Nilesh Lanke : अजित पवारांचा विश्वासू शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर, कोण आहेत निलेश लंके?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mla nilesh lanke ncp sharad pawar speculation leave ajit pawar ncp politics maharashtra politics
लंके अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
social share
google news

Nilesh Lanke NCP Sharad Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पारनेरचे आमदार निलेश लंके अजित पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. लंके अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत असलेले निलेश लंके नेमके कोण आहेत? हे जाणून घेऊयात.  (mla nilesh lanke ncp sharad pawar speculation leave ajit pawar ncp politics maharashtra politics) 

ADVERTISEMENT

निलेश लंके हे पारनेरचे आमदार असून अजित पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे.दक्षिण अहमदनगरमधून ते लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. पण महायुतीच्या जागावाटपात अजित पवार गटाला अवघ्या तीन ते चारच जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेसाठी इच्छुक अललेल्या अनेक नेत्यांची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता निलेश लंके यांनी शरद पवारांना साथ दिली तर ते लोकसभेचे उमेदवार असणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे निलेश लंके अजित पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. 

हे ही वाचा : "अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलीये", शिंदेंच्या नेत्याने थोपडले दंड

कोण आहेत निलेश लंके? 

राष्ट्रवादीच्या निलेश लंके यांनी राजकारणाची सुरुवात शिवसेना पक्षातून केली होती. वयाच्या 15 व्या वर्षापासून त्यांनी शाखा प्रमुख पदापासून कामाला सुरूवात केली होती. 

हे वाचलं का?

निलेश लंके यांनी त्यांच्या हंगा गावची ग्रामपंचायत देखील जिंकली होती. 

दरम्यान 27 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या वादामुळे त्यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यात आलं होतं. 

ADVERTISEMENT

शिवसेनेतून बाहेर काढल्यानंतर निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पक्षाने त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं. आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होतील. त्यावेळेस ते पहिल्यांदाच आमदार झाले आहे. 

हे ही वाचा : भाजपला बसणार आणखी एक धक्का! विद्यमान खासदार काँग्रेसमध्ये करणार प्रवेश!

तीनवेळा पारनेर मतदार संघातून विजयी ठरलेल्या शिवसेनेच्या विजय औटी यांचा निलेश लंके यांनी पराभव केला होता. 

निलेश लंके हे सध्या अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत.  

दरम्यान कोरोना काळात निलेश लंके यांची खूप चर्चा झाली होती. कारण निलेश लंके यांनी पारनेरच्या भाळवणीत शरद पवारांच्या नावाने 1 हजार बेडसचे कोविड सेंटर उभारले होते. विशेष म्हणजे रूग्णांसाठी निलेश लंके स्वता: कोविड सेंटरमध्ये उपलब्ध देखील असायचे. 

निलेश लंके काय म्हणाले? 

निलेश लंके प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना निलेश लंकेनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. 'मला अनेकांचे फोन आले आहेत, लोकसभा निवडणूक लढवावी अशी सहकाऱ्यांची इच्छा आहे. आपण खेळाडू आहे, खेळाडू हा नेहमी ग्राउंडवर असतो. पक्षाने जर जबाबदारी दिली तर मी लढेन असा विश्वास निलेश लंकेंनी व्यक्त करत,'राजकारण कधी कुठे टर्न घेईल हे सांगता येत नाही' असे विधान करून लंकेंनी प्रवेशांच्या चर्चांना आणखीणच हवा दिली. 

तसेच महायुतीच जागावाटप हा वरिष्ठ स्तरावरील विषय आहे. मी पक्षातला एक शेवटचा घटक म्हणून काम करतो आहे. त्यामुळे शेवटच्या घटकाने इतक्या उच्च स्तरावर चर्चा न केलेली बरीच असे निलेश लंकेंनी म्हटले. तसेच प्रत्येक पक्षाचा वरिष्ठ नेता हा आपआपल्या कार्यकर्त्याच्या नेहमी संपर्कात राहतो. काल माझ्या वाढदिवसानिमित्तही मला दादांचा फोन आल्याचेही निलेश लंके यांनी सांगितले. 


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT