Mumbaitak Baithak 2024 live Updates: मुंबई Tak बैठकीत 'नवरा माझा नवसाचा 2' टीमसोबत दिलखुलास गप्पा!
Mumbaitak baithak 2024 Live News : मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांची तयारी, महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन आणि इतर मुद्द्यावर विचारमंथन... वाचा सगळे लाईव्ह अपडेट्स
ADVERTISEMENT
Mumbaitak baithak 2024 Live News : मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांची तयारी, महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन आणि इतर मुद्द्यावर विचारमंथन... वाचा सगळे लाईव्ह अपडेट्स
ADVERTISEMENT
MumbaiTak Baithak news Live : महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीने वेग घेतला आहे. विविध समाज घटकांतील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताहेत. सत्ताधारी योजना घेऊन मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. तर विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताहेत.
महाविकास आघाडी आणि महायुतीची विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती काय आहे? सत्ताधारी आणि विरोधकांचे महाराष्ट्रासाठी काय धोरणे आहेत? आरक्षणाचा पेच सोडवण्यासाठी आणि ग्रामीण महाराष्ट्रातील समस्यांवर काय आहेत उपाय, यावर होणार मुंबई Tak बैठकमध्ये विचारमंथन... सगळे अपडेट्स वाचा दिवसभर...
ADVERTISEMENT
- 06:04 PM • 12 Aug 2024
मुंबई Tak बैठकीत 'नवरा माझा नवसाचा 2' टीमसोबत दिलखुलास गप्पा!
लोकप्रिय मराठी अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा २ ची प्रेक्षक वाट आहेत. आज मुंबई Tak च्या बैठकीत या टीमसोबत दिलखुलास गप्पा मारल्या. हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटात स्वप्नील जोशीचीही एन्ट्री पाहायला मिळणार आहे.
- 05:53 PM • 12 Aug 2024
Supriya Sule : सरकारच्या योजना या लोकसभेच्या निकालाचा इफेक्ट- सुप्रिया सुळे
'सरकारने काहीच केलं नाही हे म्हणणं बाळबोधपणाचं आहे. आम्ही कुठलीच निवडणूक हलक्यात घेत नाही. सरकारच्या योजना हा लोकसभेच्या निकालाचा इफेक्ट, आम्ही विरोधी बाकांवर असूनही सुखी आहोत.'
- 05:36 PM • 12 Aug 2024
Supriya Sule : 'बारामती शाबूत राहिली तर आयुष्यभर..', मुंबई Tak बैठकीत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
'बारामती आहे म्हणून दिल्ली आहे. बारामती शाबूत राहिली तर आयुष्यभर दिल्लीत काम करू. भूतकाळ बदलू शकत नाही, उद्याचा विचार करू शकते. बारामती लोकसभेतील कुठलेच आमदार सोबत नव्हते. संग्राम थोपटे, संजय जगताप पूर्ण ताकदीने सोबत होते. आम्हाला उद्ध्वस्त करायचं हे अदृश्य शक्तींनी ठरवलं होतं. माझ्याविरोधात जे लढले ते आत्मविश्वासू होते. बजरंग सोनवणे बीडला विमानतळ मागणारे पहिले खासदार आहेत. लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी निवडणुका लढतो. हरले की फेक नरेटिव्ह म्हणणं ही भाजपची स्ट्रॅटर्जी आहे.', असं सुप्रिया सुळे बोलल्या. - 05:22 PM • 12 Aug 2024
Chhagan Bhujbal : जरांगे पाटलांचा सामना कसा करणार?; भुजबळांशी संवाद
'महाराष्ट्रात कुठेही लढाया, मारामाऱ्या होऊ नये. आरक्षण हा काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आरक्षण हे मागास जातींना पुढे आणण्यासाठी आहे. मराठा मागास नाही, हे कोर्टाने सांगितलं. आयोग, कोर्ट काय सांगताहेत, हे पाहायला हवं. ओबीसींना धक्का न लावता आरक्षण द्यायला हवं. पटेल, गुर्जरांची आंदोलनं थांबली, केवळ मराठ्यांची सुरू आहेत. १० टक्के आरक्षण मिळूनही ओबीसीतून मागणी होत आहे. ओबीसी कोट्याच्या १७ टक्क्यांमध्ये ३७४ जाती आहेत. मराठा समाजाला आरक्षण दिलं तर कुणालाच काही मिळणार नाही. मराठा आणि कुणबी एकच हे काही बरोबर नाही ते वेगवेगळे आहेत. मराठा आणि कुणबी ही काही जात आहे का?जरांगेंनी दोन महिने मला शिव्या दिल्या. आरक्षणासाठी सगळी घरं जाळत सुटला आहात. महिला-मुलांना त्रास देण्याची पद्धत छत्रपतींच्या महाराष्ट्रात नाही. जीव घ्यायला उठला असाल तर आम्हाला संरक्षण करावं लागेल. ओबीसी, दलितांच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. लोकसभेची निवडणूक विधानसभेपेक्षा वेगळी असते. मराठा समाजाचे लोकंही निवडणूक लढणारच ना? आरक्षित जागांवरही जरांगेंचे लोकं उभे राहणार.' असं छगन भुजबळ मुंबई तकच्या बैठकीत बोलले.
- 04:45 PM • 12 Aug 2024
Pankaja Munde : जनतेतून निवडून आलेली नसली तरी लोकांचा पाठिंबा- मुंबई Tak बैठकीत पंकजा मुंडेंचं स्पष्ट वक्तव्य
माझ्या पराभवाच्या खूप चर्चा झाल्या, पराभवानंतर जे घडलं त्यामुळं अस्वस्थता झाली. राज्यसभेत गेले असते तर माझी लीडरशीप ग्रो झाली असती. तो संघर्षाचा नव्हे तर शिकण्याचा काळ होता. भाजप पक्ष कुणाच्या मालकीचा नाही, व्यक्तीचा नाही. राजकीयदृष्ट्या मी फ्रंटवर नव्हते. पक्ष, संघटनेचं काम मी जवळून पाहिलंय. जनतेतून निवडून आलेली नसली तरी लोकांचा पाठिंबा आहे.मी लोकांमधील असल्याने विधानपरिषदेत संधी मिळाली. कोणत्याही समाजाच्या व्यासपीठावर गेले नाही. विरोधकांनी माझ्या जातीवरून खोटा प्रचार केला. बदलत्या डायनामिक्सचं मूल्यमापन करायला हवं.टक्केवारी वाढली पण उमेदवारांचा पराभव झाला. राभवाचं विजयात रुपांतर करू.' असं भाजप नेत्या पंकजा मुंडे 'मुंबई Tak बैठक'मध्ये बोलल्या.
- 03:16 PM • 12 Aug 2024
Aaditya Thackeray : मुंबई Tak बैठकीत आदित्य ठाकरेंसोबत दिलखुलास संवाद
'कुणाच्या दु:खात आनंदी व्हावं असे आम्ही नाही. संसदेत आता विरोधकांना आवाज मिळाला. भाजपमधील नाराज नेत्यांनीही आमचं अभिनंदन केलं. लोकसभेतील निकाल हा भाजपची हारच आहे. टीडीपी, जेडीयूला भाजपने संपवण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही जात, पात, धर्म पाहत नाही. वरळीपेक्षा वाराणसीच्या मताधिक्यावर चर्चा व्हायला हवी.' असं यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
- 02:52 PM • 12 Aug 2024
DCM Devendra Fadnavis : पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली तर पवारांना गोल्ड मेडल- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
'फेक नरेटिव्ह एकाच निवडणुकीत चालतो. पवारसाहेब आताही कमीच जागा घेतील. पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली तर पवारांना गोल्ड मेडल मिळेल.' अशा खोचक शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली.
- 02:44 PM • 12 Aug 2024
DCM Devendra Fadnavis : 'आमच्यापेक्षा जास्त अवघड मविआचं', उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला!
महायुतीला विधानसभेत काऊंटर पोलरायझेशनचा फायदा होईल. शिंदेंना जितकी मतं दिली तितकी दादांना देऊ शकलो नाही. पण काळजी करू नका विधानसभेत जागावाटप नीट होईल. ज्याची जेवढी ताकद तेवढ्या त्यांना जागा मिळणार... नवीन अवतारात शिंदे, दादांची पहिली निवडणूक आहे. मागताना जागा प्रत्येकाला जास्तच मागाव्या लागतात. लोकसभेत ताणून धरलेल्या जागांवर परिणाम झाला. आता जागावाटप लवकर व्हावं यासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्यापेक्षा जास्त अवघड मविआचं आहे.' असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
- 01:43 PM • 12 Aug 2024
CM Eknath Shinde : 'रडगाणं नको, मर्दासारखं लढा'; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा!
महायुतीत कोणतीही स्पर्धा नाही. विकास आणि कल्याणासाठी आमच्या योजना आहेत. विरोधकांनी संविधानावरुन भीती पसरवली म्हणूनच विरोधक खोडा घालतात. काँग्रेसला हरण्याचा आत्मविश्वास आहे. मोदी जिंकल्याचे पेढे वाटले का? घरी बसून राज्य चालवता येत नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर जावं लागतं. शेतकऱ्याचा मुलगा सीएम झाल्याची काहींना पोटदुखी आहे. जनताच आता आम्हाला आमच्या कामाची पोचपावती देईल. उद्धव ठाकरेंचं आम्हाला आव्हान वाटत नाही. रडगाणं नको, मर्दासारखं लढा... 55 पैकी 40 आमदार आमच्यासोबत आहेत. बाळासाहेबांची विचारधारा कुणी सोडली? जनतेचं मत युतीला, काँग्रेससोबत कोण गेलं? मग खरी गद्दारी कुणी केली? आरक्षण बैठकीस विरोधक का आले नाही?' असे प्रश्न शिंदेंनी उपस्थित केले. तसंच, मराठा आरक्षणावर बोलताना ते म्हणाले की, 'दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये. मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळावं. पण, ओबीसींच्या वाट्याचं कमी होऊ नये. मनोज जरांगेंनी सहकार्याची भूमिका घ्यावी. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.' असं भाष्य यावेळी शिंदेंनी केलं.
- 01:23 PM • 12 Aug 2024
CM Eknath Shinde : लाडक्या बहिणींनी सावत्र भावापासून सावध रहावं- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
'लाडकी बहीण योजनेसाठी 10 महिन्यांपासून काम करत आहोत. लाडक्या बहिणींसाठी 1500 म्हणजे मोठा आधार आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्यांना काय कळणार? लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पोटात दुखतं. लाडक्या बहिणींनी सावत्र भावापासून सावध रहावं. महायुतीत कोणतीही स्पर्धा नाही.' असं स्पष्ट वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.
- 01:18 PM • 12 Aug 2024
CM Shinde : 'आमचे निर्णय जनहिताचे', मुंबई Tak बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंची रोखठोक मुलाखत
'आम्ही टीम म्हणून काम करतो.'आमचे निर्णय जनहिताचे आहेत. १२३ जलसिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. एक रूपयांत पीकविमा दिला. विकासातले सगळे स्पीडब्रेक काढून टाकले. पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र देशात पहिला आहे. आम्ही गडचिरोलीतही गुंतवणूक आणली.' अशा विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वक्तव्य केलं.
- 12:58 PM • 12 Aug 2024
MNS News Update : 'टॉपचं पद दिलं तरी मनसे सोडणार...', बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले!
'मी राज ठाकरेंसोबतच राहणार... लोकसभेला 3 जागा मागितल्या होत्या , देशासाठी मोदींना पाठिंबा दिला. निवडणुका न लढण्यानं नुकसान होतं. सध्या महाराष्ट्रातील राजकारणात चिखल झालं आहे. महायुतीत आधीच तिघे म्हणून मनसे स्वतंत्र आहे.' असं बाळा नांदगावकर यावेळी म्हणाले.
- 12:30 PM • 12 Aug 2024
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू शकतं?, राज्य मागासवर्गीय आयोग अध्यक्ष सुनील शुक्रे यांचे स्पष्टीकरण...
'आम्ही फिल्डवर जाऊन सर्वेक्षण केला. निकष ठरवून डेटा गोळा केला. सर्वेक्षणातील डेटाचं विश्लेषण केलं. मराठा समाज मागास आहे का? राजकीय प्रतिनिधीत्व कुणाला मिळालं ते पहावं. 337 परिवारांनाच फक्त राजकीय प्रतिनिधीत्व मिळालं.आरक्षण कसं द्यावं हे सरकारने ठरवावे. मराठा आणि सध्याच्या ओबीसी आरक्षणात फरक नाही.'
- 12:16 PM • 12 Aug 2024
Varsha Gaikwad on Raj Thackeray : राज ठाकरे फक्त निवडणुकीलाच येतात- वर्षा गायकवाड
'राज ठाकरे फक्त निवडणुकीलाच येतात. त्यांनी रिक्षांचं उदाहरण दिलं ती रिक्षा ठाण्यातूनच चालते. विधानसभा मविआतूनच लढण्याची मागणी आहे. जनता महाविकास आघाडीसोबत आहे. मविआत कुणीही मोठा भाऊ नाही. मुंबईतलं जागावाटप सगळ्यात आधी होईल. सगळ्यांना विचारात घेऊन जागावाटपाचा निर्णय घेण्यात येईल.' असं वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या.
- 11:39 AM • 12 Aug 2024
Varsha Gaikwad: 'लाडका मित्र योजना दोन वर्षांपासून सुरू आहे'; वर्षा गायकवाडांचा सरकारवर निशाणा
'निवडणुकांच्या तोंडावर बहीण आठवली पण, लाडके मित्र कोण ते जगाला कळालं. हे सर्व फक्त विधानसभेपर्यंत असेल. लाडकी बहीण योजना रक्षाबंधनला आठवली पण लाडका मित्र योजना दोन वर्षांपासून सुरू आहे. योजनांसाठी सरकारकडे पैसे नाहीत. महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली म्हणूनच योजनांच्या घोषणा सुरू आहेत.' असं मुंबई Tak च्या बैठकीत वर्षा गायकवाड म्हणाल्या.
- 11:19 AM • 12 Aug 2024
Praful Patel : प्रफुल पटेल यांना शरद पवारांची आठवण येते का?
'मी संयमी माणूस आहे. ते माझे लीडर आहेत. पवार साहेब मला संसदेत भेटतात. त्यामुळे आठवण येण्याचा प्रश्न येत नाही.' असं प्रफुल पटेल मुंबई तकच्या बैठकीत म्हणाले.
- 11:09 AM • 12 Aug 2024
Praful Patel : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा नेमका मालक कोण?
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा नेमका मालक कोण? असा प्रश्न विचारला असता प्रफुल पटेल यावर म्हणाले,'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मालक कोणीही नाही आहे. ही सरकारची योजना आहे. ती कोणाच्याही मालकीची नाही.'
- 11:04 AM • 12 Aug 2024
Praful Patel on Loksabha : आमच्या जागावाटपामध्ये काही चुका झाल्या पण...
तुम्हाला वाटतं का आपण शरद पवारांसोबत असतो तर बरं झालं असतं? यावर प्रफुल पटेल म्हणाले, 'आमच्या जागावाटपामध्ये काही चुका झाल्या. पण, शरद पवारांनी ज्या 10 जागा लढवल्या तिथे राष्ट्रवादीचीच ताकद होती. त्यात काही नवीन नाही.'
- 10:50 AM • 12 Aug 2024
Praful Patel Mumbai Tak Baithak 2024 : लोकसभेत कमी जागा मिळाल्यामुळे आमचा विश्वास खचला पण...- प्रफुल पटेल
मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल्ल यांनी दिलखुलास चर्चा केली यावेळी त्यांनी विशेष मुद्द्यांवर आपले मत मांडले. ते म्हणाले, ' महाराष्ट्रात तीन-तीन पक्ष दोन्ही बाजूला आहे. आमच्याकडे खासदारांची संख्या कमी आहे. सुनील तटकरे हे एकच खासदार आहे. पण विधानसभेत अशी परिस्थिती राहणार नाही.' असंही ते म्हणाले.
- 10:11 AM • 12 Aug 2024
Mumbai Tak Baithak Live: प्रफुल पटेल सांगणार राष्ट्रवादीची 'गुलाबी रणनीती' काय?
'मुंबई Tak बैठक'ची सुरुवात होणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्या मुलाखतीने. राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा महाराष्ट्रभर सुरू आहे. या यात्रेच्या माध्यमातून पक्षाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने गुलाबी रंग परिधान केला असून, या गुलाबी रंगाच्या रणनीतीतून काय साधायचं आहे, याबद्दल बोलणार आहेत पक्षाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल... थोड्याच वेळात मुलाखत सुरू होईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT