live blog active
लाइव्ह

Maharashtra Assembly Election Voting LIVE Updates : सकाळी 11 वाजेपर्यंत 18.14 टक्के मतदान, वाचा तुमच्या जिल्ह्यातली आकडेवारी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra Assembly Election Voting 2024 percentage: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज (20 नोव्हेंबर) मतदान पार पडत आहे. संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका घेण्यात आहे. सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. 

ADVERTISEMENT

लोकशाहीच्या या उत्सवात राज्यात सर्व मतदारांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क जरून बजावावा असं आवाहन मुंबई Tak कडून आपणास करण्यात येत आहे.

हे ही वाचा>> Maharashtra Assembly Election 2024 Voting : Mumbai Assembly Election Voting LIVE Updates: राहुल नार्वेकर पोलिसांवर संतापले, थेट निवडणूक अधिकाऱ्यांना फोन

दरम्यान, आज दिवसभरात मतदानासंबंधी संपूर्ण राज्यभरात नेमक्या काय-काय घडामोडी घडतील त्याविषयची संपूर्ण माहिती आपल्याला या लाइव्ह ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. 

ADVERTISEMENT

2019 नंतर महाराष्ट्रातील राजकारण हे पूर्णपणे बदलून गेलं आहे. अशावेळी महाराष्ट्रातील जनता ही आता राज्याची सत्ता ही महाविकास आघाडीच्या हातात देणार की, महायुतीच्या हे आजच्या मतदानानंतर ठरणार आहे.  

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील सर्व महत्त्वाचे अपडेट हे आपल्याला mumbaitak.in या वेबसाइटवर पाहता येतील.

 

ADVERTISEMENT

 

  • 12:46 PM • 20 Nov 2024

    Maharashtra Election 2024 Live : उत्तर महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत किती मतदान? 

    उत्तर महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत किती मतदान? 

     

    नांदगाव 16.46%
    सुरगाणा-कळवण 18.24%
    चांदवड 21.30%
    येवला 20.92%
    निफाड 17.64%
    दिंडोरी 26.41%
    सिन्नर 21.20%
    नाशिक पूर्व 13.90%
    नाशिक मध्य 18.42%
    नाशिक पश्चिम 16.32.%
    देवळाली 15.01%
    इगतपुरी 20.43%
    मालेगाव मध्य 22.76%
    मालेगाव बाह्य 15.94%
    बागलाण  18.23%
    जळगाव शहर 15.88%
    जळगाव ग्रामीण 17.83%
    अंमळनेर  14.00%
    एरंडोल 14.39%
    चाळीसगाव 17.90%
    पाचोरा 8.53%
    चोपडा 14.90%
    रावेर 20.50%
    भुसावळ 16.42%
    जामनेर 15.13%
    मुक्ताईनगर 16.17%
    अकोले 19.80%
    संगमनेर 20.65%
    शिर्डी 19.54%
    कोपरगाव 21.10%
    श्रीरामपूर 12.80%
    नेवासा 22.27%
    शेवगाव 17.78%
    राहूरी 15.90%
    पारनेर 17.42%
    अहमदनगर शहर 16.92%
    श्रीगोंदा 15.26%
    कर्जत जामखेड 20.78%
    धुळे ग्रामीण 18.95%
    धुळे शहर 18.68%
    शिंदखेडा 19.29%
    साक्री 20.21%
    शिरपूर 23.65%
    अक्कलकुवा  19.57%
    शहादा  24.98%
    नंदुरबार 17.57%
    नवापूर 24.98%
  • 12:42 PM • 20 Nov 2024

    Maharashtra Election 2024 Live : साताऱ्यातील संवेदनशील भागात पोलिसांच्या ड्रोनची नजर

    सातारा जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात पहिल्या टप्प्यात संथगतीने मतदान झाले. दरम्यान, जिल्ह्यात मतदान केंद्र परिसर व मतदार संघात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील प्रतापसिंहनगर ,म्हसवड मतदार केंद्र तसेच  माण खटाव मतदारसंघांवर  पोलिसांकडून ड्रोनद्वारे मतदानाच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

  • 12:30 PM • 20 Nov 2024

    Maharashtra Election 2024 Live : राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती मतदान? वाचा सविस्तर आकडेवारी

    मुंबई आणि परिसरात सकाळी 11 वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

    अंबरनाथ 14.05%
    उल्हासनगर 11.33%
    कल्याण पूर्व 17.81%
    डोंबिवली 20.29%
    कल्याण ग्रामीण 19.82.%
    मुंब्रा कळवा 16.29%
    मीरा भाईंदर 18.02%
    ओवळा-माजीवडा 16.23%
    कोपरी-पाचपाखाडी 18.22%
    ठाणे शहर 18.86%
    ऐरोली 17.11%
    बेलापूर 17.89%
    भिवंडी ग्रामीण 16.14%
    शहापूर 11.33%
    भिवंडी पश्चिम 10.57%
    भिवंडी पूर्व 15.07%
    कल्याण पश्चिम 17.00%
    मुरबाड 18.02%
    डहाणू 23.01%
    विक्रमगड 15.70%
    पालघर 19.10.%
    बोईसर  19.91%
    नालासोपारा 18.54%
    वसई 20.81%
    गुहागर 24.36%
    रत्नागिरी  18.60%
    दापोली  23.59%
    सावंतवाडी  18.50%
    पेण  18.90%
    अलिबाग  19.45%
    कर्जत  20.10%
    पनवेल  16.89%
    चिपळूण  24.57%
    राजापूर  24.07%
    कणकवली  21.35%
    कुडाळ  23.00%
    श्रीवर्धन  18.22%
    महाड 22.67%
    उरण  29.26%
  • 12:26 PM • 20 Nov 2024

    Maharashtra Election 2024 Live : "माझं नाव आहे रामदास, आम्ही करू मविआचा...", मतदानांतर आठवलेंची कविता

    राज्यात सध्या मतदान सुरू आहे. नेते मंडळी स्वत: मतदान केल्यानंतर जनतेलाही मतदानाचं आवाहन करत आहेत. अशात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत मतदानाचं आवाहन केलं आहे. 

    माझं नाव आहे रामदास...
    विजयाचा मला आहे विश्वास...
    महाराष्ट्राची आम्हाला आस... 
    आम्ही करू महाविकास आघाडीचा नास...

  • ADVERTISEMENT

  • 12:21 PM • 20 Nov 2024

    Maharashtra Election 2024 Live : प्रचाराला वेळ पुूरला नाही? मतदानाच्या दिवशीच काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

    राज्यात सगळीकडे सध्या मतदान सुरू आहे. नेतेमंडळीही मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले असून त्यांनी इतरांनाही मतदानाचं आवाहन केलं आहे. अशाच पंकजा मुंडे यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. प्रचाराला वेळ कमी पडल्याचं त्यांनी यावेली बोलून दाखवलं. पंकजा मुंडे म्हणाल्या, "मी भाजप कोअर कमिटीची नेता आहे. मी शक्य तितक्या सार्वजनिक मेळाव्यांना भेटी देण्याचा आणि उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला. पण वेळेच्या कमतरतेमुळे मी फक्त 40% सभांना उपस्थित राहू शकले, मात्र भाजप आणि महायुती बहुमत मिळून आम्ही सरकार स्थापन करणार असा विश्वासहीत्यांनी व्यक्त केला."

     

     

  • 12:09 PM • 20 Nov 2024

    Maharashtra Election 2024 Live : सिल्लोडमध्ये दोन गटांमध्ये तुफान हाणामारी, मतदान केंद्राबाहेर राडा

    सिल्लोडच्या घटाम्बरी गावामध्ये आज मतदानाच्या दिवशीच मतदान केंद्राबाहेर तुफान राडा झाल्याचं समोर आलं आहे. मतदान केंद्राजवळ दोन गट आमने-सामने आले आणि त्यानंतर काही वेळा त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर थेट हाणामारीला सुरूवात झाली. 

  • ADVERTISEMENT

  • 11:55 AM • 20 Nov 2024

    Maharashtra Election 2024 Live : नवी मुंबईत मतदान केंद्राबाहेर सापडले राऊटर, लॅपटॉप; नेमका प्रकार काय?

    नेरुळ येथील शिवाजीनगर मतदान केंद्रावर एका कारमध्ये काही इंटरनेट राऊटर आणि एक लॅपटॉप सापडला आहे. हे सर्व साहित्य कोणी आणि का आणलं याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. तसंच प्रकारणाचं गांभीर्य लक्षात घेता, कंपनीच्या मालकालाही पोलिसांनी घटनास्थळी बोलावलं आहे. राज्यभर सध्या मतदान सुरू आहे. त्यातच मतदान केंद्राच्या जवळ हे असं साहित्य सापडल्यानं मोठा संशय नि्र्माण झाला आहे. 

  • 11:49 AM • 20 Nov 2024

    Maharashtra Election 2024 Live : राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत कुठे किती मतदान? गडचिरोली सर्वात पुढे

     11 वाजेपर्यंत कुठे किती मतदान? 

     

    • अकोल्यात 16.35 टक्के मतदान
    • अमरावतीत 17.45 टक्के मतदान
    • अहमदनगरमध्ये 18.24 टक्के मतदान
    • बीडमध्ये 17.41 टक्के मतदान
    • भंडाऱ्यात 19.44 टक्के मतदान
    • बुलढाण्यात 19.23 टक्के मतदान
    • चंद्रपूरात 21.50 टक्के मतदान
    • औरंगाबादमध्ये  18.98 टक्के मतदान
    • धुळ्यात 20.11 टक्के मतदान
    • गडचिरोली  30 टक्के मतदान
    • गोंदियात 23.32 टक्के मतदान
    •  गडचिरोली आतापर्यंत सर्वाधीक 30 टक्के मतदान
    • कोल्हापूरात  20.59 टक्के मतदान
    • पुण्यात 15.64 टक्के मतदान
    • रायगडमध्ये 20.40 टक्के मतदान
    • सांगलीत18.55 टक्के मतदान
    • साताऱ्यात 18.72 टक्के मतदान
    • सोलापूरात 15.64 टक्के मतदान
    • ठाण्यात 16.63 टक्के मतदान
    • मुंबईत 15.78 टक्के मतदान
    • मुंबई उपनगरात  17.99 टक्के मतदान
    • नाशिकमध्ये 18.71 टक्के मतदान
    • नागपूरात 18.90 टक्के मतदान
  • 11:38 AM • 20 Nov 2024

    Maharashtra Election 2024 Live : महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांचा बोलबाला राहील, प्रकाश आंबेडकरांचं सूचक वक्तव्य


    वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यामध्ये मतदान केलं. त्यावेळी ते म्हणाले की, "महाराष्ट्राच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांचा फारसा प्रभाव राहणार नाही, असं भाकीत आम्ही यापूर्वीही केलं होतं. मला आता तसेच ट्रेंड दिसत आहेत. प्रादेशिक पक्षांचीच ताकद राहील असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. एकूण प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यातून त्यांना काय सूचित करायचं आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल. राज्यात सध्या अजित पवार यांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदेंची शिवसेना यांसारखे अनेक प्रादेशिक पक्ष मैदानात आहेत.

  • 11:28 AM • 20 Nov 2024

    Maharashtra Election 2024 Live : तुझा मर्डर फिक्स... सुहास कांदेंंची समीर भुजबळांना धमकी

    तुझा मर्डर फिक्स आहे अशी धमकी सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांना दिली आहे. नाशिकच्या नांदेगावमध्ये आज ऐन मतदानाच्या दिवशीच मोठा राडा पाहायला मिळतो आहे. नांदगावमध्ये सुहास कांदे हे ज्या मतदारांना घेऊन निघाले होते, त्यांना समीर भुजबळ यांनी काही आरोप करत अडवल्यानंतर या राड्याला सुरूवात झाली होती. त्यानंतर आमने-सामने आलेल्या सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यात काही वेळ बाचाबाची झाली. त्यानंतर पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत असताना तुझा मर्डर फिक्स अशी धमकी सुहास कांदे यांनी समीर भुबबळ यांना दिल्याचं दिसलं.

  • 11:06 AM • 20 Nov 2024

    Maharashtra Election 2024 Live : नाशिकमध्ये हायहोल्टेज ड्रामा

    नांदगावमध्ये ऐन मतदानाच्या दिवशीच हालहोल्टेज ड्रामा सुरू आहे. समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाल्याचं समोर आलंय. पोलीस यंत्रणाही या पार्श्वभूमीवर सतर्क झाल्या असून, दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा पोलिसांकडून प्रयत्न होतो आहे. 

  • 10:50 AM • 20 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 Live : मतदानाचा बक्क बजावल्यानंतर फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया

    राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी भरभरून मतदान करावे. लोकसभेत सिस्टीम स्लो होती.आता सुधारली आहे त्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल. यावेळी लाडक्या बहिणी मतदान करतील, टक्केवारी वाढेल. जनतेच प्रेम मिळत आहे म्हणून हास्य आहे.

  • 10:43 AM • 20 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 LIVE Updates : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्नी अमृता आणि आईसोबत मतदान केंद्रावर दाखल

    राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि आई सरितासोबत नागपूरच्या मतदान केंद्रावर पोहोचले आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी फडणवीस कुटुंब मतदान केंदावर दाखल झाले आहेत. आज राज्यात विधानसभा निवणडूक एकाच टप्प्यात पार पडणार असून सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. 

  • 10:30 AM • 20 Nov 2024

    Election 2024 News LIVE: भाजप काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची! नेमकं काय घडलं?

    चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात आज भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. जिल्हा परिषद कन्याशाळा येथे आझाद वार्ड, नेहरू वार्डचे बुथ आहेत. मतदारांना मदत करण्याकरीता येथे काँग्रेस व भाजप कार्यकर्ते लिस्ट घेऊन आले. सकाळी ९ च्या सुमारास आमदार बंटी  भांगडिया,  माजी आमदार मितेश भांगडिया हे याठिकाणी कार्यकर्त्यासह आले. तर जिल्हा परिषदचे माजी सदस्य गजानन बुटके हेही आपल्या काँग्रेस स्टॉलजवळ पोचले. त्यांच्यासोबत बॉऊन्सर होते. आमदार भांगडिया यांनी आक्षेप घेत बॉऊन्सरना जाण्यास सांगीतले. यामुळे केंद्राबाहेर बाचाबाची सुरू झाली. यानंतर घोषणा सुद्धा देण्यात आल्या. यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तणाव शांत केला. हे सर्व मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात घडले.

  • 10:15 AM • 20 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 LIVE Updates:: समीर भुजबळ यांना धमकी? नाशिकमध्ये काय घडतंय?

    मतदानाच्या दिवशीच नाशिकच्या नांदगाव मतदारसंघात मोठा राडा सुरू असल्याचं दिसतंय. सुहास कांदे यांनी त्यांच्या कॉलेजवर ऊसतोड कामकागारांना डांबून ठेवल्याचा आरोप समीर भुजबळ यांनी केले. समीर भुजबळ यांनी सर्व लोक पकडले असून, पैसे वाटप होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसंच सुहास कांदे यांनी येऊन समीर भुजबळ यांना तुझा खून करून टाकण्याची दिली धमकी दिल्याचंही समोर आलं आहे. 

     

  • 10:04 AM • 20 Nov 2024

    Maharashtra Election 2024 LIVE Updates: राहुल नार्वेकर संतापले, थेट अधिकाऱ्यांना फोन केला, नेमकं काय घडलं?


    राहुल नार्वेकर यांनी तक्रार करून जेष्ठ नागरिकांना त्यांची वाहने बूथजवळ नेऊ न देणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी निवडणूक आधिकाऱ्यांकडे केली आहे. मतदान झालं पाहिजे की नाही? असा सवाल करत त्यांनी पोलिसांना खडसावलं. राहुल नार्वेकर हे मतदान केंद्रावर गेले असता तिथे पोलीस वृद्ध मतदारांच्या वाहनांनाही मतदान केंद्राजवळ जाण्यासाठी विरोध करत होते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. हे पाहून राहुल नार्वेकर संतापले.

  • 09:41 AM • 20 Nov 2024

    Maharashtra Election News LIVE: रितेश-जेनिलिया यांचं जोडीने मतदान

    लातूरमध्ये रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांनी मतदान केलं. दोघेही जोडीने आपल्या खास स्टाईलमध्ये मतदान केंद्रावर हजर झाले, रांगेत उभं राहून रितेश आणि जेनिलिया यांनी मतदान केलं. यावेळी त्यांनी सर्वांना मतदान करण्याचं आवाहनही केलं आहे. 

  • 09:37 AM • 20 Nov 2024

    राज्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान

    राज्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान झाल्याचं समोर आलं आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. 

    रत्नागिरीमध्ये कुठे किती मतदान झालं?

    1. दापोली - 8.54%
    2. गुहागर - 9.96%
    3. चिपळूण- 10.14%
    4.  रत्नागिरी - 9.7%
    5. राजापूर- 8.89%

     

    नागपूर जिल्हा मतदान टक्केवारी

    एकूण टक्केवारी 6.86 % 

    हिंगणा  5.32 % 
    कामठी 6.71%
    काटोल 5.20 %
    नागपूर मध्य 6.14 %
    नागपूर नागपूर पूर्व 8 %
    नागपूर उत्तर 3.54 %
    नागपूर दक्षिण 8.40 %
    नागपुर दक्षिण पश्चिम 8.92 %
    नागपूर पश्चिम 7.50 %
    रामटेक 6.71 %
    सावनेर 7.25 %
    उमरेड 8.98 %
     

    कोणत्या जिल्ह्यात किती मतदान? 



    लातूरमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत 5.91टक्के मतदान

    नागपुरात 6.86 टक्के मतदान 

    नांदेडमध्ये 5.42 टक्के मतदान

    पालघर 7.30 टक्के मतदान 

    परभणी 6.59 टक्के मतदान 

    पुणे 5.53 टक्के मतदान 

    नंदुरबार 7.76 टक्के मतदान 

    नाशिकमध्ये 6.89 टक्के मतदान 

    धाराशिवमध्ये 4.85 टक्के मतदान 

    जळगावमध्ये 5.85 टक्के मतदान

    जालन्यात 7.51 टक्के मतदान

     

     

  • 09:25 AM • 20 Nov 2024

    Election 2024 LIVE Updates: भाजप कोणत्या थराला जाऊ शकतो हे दिसलं, सुप्रिया सुळेंवरील आरोपांना उत्तर

    भाजप कोणत्या थराला जाऊ शकते यांचं हे एक उदाहरण आहे असं म्हणत शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच ज्या व्यक्तिच्या संदर्भानं आरोप केले आहेत तो व्यक्ति तुरुंगात आहे, त्यामुळे फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही असं शरद पवार म्हणाले आङेत. तसंच त्यांनी विनोद तावडे यांच्याबद्दलच्या प्रकरणावरही माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य नसेल असं सांगितलं आहे. शरद पवार बारामतीमध्ये मतदानासाठी आले आहेत. 

    मतदान केल्यानंतर शरद पवार बोलत होते. "लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि मला विश्वास आहे की, महाराष्ट्रातील लोक मोठ्या संख्येनं शांततेत मतदान करतील." असं म्हणत त्यांनी आमचं सरकार येणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला. 
     

     

  • 09:00 AM • 20 Nov 2024

    Election 2024 News LIVE: राज्याचं लक्ष बारामतीवर, मतदानापूर्वी युगेंद्र यांचं आईकडून औक्षण

    राज्याचं लक्ष यंदा बारामती विधानसभा मतदारसंघावर असणार आहे. त्यातच आज मतदानाचा दिवस आहे, सर्व नेते मतदानाला बाहेर पडत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांविरोधात मैदानात आहेत. युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी मतदानापूर्वी युगेंद्र यांचं औक्षण केलं.

follow whatsapp

ADVERTISEMENT