Maharashtra Budget 2025: मुंबईकरांचा 'हा' प्रवास फक्त 10 मिनिटात, प्रचंड मोठी घोषणा
वांद्रे ते वर्सोवा हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात करता येणार आहे. कारण यासाठी सरकारने एक मोठा प्रकल्प हाती घेतला असून त्याबाबत अर्थसंकल्पात घोषणा देखील करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वांद्रे ते वर्सोवा हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात

मुंबईत अनेक मोठ्या प्रकल्पांची कामं सुरू

अर्थसंकल्पात सरकारने काय केली घोषणा?
मुंबई: राज्य अर्थसंकल्पात सरकारने राज्याच्या रस्ते विकासासाठी भरीव आर्थिक तरतूद जाहीर केली असून, यामुळे शहरे आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुकर होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना रस्ते विकासासाठी हजारो कोटींची गुंतवणूक जाहीर केली आहे. याचवेळी त्यांनी मुंबईकरांसाठी गुड न्यूजही दिली आहे.
मुंबईकरांना प्रवास सुखकर व्हावा यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात नव्या रस्ते बांधणीची कामं सरकारने हाती घेतली आहे. त्याचविषयी अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली असून त्याबाबत करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदीची माहितीही यावेळी देण्यात आली आहे.
हे ही वाचा>> Maharashtra Budget: लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की 1500 रुपयेच, अजितदादांनी नेमकी काय केली घोषणा
वांद्रे ते वर्सोवा अवघ्या 10 मिनिटांचा प्रवास
मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि पश्चिम उपनगरातील दळणवळण सुलभ करण्यासाठी वांद्रे ते वर्सोवा दरम्यान 14 किमी लांबीचा सागरी सेतू बांधण्याचे काम सुरू आहे.
वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू पूर्ण झाल्यानंतर, वांद्रे ते वर्सोवा हे अंतर अवघ्या 10 मिनिटांत पार करता येईल. भविष्यात, हा सेतू वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडशी जोडला जाणार आहे, ज्यामुळे मरीन ड्राइव्ह ते दहिसर हा दीड तासांचा प्रवास फक्त 45 मिनिटांत पूर्ण करता येईल.
या प्रकल्पाच्या यशस्वी पूर्णतेमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि पश्चिम उपनगरातील नागरिकांच्या दळणवळणात लक्षणीय सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे.
हे ही वाचा>> Maharashtra Budget 2025: अजितदादांचं Dream बजेट तुम्ही पाहिलं का? 5 वी घोषणा तर...
मुंबई आणि राज्यातील इतर मोठ्या प्रकल्पांबाबतही घोषणा
1. उत्तन ते विरार सागरी सेतू:
उत्तन ते विरार सागरी सेतू व जोडरस्त्यांचा 55 किलोमीटर लांबीचा 87 हजार 427 कोटी रुपये किंमतीचा प्रकल्प हाती घेणार
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उत्तन ते विरार दरम्यान 55 किमी लांबीचा सागरी सेतू बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रकल्प मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि उपनगरांतील दळणवळण सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.
लांबी आणि रचना: 55 किमी लांबीच्या या सागरी सेतूमध्ये चार मार्गिका आणि एक आपत्कालीन मार्गिका असेल. प्रत्येक बाजूची रुंदी अंदाजे 19.5 मीटर असेल.
जोडणी: हा सेतू दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंटशी जोडला जाणार आहे, ज्यामुळे नरिमन पॉइंट ते विरार हा प्रवास अवघ्या काही तासांत पूर्ण होऊ शकतो.
खर्च: प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे 87000 कोटी आहे. या प्रकल्पासाठी जपानच्या जीका (JICA) संस्थेकडून कर्ज उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सध्याची स्थिती: प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार असून, तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर निधी उभारणीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल.
मच्छीमारांचा विरोध: उत्तन येथील मच्छीमारांनी या प्रस्तावित सागरी सेतूला विरोध दर्शविला आहे. त्यांचा दावा आहे की सेतू बांधल्यामुळे समुद्रातील पाण्याच्या प्रवाहात बदल होऊन त्यांच्या बोटींच्या मार्गावर परिणाम होईल, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
उत्तन ते विरार सागरी सेतू प्रकल्प मुंबईतील दळणवळण सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, परंतु स्थानिक मच्छीमारांच्या चिंता आणि पर्यावरणीय परिणामांचा विचार करूनच पुढील पावले उचलणे आवश्यक आहे.
2. पुणे ते शिरुर उन्नत मार्ग:
पुणे ते शिरुर या 54 किलोमीटर लांबीच्या 7 हजार 515 कोटी रुपये किंमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेणार
3. तळेगाव ते चाकण उन्नत मार्ग:
तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग- 6 हजार 499 कोटी रुपये खर्च अपेक्षित