Vidhan Parishad Election : "कुणी काय केलं सगळं माहितीये", क्रॉस व्होटिंगवर आमदाराने सोडलं मौन
Hiraman Khoskar Vidhan Parishad Election 2024 : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटली. ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. ज्या आमदारांच्या नावांची चर्चा सध्या सुरू आहे, त्यात एक नाव हिरामण खोसकर यांचेही आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांची मते फुटली
क्रॉस व्होटिंगबद्दल आमदार हिरामण खोसकर यांचा मोठा दावा
क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांबद्दल माहिती असल्याचा खोसकरांचा दावा
Maharashtra MLC Election 2024 : विधान परिषद निवडणुकीत सर्वाधिक मते फुटली ती काँग्रेसची. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांना पकडण्यासाठी काँग्रेसने यावेळी रणनीती केली होती. त्यात कोणत्या कोणत्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले, हे समोर आले असल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले. ज्या आमदारांच्या नावांची चर्चा आहे. त्यात एक नाव आमदार हिरामण खोसकर यांचे आहे. त्यांनी क्रॉस व्होटिंगबद्दल सुरू असलेल्या चर्चेबद्दल बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसने जयंत पाटील यांना सहा मतांचा कोटा ठरवून दिला होता, त्यातील एकही मत पडले नसल्याचा दावाही त्यांनी केला. टीव्ही ९ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हिरामण खोसकर यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. (MLA Hiraman Khoskar has claimed to know about which Congress MLAs cross-voted In Maharashtra Vidhan Parishad Election 2024)
ADVERTISEMENT
हिरामण खोसकर यांनी क्रॉस व्होटिंगबद्दल काय सांगितले?
विधान परिषद निवडणुकीत जे काही ठरलं... आदल्या दिवशी हॉटेलमध्ये बसलो. सगळ्यांशी चर्चा झाली. उद्धव ठाकरे, जयंत पाटील आणि शेकापचे जयंत पाटील आणि आम्ही सर्व आमदार काँग्रेसचे होतो. त्यामध्ये चर्चा करून ठरलं की कोणत्या आमदाराने कोणाला मत द्यायचे. त्याचवेळी ठरलं की, सर्वांनी सकाळी साडेसात वाजता उपस्थित राहायचं. मी साडेसात ते आठच्या दरम्यान आम्ही फक्त चार आमदार गेलो", असे आमदार खोसकर म्हणाले.
हेही वाचा >> "क्रॉस व्होटिंगमध्ये माझे नाव आल्याचे पाहिले अन्...", आमदार चौधरींनी सोडलं मौन
आमदार खोसकर पुढे म्हणाले की, "सर्व आमदार नंतर आले आणि चर्चा सुरू झाली. नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे सगळे साडेदहा अकरा वाजता आले. कुणालाही कुठे मतदान करायचे काही सांगितले नाही. नंतर अचानक अनिल परब, मिलिंद नार्वेकर, शरद पवार गटाचे दोन माणसे यांच्यात चर्चा सुरू झाली."
हे वाचलं का?
काँग्रेसची सात मते मिलिंद नार्वेकरांना, तर सहा मते जयंत पाटलांना -हिरामण खोसकर
"त्यानंतर आम्हाला प्रत्येकाला बोलावलं. आम्हा सात जणांना मिलिंद नार्वेकरांना मतदान करायला सांगितलं. सहा जणांनी जयंत पाटील यांना मतदान करायला सांगितलं. २५ आमदारांनी प्रज्ञा सातव यांना मतदान करायला सांगण्यात आले. त्या पद्धतीने कोटा ठरवून दिला", अशी माहिती आमदार खोसकर यांनी दिली.
हेही वाचा >> शिवाजी महाराजांच्या विशाळगडावरचा 'तो' दर्गा कोणाचा? नेमका वाद काय?
"आम्हाला बॅलेट पेपर दिला. कसे मतदान करायचे? मराठीतून कोण करणार? इंग्रजीतून कोण करणार? रोमनमधून कोण करणार? याबद्दल सांगितले. आम्हा दोघांना मराठीतून मतदान करायला सांगितलं. दोघांना इंग्रजीतून मतदान करायला सांगितलं. तिघांना रोमनमध्ये सांगितलं. त्या पद्धतीने आम्ही मतदान केले", असे आमदार हिरामण खोसकर म्हणाले.
ADVERTISEMENT
क्रॉस व्होटिंग करणारे ते सहा लोक कोण?
"१६ आणि ७ असे २३ मते, पण एक मत फुटले. शंभर टक्के फुटले. ते कुणाचे फुटले? परंतु जयंत पाटलांना सहा मते काँग्रेसने दिली, त्यातील एकही मतदान झाले नाही. त्याच्यावर कुठलीच कारवाई नाही. सहा लोकांनी इकडे मतदान करायचं हे ठरलं. ते सहा लोक कोण हे त्यांना माहिती आहे", असेही आमदार खोसकर म्हणाले.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> ठाकरे म्हणाले, 'मविआ'तून बाहेर पडेन; 'त्या' बैठकीत काय घडलं?
"एखादा गरीब कार्यकर्ता ऐकतो म्हणून त्याची सतत बदनामी. ठिके, मागच्या वेळी माझ्याकडून कळत नकळत माझ्याकडून चूक झाली. त्यावेळी मी वरिष्ठांना दोन महिन्यात सांगितलं की माझ्याकडून चूक झाली. माझ्याकडून त्यावेळी खडसेंना मतदान गेले. मी कबुली पण दिली", अशी धक्कादायक कबुली हिरामण खोसकर यांनी दिली.
कोणी क्रॉस व्होटिंग केले मला माहितीये -हिरामण खोसकर
"जे सहा फुटले, त्यांच्यावर कारवाई न करता माझ्यासारख्या कार्यकर्त्याची बदनामी वरिष्ठांनी थांबवली पाहिजे. आता लहान तोंडी मोठा घास. माझ्यासारख्या कार्यकर्त्याने सांगू नये. पण, बरेच जुने आमदार आहेत, ते नाराज आहेत. जी चार पाच दिवस चर्चा चालली त्यात मी स्पष्ट सांगितलं की, त्यामध्ये मी थांबवणार नाही. सगळं माहितीये की, कोणी काय कसं कसं केलं. पण, मी सांगू शकत नाही", असा मोठा गौप्यस्फोट हिरामण खोसकर यांनी केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT