Mushtaq Khan : विमानाने बोलावून अपहरण केलं, अभिनेते 'मुश्ताक खान' कसे पळाले? थरारक कहाणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुश्ताक खान यांच्या अपहरणाची थरारक कहाणी

point

आरोपींनी विमानाचं तिकीटही काढून दिलं

point

मुश्ताक खान अपहरण कर्त्यांच्या तावडीतून कसे सुटले?

Mushtak Khan Kidnapping Case :  कॉमेडियन सुनील पाल यांचं अपहरण करण्यापूर्वी बिजनौर टोळीने बॉलिवूड अभिनेता मुश्ताक खान यांच्याकडूनही पैसे उकळले होते. नोव्हेंबरमध्ये मुश्ताक खान यांना एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. त्यांच्यासाठी मुंबई ते दिल्ली विमान तिकिटाची व्यवस्थाही करण्यात आली. तसंच बिजनौरची एक स्कॉर्पिओ दिल्ली विमानतळावरून त्यांना पिकअप करण्यासाठी आली होती अशी माहिती समोर आली आहे. 

ADVERTISEMENT

अभिनेता मुश्ताक मोहम्मद खान यांचा इव्हेंट मॅनेजर शिवम यादव यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीमध्ये म्हटलं की, 15 ऑक्टोबर रोजी मेरठमधील राहुल सैनी नावाच्या व्यक्तिने ज्येष्ठ लोकांच्या सन्मानासाठी आयोजित कार्यक्रमाबाबत मुश्ताक खान यांच्याशी चर्चा केली. राहुल सैनी यांनी कार्यक्रमासाठी रक्कम भरली आणि 20 नोव्हेंबरसाठी मुंबई ते दिल्ली विमानाचे तिकीटही बुक करुन दिलं. 20 नोव्हेंबर रोजी दिल्ली विमानतळावर  पोहोचल्यानंतर मुश्ताक खान यांना घ्यायला राहुल सैनी यांनी स्कॉर्पिओ गाडी पाठवली. याच गाडीतून मुश्ताक खान यांना मेरठला आणलं जाणार होतं. या गाडीमध्ये ड्रायव्हरसोबत आणखी एक व्यक्ती प्रवास करत होती.

हे ही वाचा >> Nana Patekar : "मी अभिनेता नसतो, तर अंडरवर्ल्डमध्ये...", 'त्या' घटनेबद्दल बोलताना काय म्हणाले नाना पाटेकर?

विमानतळाहून निघाल्यानंतर जैन शिकंजी या एका स्टॉपजवळ गाडी थांबवून मुश्ताक यांना दुसऱ्या गाडीत बसवलं. स्कॉर्पिओचा चालकच ही गाडी चालवण्यााठी बसला. काही अंतर पुढे गेल्यावर आणखी दोघेजण गाडीत बसले. मुश्ताक खान यांना संशय यायला लागला आणि या सर्व प्रकाराला त्यांनी विरोध केला. मात्र आरोपींनी धमक्या देत त्यांचं अपहरण केलं आणि अज्ञातस्थळी नेलं. त्यानंतर त्यांचा मोबाईल काढून त्यांच्या खात्यातून दोन लाख रुपये आपल्याकडे ट्रान्सफर करुन घेतले.

हे वाचलं का?

मुश्ताक खान यांना दोन दिवस डांबून ठेवलं

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुश्ताक खान यांचं अपहरण केल्यानंतर त्यांना बिजनौरमध्ये आणण्यात आलं होतं. तिथे त्यांना दोन दिवस डांबून ठेवण्यात आलं होतं. 23 नोव्हेंबरला मुश्ताक अहमद कसेबसे तिथून निसटले. मुश्ताक खान यांना मोहल्ला चहशिरीमध्ये ठेवलं होतं अशी माहिती आहे.

मशिदीत घेतला आश्रय


आरोपींनी दारूची पार्टी केली आणि मुश्ताक खान यांना त्रास दिला. मुश्ताक मोहम्मद खान हे रात्रभऱ बदमाशांच्या तावडीत होते तेव्हा ते जंगलात आहेत की शहरात हेच आपल्याला कळलं नाही असं त्यांनी सांगितलं. 21 नोव्हेंबरच्या सकाळी जेव्हा त्यांनी अजानचा आवाज ऐकला, तेव्हा त्यांना समजलं की ते वस्ती असलेल्या भागातच आहेत. त्यानंतर गुंड दारूच्या नशेत असतानाच मुश्ताक अहमद आपलं सामान सोडून फक्त बूट घेऊन पळाले. चहशिरी येथील मशिदीत त्यांनी त्यावेळी आश्रय घेतला.

ADVERTISEMENT

 

हे ही वाचा >> Maharashtra Politics Live Updates : परभणीमध्ये वातावरण पेटलं, बंददरम्यान जाळपोळ-दगडफेक

 

ADVERTISEMENT

मशि‍दीमध्ये पोहोचल्यानंतर त्याच मशि‍दीच्या मौलानाच्या फोनवरून मुश्ताक खान यांनी आपल्या मुलाला फोन केला होता. शिवम यादव यांनी दिलेल्या  माहितीनुसार, मुंबईहून बिजनौरला एवढ्या लवकर जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे गाझियाबाद आणि दिल्लीहून त्यांनी ओळखीचे लोक तिथे पाठवले. हे सर्व लोक तिथे पोहचेपर्यंत मुश्ताक अहमद मशिदीतच राहिले. या प्रकरणाचा मुश्ताक अहमद यांना एवढा मोठा धक्का बसला की त्यांनी जेवणही केलं नाही. त्यानंतर मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांना दोन दिवस रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.

अभिनेता सुनील पाल आणि मुश्ताक मोहम्मद खान यांच्या अपहरणातील दोन मुख्य आरोपी लवी पाल आणि अर्जुन कर्णवाल यांना पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली आहे. एका कार्यक्रमात परफॉर्म करण्याच्या बहाण्याने आरोपींनी दोन्ही कलाकारांना विमानाने बोलावून त्यांचं अपहरण करून 10 लाख रुपयांची खंडणी वसूल केली. आरोपींनी मेरठमधील एका ज्वेलर्सच्या शोरूममध्ये खंडणीच्या पैशातून खरेदीही केली होती. यावेळी दोघेही सीसीटीव्हीत कैद झाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT