लाइव्ह

Maharashtra Breaking News Live : ''मी शेवटच्या घटकापर्यंत...'', मनोज जरांगेंना अश्रू अनावर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Manoj jarange news
मनोज जरांगेना अश्रू अनावर
social share
google news

Maharashtra News Live : राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी नवनवीन अपडेट समोर येत आहे. या वाहन हल्ल्यात फरार असलेले 9 आरोपी अकोला सिव्हिल लाईन पोलिसांसमोर आत्मसर्मपण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानंतर पोलीस त्यांना न्यायलयात हजर करणार आहेत. तर दुसरीकडे एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी लढा देत असलेले जरांगे पाटील यांचा एक ऑगस्टला वाढदिवस असतो. त्यामुळे रात्री बारा वाजल्यापासून जरांगे पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहेत.

महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व महत्त्वाच्या घटनांचे लाईव्ह अपडेट्स वाचा....

लाइव्हब्लॉग बंद

  • 06:43 PM • 01 Aug 2024

    ''मी शेवटच्या घटकापर्यंत...'', मनोज जरांगेना अश्रू अनावर

     ''मी तुमच्यासाठी खंबीर आहे. माझी समाजाकडे काहीही अपेक्षा नाही. तुमचे पोरं मोठे करण्यासाठी मी जीव हातावर घेतला आहे. मी शेवटच्या घटकापर्यंत मराठा समाजाला कधीही सोडणार नाही'', असं म्हणत मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाले होते.अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे बोलत होते. 

  • 03:02 PM • 01 Aug 2024

    Jalna News : वाढदिवस हा आनंदाचा दिवस, मी मृत्य नंतर देहदान करणार- जरांगे पाटील

    वाढदिवस हा आनंदाचा दिवस, मी मृत्य नंतर देहदान करणार असल्याची मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी वाढदिवसाच्या दिवशी केली.

     

  • 01:58 PM • 01 Aug 2024

    कोल्हापूरच्या पठ्ठयाने नेमबाजीत मिळवलं कांस्यपदक

    महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने परिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत स्वप्नीलने कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमधील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात प्रथमच भारतीय नेमबाजाने पदक जिंकले आहे. चालू ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक होते. याआधी भारताची शेवटची दोन पदके नेमबाजीतही आली होती.

  • 09:10 AM • 01 Aug 2024

    उद्धव ठाकरे-संजय राऊतांना कोर्टाकडून 2 हजार रुपयांचा दंड; नेमकं प्रकरण काय?

    राहुल शेवाळे मानहानी खटला प्रकरणाचा मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने निर्णय दिला आहे. या प्रकरणात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना 2 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे दोघांना दोन आठवड्यांच्या आत दोन हजार रुपये भरावे लागणार आहेत.

  • ADVERTISEMENT

  • 09:01 AM • 01 Aug 2024

    Jalna News : जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अंतरवालीमध्ये गर्दी

    मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी लढा देत असलेले जरांगे पाटील यांचा एक ऑगस्टला वाढदिवस असतो. त्यामुळे रात्री बारा वाजल्यापासून जरांगे पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहेत. आतिषबाजी, डोल ताशे वाजवत जरांगे पाटील यांना शुभेच्छा देत आहेत.

  • 09:00 AM • 01 Aug 2024

    Pune News : पुणेकरांसाठी गुडन्यूज, धरणात 90 टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा जमा

    • पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस
    • पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात ९० टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा
    • पानशेत, वरसगाव, टेमघर या तिन्ही धरणात सध्य पाणीसाठा ९० टक्के पेक्षा जास्त
    • खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने त्यात ७५ टक्के पाणीसाठा
    • मागच्या वर्षी याच काळात चार ही धरणात 79.66 टक्के इतका पाणीसाठा होता
    • यावर्षी याच काळात चार ही धरणं मिळून 89.87 टक्के इतका पाणीसाठा आहे
    • धरणातील पाणीसाठा खालीलप्रमाणे
    • खडकवासला: 75.60 टक्के
    • पानशेत: 91.01 टक्के
    • वरसगाव: 90.36 टक्के
    • टेमघर: 92.40 टक्के
  • ADVERTISEMENT

  • 08:24 AM • 01 Aug 2024

    Maharashtra News : बच्चू कडूृ यांचा ठाकरे गटाला धक्का

    बच्चू कडू यांनी ठाकरे गटाला धक्का दिलाय. अकोला जिल्ह्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रहार संघटनेत प्रवेश करत आहेत. ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत प्रहारमध्ये बच्चू कडू यांच्या उपस्थित पक्षप्रवेश करण्यात आला. अकोला जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रहार संघटनेत प्रवेश केला आहे.

     

  • 08:18 AM • 01 Aug 2024

    Maharashtra News : नव्या महिन्याच्या पहिल्या दिवशीच नागरिकांना झटका; LPG सिलेंडरच्या किमतींत वाढ!

    आज ऑगस्ट महिन्याची पहिली तारीख. नव्या महिन्याच्या पहिल्या दिवशीच महागाईचा तडका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. सरकारी तेल कंपन्या आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी आजपासून एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल केला आहे. या बदलांमुळे सर्वांच्या खिशाला कात्री बसणार आहे. आज 1 ऑगस्टपासून 19 किलोचे व्यावसायिक सिलिंडर (Commercial Cylinder) महाग झाले आहेत. घरगुती वापरासाठी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही, ही दिलासादायक बाब आहे. 

follow whatsapp

ADVERTISEMENT