Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंची तब्येत खालवली! अंतिम निर्णयाची वेळ येताच नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil Health Update : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आता मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीत आपली भूमिका बजवण्याचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मनोज जरांगेंची तब्येत खालवली!
अंतिम निर्णयाची वेळ येताच नेमकं काय घडलं?
जरांगेंची विविध धर्माच्या धर्मगुरूंसोबत बैठक!
Manoj Jarange Patil Health Update : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आता मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीत आपली भूमिका बजवण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण न देणाऱ्या पक्ष आणि उमेदवारांच्या विरोधात ते मैदानात उतरणार आहेत. उद्या 31 ऑक्टोबर रोजी धर्मगुरूंसोबतच्या बैठकीनंतर ते याबाबतचा अंतिम निर्णय देतील. पण या सर्वात आता त्यांची तब्येत खालावल्याची माहिती समोर आली आहे. (Manoj Jarange Patil Health Update deteriorated doctor examined what exactly happenend vidhan sabha election 2024)
सततचे जागरण आणि दगदगीमुळे जरांगे पाटलांची तब्येत खालवली आहे. त्यांना कणकणी आणि अशक्तपणा जाणवत आहे. यामुळे ग्लॅलेक्सि हॉस्पिटलच्या पथकाकडून मनोज जरांगे पाटील यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा : Gold Price Today in Choti Diwali : सोन्याने नादच केलाय थेट! दिवाळीत रेकॉर्ड ब्रेक भाव, 1 तोळ्याचा दर किती?
मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या समाजातील उमेदवारांना निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यासाठी सांगितलं होतं. सर्वाधिक मराठवाड्यात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. कोणाला पाठिंबा द्यायचा की निवडणूक लढवायची याबाबत निर्णय मनोज जरांगे जाहीर करणार आहेत. पण जरांगेंच्या या निर्णयाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेलं असताना जरांगेंनी मात्र आज निर्णय़ घेण्यापूर्वी बैठक रद्द केली. तसंच एक बैठक जरांगे उद्या घेणार आहेत. पण आता त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा : Maharashtra Weather: विजांचा कडकडाट, वादळी वारा! ऐन दिवाळीत पावसाचा धुमधडाका?
जरांगेंची विविध धर्माच्या धर्मगुरूंसोबत बैठक!
उद्या म्हणजेच 31 ऑक्टोबर 2024 रोजी जरांगे पाटलांनी मराठा, मुस्लिम आणि दलित समीकरण जुळवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे. या बैठकीत विविध धर्माचे धर्मगुरु उपस्थित राहणार आहेत. हेलिकॉप्टर आणि विमानाने महत्त्वाचे धर्मगुरू येणार आहेत. मात्र, अंतिम निर्णयाची वेळ येताच आज जरांगे पाटील यांची तब्येत खालवल्याची माहिती समोर आली आहे. आता सर्वांचं लक्ष त्यांच्या पुढील भूमिकेवर आहे.
ADVERTISEMENT