Kunal Kamra : मुंबई पोलीस 'त्या' घरी पोहोचले, कुणाल कामरा म्हणाला, "मी 10 वर्षांपासून..."
Kunal Kamra: पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कॉमेडियन कुणाल कामराला वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. पण तो हजर झाला नाही.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कुणाल कामराच्या त्या घरी पोहोचले मुंबई पोलीस

कुणाल कामराला बजावलं होतं समन्स

पोलीस घरी पोहोचल्यानंतर कुणला कामराची पहिली प्रतिक्रिया
Kunal Kamra : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा सध्या पोलिसांच्या रडारवर आहे. सध्या मुंबई पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सोमवारी मुंबई पोलिसांचं एक पथक कुणाल कामराच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. जेव्हा पोलीस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा, कुणाल कामराने पहिल्यांदाच त्यावर प्रतिक्रिया दिली. 10 वर्षांपासून मी जिथे राहतच नाही, तिथं जाणं म्हणजे वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे असं कुणाल कामरा म्हणाला आहे.
हे ही वाचा >> 'संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेचा खून?', संपूर्ण प्रकरण जसंच्या तसं
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कॉमेडियन कुणाल कामराला वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. पण तो हजर झाला नाही. शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीच्या आधारे 24 मार्चला एफआयआर नोंदवून पोलिसांनी यापूर्वी कामराला दोन समन्स पाठवले होते.
घरी पोलीस पोहोचल्याची माहिती मिळाल्यानंतर, कुणाल कामरा त्यावर व्यक्त झाला. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये कुणालने म्हटलं, "जिथे मी गेल्या 10 वर्षांपासून राहतच नाही, तिथे जाणं म्हणजे तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे.'
मुंबईत ३ वेगवेगळे गुन्हे दाखल
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल कामराविरुद्ध खार पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. एक तक्रार जळगाव शहराच्या महापौरांनी केली आहे. तर इतर दोन गुन्हे नाशिकमधील हॉटेल व्यावसायिक आणि एका व्यावसायिकाने दाखल केले आहेत.
हे ही वाचा >> Viral Girl Monalisa ला मोठा झटका, अभिनेत्री बनवणाऱ्या दिग्दर्शकाला अटक.. हादरवून टाकणारी गोष्टी आली समोर!
खरं तर, 23 मार्च रोजी रिलीज झालेल्या एका एपिसोडमध्ये कुणाल कामराने 1997 च्या 'दिल तो पागल है' चित्रपटातील गाण्याच्या चालीवर विडंबन केलं होतं. ज्यामध्ये त्यानं एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांना लक्ष केलं होतं.
मी माफी मागणार नाही : कामरा
या घटनेनंतर लगेचच कुणाल कामराने शिंदेंबद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. कामराने म्हटलं होतं, 'मी माफी मागणार नाही... मी या जमावाला घाबरत नाही. लपून बसत हे शांत होण्याची वाट पाहणार नाही.'