लाइव्ह

Maharashtra news Live : मोठी बातमी! पुण्यात सापडल स्फोटासाठी वापरले जाणारे 67 डेटोनेटर

मुंबई तक

ADVERTISEMENT

pune news
pune news
social share
google news

Maharashtra breaking news Live Updates : विधानसभा 2024 निवडणुकीची तयारीही सुरू झाली आहे. पडद्यामागे राजकीय घटना-घडामोडींनी वेग घेतला आहे. 

विधानसभेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार आहे. त्यामुळे काही महिनेच राजकीय पक्षांच्या हातात असून, सगळ्यांनीच आता पक्ष बांधणी करण्यासाठी कंबर कसल्याचे दिसत आहे. 

महायुतीला लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपकडून यावर चिंतन सुरू आहे. त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात रणनीतीवर काम सुरू आहे. 

काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीतील पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघातच सध्या शरद पवार फिरत असून, ते निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे म्हटले जात आहे. 

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनानंतर आता ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थही आंदोलन सुरु करण्यात आले आहे. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेले आहेत. आता लक्ष्मण हाके यांनीही ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, यासाठी अन्नपाण्याचा त्याग केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण आता आरक्षणाच्या मुद्द्याभोवती फिरताना दिसत आहे. 

ADVERTISEMENT

ब्रेकिंग बातम्या आणि लाईव्ह अपडेट्स...

ADVERTISEMENT

लाइव्हब्लॉग बंद

  • 07:58 PM • 23 Jun 2024

    पुण्यात सापडल स्फोटासाठी वापरले जाणारे 67 डेटोनेटर

    पुण्यातून एक हादरवून टाकणारी बातमी समोर येत आहे. पुण्यात स्फोटासाठी वापरले जाणारे 67 डेटोनेटर सापडले आहेत. पुण्याजवळील वडकीतल्या गायदरा वस्तीत 67 डेटोनेटर सापडले आहेत. अज्ञात इसमाने डेटोनेटर ठेवल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने पुण्यात खळबळ माजली आहे. 

  • 11:21 AM • 23 Jun 2024

    Neet Updates : मोदींनी सांगितल्याप्रमाणेच क्रांतिकारी गोष्टी घडल्या -जयंत पाटील

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 

    "नरेंद्र मोदीजी यांनी सत्तेत आल्यावर पहिल्या शंभर दिवसांत अनेक क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते, त्याप्रमाणेच अनेक क्रांतीकारी गोष्टी घडल्याही आहेत." 

    "पहिल्या दहा दिवसांतच यूजीसी नेट परीक्षा रद्द झाली, नीट परीक्षा पेपर फुटल्याने रद्द झाली आणि आता नीटची पदव्युत्तर परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली. ‘देशाचे भविष्य हे देशाच्या वर्गखोल्यांमध्ये आकार घेत आहे’ असे कायम बोलले जाते, मात्र याच देशाच्या भविष्यासोबत केंद्र सरकार अक्षरशः खेळत आहे." 

    "अवघ्या १२ तास आधी परीक्षा रद्द करणे नक्की कशाचे द्योतक आहे ? मुळात अशा प्रवेश परीक्षा राज्य पातळीवर घेण्यात येऊन राज्यांना याबाबतीत अधिक स्वायत्तता दिली जावी, मात्र केंद्र शासनाला सर्व काही स्वतःच्या हातात ठेवायचे असल्याने या अडचणी उद्भवत आहेत. या अनागोंदीमुळे उद्विग्न उद्या काही तरुण तरुणींनी टोकाचे निर्णय घेतले तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल."

     

  • 09:30 AM • 23 Jun 2024

    Maharashtra News Updates : अजित पवारांना महायुतीत एकटे पाडण्याचा प्रयत्न सुरूये -अमोल मिटकरी

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक गंभीर विधान केले आहे. त्यामुळे महायुतीत सगळे काही सुरळीत सुरू असल्याच्या इतर पक्षांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

    'महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मानसिक खच्चीकरण सुरू आहे. त्यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे', असे मिटकरी म्हणाले.

    'मागील काही घटना पाहिल्या तर अजित पवार महायुतीतून स्वतःहून बाहेर पडावे यासाठी त्यांचे खच्चीकरण केले जात आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला न देता शिवसेनेला देण्यात आली. आता नाशिकमध्ये शिवसेनेला पाठिंबा देऊन राष्ट्रवादीला एकटे पाडले जात आहे. त्यामुळे अजित पवारांना मानसिक त्रास दिला जात असून, आम्ही हे पक्ष म्हणून खपवून घेणार नाही', असे मिटकरी यांनी म्हटले आहे. 

follow whatsapp

ADVERTISEMENT