लाइव्ह

Maharshtra Breaking News Live : 'अरे नालायक माणसा तुला माणसाची किंमत नाही', उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर बोचरी टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

political
mahavikas aghadi
social share
google news

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठीचे हे चौथे उपोषण आहे. जरांगे पाटील यांनी या उपोषण दरम्यान अन्न, पाणी आणि औषध उपचार घेण्यास नकार दिला आहे. ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत, त्यांच्या सग्या सोयऱ्यांना त्या नोंदी आधारे आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सरकारने या संदर्भात अध्यादेश काढला आहे आणि त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी जरांगे, अशी मागणी मागणी जरांगेंनी केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 10:08 PM • 12 Feb 2024

    'अरे नालायक माणसा तुला माणसाची किंमत नाही', उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर बोचरी टीका

    ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्यात आला. त्यावेळी फडणवीसांनी विरोधकांवर टीका करताना म्हणाले की, 'वाहनाखाली कुत्रं आली तरी तुम्ही राजीनामा मागता' असं वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांनी 'तुम्ही आमच्या कार्यकर्त्याची तुलना कुत्र्याबरोबर करता का' असं म्हणत, 'अरे नालायक माणसा तुला माणसाची किंमत आहे की नाही' असा सवालही उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमधील सभेतून केला.

  • 09:14 PM • 12 Feb 2024

     'माझ्या रक्तात शेवटपर्यंत काँग्रेस'- प्रणिती शिंदे

    माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज आमदारकीची आणि काँग्रेसच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांविषयीही ते भाजपवासी होणार असल्याची चर्चा होऊ लागली. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांच्या नावाचीही चर्चा होऊ लागली होती. त्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, 'माझ्या रक्तात शेवटपर्यंत काँग्रेस आहे. माझी तत्त्व भाजपसोबत जुळत नाहीत, त्यामुळे माध्यमांमधल्या बातमीला तथ्य नसल्याचेही प्रणिती शिंदे यांनी सांगितले. 

  • 08:16 PM • 12 Feb 2024

    तुम्ही नेत्यांची काळजी घेत नाहीत म्हणून ते भाजपमध्ये येतात-नितेश राणे

    विरोधक स्वतःच्या आमदाराला सांभाळू शकत नाही व स्वतःच्या नेत्यांनाही ते सांभाळू शकत नाहीत त्यामुळे आमच्यावर जे आरोप झाले आहेत, त्यावर उत्तर देणं हे आमचं काम नसल्याची प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी हेही सांगितले तुम्ही स्वतःच्या नेत्यांची काळजी घ्या, तुम्ही काळजी घेत नाहीत म्हणून नेते निर्णय घेत असल्याचेही त्यांनी खोचकपणे सांगितले. आमच्याकडे जे नेते येतात त्या सगळ्यांवरच आरोप नाहीत, मिलिंद देवरा यांच्यावर काय आरोप होते असा सवालही त्यांनी केला आहे. 

  • 07:24 PM • 12 Feb 2024

    अशोक चव्हाण जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य-मोहन हंबर्डे

    माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यावर नांदेड दक्षिण मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांनी चव्हाणांच्या राजीनाम्यावर बोलताना सांगितले की, राजीनामा दिला हे आम्हाला माहीत नव्हती हे सगळं बातम्यांमधूनच समजले आहे. त्यामुळे आता ते काय निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही आहोत असंही हंबर्डे यांनी सांगितले. 

  • ADVERTISEMENT

  • 07:18 PM • 12 Feb 2024

    रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जाग शिवसेनेकडेच- उदय सामंतांचा दावा

    लोकसभेच्या जागांविषयी चर्चा करताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, 'कितीही काही झाले तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसभेची जागा कुणाला द्यायची किंवा नाही द्यायची हे अधिकार आम्ही शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत. त्यामुळे आजही या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा आहेआणि शिवसेनेकडूनच तशी मागणी केली असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले. 

  • 06:44 PM • 12 Feb 2024

    अशोक चव्हाणांमुळे आता महायुतीची ताकद वाढणार- छगन भुजबळ

    गेल्या अनेक दिवसांपासून कानावर येत होतं की काँग्रेसचे मोठा चेहरा पक्ष सोडतील. तसेच आमच्या जुन्या सहयोगी पक्षातील आमचे सहकारी आता पुन्हा आमचे सहयोगी होतील, यामुळे निश्चित महायुतीची ताकद वाढायला मदत होणार असल्याचं मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. त्याच बरोबर मराठा आरक्षणासाठी कायदा येत असला तरी ओबीसीमधून आरक्षण नको या भूमिकेवर आम्ही ठाम असून प्रकाश आंबेडकरांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्यासाठी त्यांनी व्यक्त केलेल्या मतासाठी मी त्यांचा आभारी आहे.  

  • ADVERTISEMENT

  • 03:54 PM • 12 Feb 2024

    'माझी कोणाबाबत कोणतीही तक्रार नाही'; अशोक चव्हाण

    मला माझा वेळ घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा निर्णय घेणार. मला पुरेसा वेळ हवाय. माझी कोणाबाबत कोणतीही तक्रा नाहीये. राजीनामा देणं वैयक्तिक निर्णय आहे. भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय नाही. दोन दिवसात पुढची वाटचाल जाहीर करेन. माज्यासाठी पक्षाने खूप केलं, मी देखील पक्षासाठी खूप केलं. प्रत्येक गोष्ट सांगितली जात नाही.' अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

  • 03:00 PM • 12 Feb 2024

    'अशोक चव्हाणांनी आमदारकीचा राजीनामा दिला तरी काही फरक पडत नाही'- सुषमा अंधारे

    'काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला तरी काही फरक पडत नाही. शायनिंग इंडिया आणि फील गुड या दोन्ही कॅमम्पियन... कुठलीही गोष्ट एका ठराविक लिमिट पर्यंत चांगले वाटते.. भाजपाचा अतिरेक झालेला आहे. निवडणुकांमध्ये भाजपला बॅक फायर होणार आहे.' अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली.

  • 02:41 PM • 12 Feb 2024

    'काँग्रेसमुक्त घोषणा देणारे आता काँग्रेसव्याप्त झालेत'; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला!

    काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिलेला आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या बातमीने महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे. यासर्व प्रकरणानंतर अशोक चव्हाण आता भाजपात प्रवेश करणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. यावर उद्धव ठाकरेही स्पष्टच बोलले आहेत. ते म्हणाले की, 'काँग्रेसमुक्त घोषणा देणारे आता काँग्रेसव्याप्त झाले आहेत. भ्रष्टाचार करणाऱ्यांना भाजपत प्रवेश, हीच मोदी गँरंटी आहे. उद्या भाजप अध्यक्षही काँग्रेसमधून आलेला असेल.' 

  • 02:39 PM • 12 Feb 2024

    अशोक चव्हाणांकडून आमदारकीचा राजीनामा? चर्चांना उधाण

    काँग्रेस नेते अशोक चव्हाण त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चाणा सध्या उधाण आलं आहे. यासोबतच, भाजप कार्यालयातही एका काँग्रेस नेत्याच्या पक्षप्रवेशाची तयारी सुरू असल्याचं कळतंय. सूत्रांच्या माहितीनुसार, काही वेळापूर्वी चव्हाण यांनी नार्वेकरांची भेट घेतली होती. सध्या अशोक चव्हाणांचा फोन नॉट रिचेबल येत आहे.  

  • 02:27 PM • 12 Feb 2024

    राहुल नार्वेकरांनी अशोक चव्हाण यांचा आमदारकीचा राजीनामा स्वीकारला

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अशोक चव्हाण यांचा आमदारकीचा राजीनामा स्विकारल्याचं सुत्रांकडून माहिती मिळाली आहे. यानंतर काही वेळातच अशोक चव्हाण माध्यमांशी बोलतील असंही सांगितलं जात आहे.

  • 11:56 AM • 12 Feb 2024

    उपोषण करणाऱ्या सारथीच्या विद्यार्थ्यांना मनोज जरांगेंनी झापलं! 

    अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांसोबत उपोषण करणाऱ्या सारथीच्या विद्यार्थ्यांना जरांगे पाटलांनी चांगलचं झापलं आहे. मागच्या अठरा महिन्यांपासून फेलोशिप न मिळाल्यानं सारथीचे विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले आहेत. माध्यमांना प्रतिक्रिया देताना विद्यार्थी फक्त पीएचडी पुरतंच बोलतात. त्यामुळं जरांगे पाटील चांगलेच संतापले असून, 'हे उपोषण पीएचडीसाठी नाही तर मराठा आरक्षणासाठी आहे. तुम्ही तुमचंच बोलत आहात. आरक्षणाचा कुणी विषयच मांडत नाही. तुम्ही पीएचडी केली म्हणून हुशार समजता का? अशी नियत असल्यावर जातीचं केव्हा चांगलं व्हायचं असं म्हणत जरांगे पाटलांनी सारथीच्या उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना झापलं.'

  • 11:52 AM • 12 Feb 2024

    राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नारायणगाव येथे बेनके कुटुंबियांची घेतली भेट

    राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार वल्लभ बेनकेंचे रविवारी रात्री दु:खद निधन झाले. त्यांच्यावर आज जुन्नर तालुक्यातील हिवरे येथे चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे दरम्यान दिलीप वळसेपाटलांनी वल्लभ बेनकेंच्या जुन्या आठवणींना उजाळा देत जुना सहकारी गेल्याने मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे मत व्यक्त करत बेनके कुटुंबियांचे सांत्वन केले.

  • 11:37 AM • 12 Feb 2024

    राज्य मागासवर्गाची बैठक होण्याची शक्यता!

    मराठा समाजाचं सर्वेक्षण पूर्ण झालं असून राज्य मागासवर्गाची उद्या किंवा परवा बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात येणार आहे

  • 10:30 AM • 12 Feb 2024

    राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे निधन!

    राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष माजी आमदार वल्लभशेठ दत्तात्रय बेनके (वय 74) यांचे अल्पशा आजाराने रविवार रात्री 11 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले आहे. बेनके यांचा अंत्यविधी आज सोमवार दिनांक 12 रोजी दुपारी चार वाजता त्यांच्या गावी हिवरे बुद्रुक(ता.जुन्नर जिल्हा, पुणे)  या ठिकाणी होईल अशी माहिती जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी आहे दिली. त्यापूर्वी सोमवारी सकाळी 9 ते 12 या वेळात नारायणगाव येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांचा जन्म 23 जून 1950 रोजी हिवरे बुद्रुक या गावी झाला. शेती हा मूळ व्यवसाय होता.हे 1985 साली प्रथम जुन्नर विधानसभेवर निवडून आले होते त्यानंतर 1990 साली दुसऱ्यांदा ते आमदार झाले त्यानंतर लागोपाठ दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी त्यांचा सलग दोन वेळा पराभव केला मात्र 2004 व 2009 साली पुन्हा आमदार वल्लभ बेनके जुन्नर विधानसभेवर निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे ते कट्टर समर्थक होते. परखड वक्तव्य व प्रशासनावर असलेली पकड यामुळे वल्लभ शेठ बेनके यांचा दरारा संपूर्ण पुणे जिल्ह्यात होता. त्यांच्या जाण्याने निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार अतुल बेनके यांच्या कुटुंबावर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बेनके यांच्या मागे पत्नी, 3 मुले सुना व नातवंडे असा परिवार आहे.

     

  • 10:24 AM • 12 Feb 2024

    राज्यसभेसाठी भाजपकडून 14 उमेदवारांची घोषणा!

    राज्यसभेच्या 14 जागांसाठी भाजपने रविवारी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये उत्तर प्रदेशातील सात, बिहारमधील दोन तर छत्तीसगड, हरियाना, कर्नाटक, उत्तराखंड आणि प. बंगालमधील प्रत्येकी एका जागेसाठी उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.

follow whatsapp

ADVERTISEMENT