Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणींना 2100 कधी देणार?', रोहित पवारांच्या प्रश्नावर आदिती तटकरेंचं मोठं विधान!
Rohit Pawar Vs Aditi Tatkare : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी सरकारने अंगणवाडी सेविकांच्या वेळेचा वापर केला होता. प्रोत्साहन म्हणून त्यांना 50 रुपये देणार होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

लाडकी बहीण योजनेवरून विधिमंडळात गदारोळ

रोहित पवारांनी आदिती तटकरेंना 2100 रुपयांबद्दल थेट विचारलं

आदिती तटकरेंचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान
Rohit Pawar Vs Aditi Tatkare : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी सरकारने अंगणवाडी सेविकांच्या वेळेचा वापर केला होता. प्रोत्साहन म्हणून त्यांना 50 रुपये देणार होते. अंगणवाडी सेविकांना जे प्रोत्साहन देणार होते, ते पैसे त्यांना मिळालेले नाहीत. अधिवेशन संपण्याआधी सरकार त्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे का? तसच निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये मिळतील असं आश्वासन दिलं होतं. तुम्ही (सरकार) या अधिवेशनात 2100 रुपये देणार आहात का?, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात अधिवेशनात सरकारला विचारला, यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय.
लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
"आम्ही ज्यावेळी लाडकी बहिण योजना घोषित केली, त्यावेळी अंगणवाडी सेविका ज्या पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरतील, त्यांना इन्सेटिव्ह देण्यात येईल, अशा पद्धतीची घोषणा केलेली होती. जवळपास 31 कोटींहून अधिक इन्सेटिव्हची रक्कम बाल विकासचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत, त्यांच्या इथे जमा केलेली आहे. जवळपास 26 जिल्ह्यांपेक्षा अधिक जिल्ह्यांमधील अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्या खात्यात ती जमा होण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे.
ज्यावेळी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला, त्यावेळी त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेलं आहे की, शासनाच्या ज्या वेगवेळ्या योजना आहेत. ज्या लाभा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत, त्यामध्ये 1500 किंवा 1500 हून अधिक रक्कमेचा लाभ लाडकी बहीण घेत असेल, तर ती या योजनेत पात्र होणार नाही. नमो शेतकरी योजनेत ज्या महिला आहेत, त्यांना हजार रुपयांचा लाभ मिळत असतो. किमान पंधराशेचा लाभ लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचला पाहिजे. नमो शेतकरी योजनेतील महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं नाहीय".
हे ही वाचा >> आता IPhone, जिओ प्लस, एअरटेल विसरा! सॅटेलाईट फोनपेक्षा वेगळं आहे Starlink, थेट फोनमध्ये मिळणार सर्व्हिस?
लाडकी बहीण योजनेबाबत जळगावच्या महिलांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
"आताही सांगितलं होतं की दोन हफ्त्याचे 3000 रुपये मिळतील. तरीही 1500 रुपयेच मिळाले. त्यामुळे सर्व महिला खूप नाराज झाल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले तरीही ते काही उपयोगाचे नाहीत. पैसे घेतले म्हणजे महागाई वाढते. मग ते काय उपयोगाचं आहे. त्यापेक्षा ते पैसे पण नको आणि महागाई पण नको", असं यवतमाळमध्ये एका भाजी विक्रेत्या महिलेनं मुंबई तकशी बोलताना म्हटलं.
"लाडकी बहीण योजनेमुळे खुश आहे. पण महागाई जास्त आहे ना..आम्हाला आशा होती की, आम्हाला 1500 रुपये महिना मिळणार आहे. खूप आशा होती. आताही सांगितलं होतं की दोन हफ्त्याचे तीन हजार रुपये मिळतील. पण दीडच हजार रुपये मिळाले, त्यामुळे सर्व महिला खूप नाराज झाल्या आहेत. आम्हाला खूप आशा होती. सरकारकडून आम्हाला काहीतरी मिळत आहे, अशी खूप आशा होती. पण आता दीडच हजार रुपये दिले आहेत. निवडणूक काळात पैसै वाढवून देतील असं सांगितलं होतं, तरीही आम्हाला वाढवून काहीच पैसै मिळाले नाहीत", असंही एका महिलेनं म्हटलं.
हे ही वाचा >> '7.30 नंतरचं पाणी चालतं का?' राणेंचा राज ठाकरेंना टोला, गंगाजल वि. संध्याकाळचं पाणी... नेमकं प्रकरण काय?
"लाडक्या बहिणीचे पैसे मिळतील, अशी घोषणा केली. त्यानंतर तीन महिने पैसे मिळाले. पण त्यापुढे मला पैसेच मिळाले नाहीत. पैसे जरी मिळाले तरी त्याचा काही उपयोग नाही. पैसे घेतले म्हणजे इकडे महागाई वाढते. पण त्यापेक्षा ते पैसे पण नको आणि महागाई पण नको, असंही एका भाजी विक्रेत्या महिलेनं म्हटलं. फॉर्म भरूनही आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत. पैसे आम्हाला का मिळाले नाहीत, हेच समजत नाहीय", असंही जळगावच्या काही महिलांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय.