडचे नवे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांची आज भेट घेतली. 

  • 01:50 PM • 23 Dec 2024

    Maharashtra News Live : राहुल गांधी आज परभणीत

    काँग्रेस नेते राहुल गांधी नांदेडहून 1:16 वाजता कारने परभणीकडे रवाना झाले आहेत. परभणीतील हिंसाचारानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. त्यामुळे राहुल गांधी आज सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी परभणीला रवाना झाले.

  • 12:45 PM • 23 Dec 2024

    Maharashtra News Live : छगन भुजबळ यांच्याबद्दल सवाल, अजित पवारांनी बोलणं टाळलं?

    छगन भुजबळ यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीबद्दल अजित पवार यांना विचारलं असता, त्यांनी हा आमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे असं म्हणत अजित पवार यांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. अजित पवार हे आज पुण्यामध्ये आहेत. सर्व अधिकाऱ्यांशी आज चर्चा केली, मेट्रो, रिंग रोड, वाहतूक समस्यांवर चर्चा केली असं अजित पवार म्हणाले आहेत.

  • 12:34 PM • 23 Dec 2024

    Maharashtra News Live : छगन भुजबळ CM फडणवीसांच्या भेटीनंतर काय म्हणाले?

    छगन भुजबळ यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस आणि भुजबळांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. अनेक मुद्यांवर मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली, सामाजिक, राजकीय मुद्यांवर चर्चा झाली. ओबीसींचं नुकसान होणार नाही असं फडणवीस म्हणाल्याचं भुजबळांनी सांगितलं. तसंच याविषयी 'पुन्हा भेटून मार्ग काढू, असं फडणवीस म्हणाले' 10 ते 12 दिवसात तोडगा काढण्याचं फडणवीसांनी आश्वासन दिलं असं भुजबळ म्हणाले.

follow whatsapp

ADVERTISEMENT