Nagpur Violence : दंगलीची पोस्ट, बांगलादेश ते थेट फेसबूक कंपनीशी संपर्क... नागपूर सायबरसेलनं सगळंच काढलं

मुंबई तक

सोशल मीडियाचा वापर फक्त द्वेष पसरवण्यासाठी होत नसून, त्यामाध्यमातून अफवाही पसरवल्या जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचा दावा अनेक पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नागपूरमधील दंगलीबद्दल बांगलादेशमधून केली पोस्ट

point

फेसबूक पोस्टमधून दिला होता दंगलीचा इशारा?

point

नागपूर सायबर सेलच्या तपासात काय सापडलं, वाचा सविस्तर...

Nagpur Violence : नागपूर हिंसाचाराचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या सायबर सेलला धक्कादायक माहिती मिळाली आहे. नागपूर पोलिसांच्या सायबर सेलने बांगलादेशातून चालवलं जाणारं एक सोशल मीडिया खातं आयडेंटीफाय केलं आहे. याच अकाऊंटवरुन नागपुरात मोठ्या प्रमाणावर दंगल भडकवण्याची धमकीही दिली होती. माहिती देताना नागपूर पोलिसांच्या सायबर सेलने सांगितले की, नागपुरात दंगल भडकवण्यासाठी बांगलादेशी फेसबुक अकाऊंटची ओळख पटली असून, त्यात मोठ्या प्रमाणावर दंगल भडकवण्याची धमकी दिली होती.

एका बांगलादेशी युजरने केलेल्या पोस्टमध्ये 'मोठ्या दंगलीचा इशारा' दिला होता. त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, 'सोमवारची दंगल ही एक छोटीशी घटना होती. भविष्यात आणखी मोठी दंगल होणार आहे.'

हे ही वाचा >> Beed Crime : बीडमध्ये अल्पवयीन तरुणाला घेरून मारलं, तीच पद्धत आणि तसाच व्हिडीओ व्हायरल, प्रकरण काय?

सायबर सेलनं फेसबुकशी केला संपर्क 

पोलिसांनी सांगितलं की, हे खातं चालवणारी व्यक्ती बांगलादेशचा रहिवासी आहे. त्यानं हा संदेश बांगलादेशातूनच पोस्ट केला असल्याचं तपासात समोर आलं आहे. सायबर सेलने फेसबुकशी संपर्क साधून ते खाते ब्लॉक करण्याचं आवाहन केलं आहे.

खोट्या अफवा पसरवणाऱ्या 97 पोस्टची

पोलिसांनी सांगितलं की, तपासाच्या आधारे आतापर्यंत अशा 97 पोस्ट शोधण्यात आलेल्या आहेत ज्या चुकीची माहिती किंवा अफवा पसरवत होत्या. सोशल मीडियाचा वापर फक्त द्वेष पसरवण्यासाठी होत नसून, त्यामाध्यमातून अफवाही पसरवल्या जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. गेल्या दोन दिवसांत दंगलीत जखमी झालेल्या दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचा दावा अनेक पोस्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र, ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे.

50 हून अधिक आरोपींना अटक

सायबर सेलने लोकांना आवाहन केलं आहे की, सोशल मीडियावरील कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू नका. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन नागपूर पोलिसांनी मुख्य आरोपी फहीम खानसह 50 हून अधिक जणांना अटक केली आहे.

खुलताबादमध्ये सुरक्षा वाढवली 

खुलदाबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कबरीच्या मागे तात्पुरती पत्रेही लावण्यात आले आहेत. खुलदाबादकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर आधीच बॅरिकेड्स लावण्यात आले होते. आता कबरीकडे प्रवेश करण्यासाठी आधारकार्ड दाखवणं आणि मोबाईल फोन बाहेर ठेवणंही अनिवार्य करण्यात आलं आहे.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp