Nanded : व्हिडीओ कॉलवरुन विद्यार्थीनीचा विनयभंग, पिडितेच्या कुटुंबानं चोप दिल्यानंतर मुख्याध्यापकानं विष प्राशन...

मुंबई तक

मुख्याध्यापकाच्या कुटुंबीयांनी पीडित विद्यार्थिनी, तिचे आई-वडील आणि भावाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलीस आता दोन्ही बाजूंचा तपास करत आहेत. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नांदेडमध्ये घडलेल्या घटनेनं सर्वत्र खळबळ

point

पेपर तपासण्याच्या निमित्ताने विद्यार्थीनीला व्हिडीओ कॉल

point

विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याच्या आरोपात पालकांकडून मारहाण

point

शिक्षकानं उचललं थेट टोकाचं पाऊल

Nanded Crime News : नांदेडमध्ये एका विद्यार्थीनीसोबत संतापजनक प्रकार घडला. नांदेडमध्ये असलेल्या एका माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुनील करमुंगे (वय 50) यांनी अल्पवयीन विद्यार्थिनीचा व्हिडिओ कॉलवरून लैंगिक छळ केल्याचा प्रकार घडला आहे. नांदेड शहराजवळील पळसदगावमध्ये ही शाळा आहे. दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला पेपर तपासण्याच्या बहाण्याने या शिक्षकाने हा प्रकार केला. यानंतर विद्यार्थीनीने पालकांना कळवल्यानं ही घटना उघडकीस आली.


मुख्याध्यापकाने मोबाइलवर व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्य केल्याचं मुलीने आपल्या पालकांना सांगितं. त्यानंतर संतप्त कुटुंबीयांनी मुख्याध्यापकाला बोलवून घेत जोरदार चोप दिला. यानंतर विद्यार्थीनीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्यानं पोलिसांनी मुख्याध्यापकावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. ही माहिती कळताच समजताच सुनील करमुंगे घाबरले. आपली बदनामी होईल असं त्यांना वाटल्यानं त्यांनी थेट विष प्राशन केलं.

हे ही वाचा >> पंतप्रधान मोदी 2014 नंतर पहिल्यांदा RSS मुख्यालयात, 'या' प्रकल्पांचं करणार उद्घाटन, वाचा यादी...

कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र शुक्रवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी सुनीलने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ज्यामध्ये पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी माझा मानसिक छळ केला, त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचं त्याने म्हटलं आहे.

मृत मुख्याध्यापकाच्या कुटुंबीयांनी पीडित विद्यार्थिनी, तिचे आई-वडील आणि भावाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलीस आता दोन्ही बाजूंचा तपास करत आहेत. 

आता  शाळांमध्येही मुलं सुरक्षित आहेत की नाही? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. काही महिन्यांपूर्वीही नांदेडमध्ये एका प्राचार्यावर विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप झाला होता. 

हे ही वाचा >> हिंदू व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्याच्या जावेद खान यांना थेट उद्धव ठाकरेंचा फोन म्हणाले, 'तुम्हाला तर...'

दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत, असं शिवाजीनगरचे पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे यांनी सांगितलं. या घटनेमुळे शिक्षक-विद्यार्थ्याच्या पवित्र नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. तसंच समाजात संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp