Sharad Pawar: "नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य मूर्खपणाचं...", पत्रकार परिषदेत शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar On Neelam Gorhe: "नीलम गोऱ्हेंच्या राजकीय वक्तव्यावर संजय राऊत यांनी म्हटलंय की, साहित्य महामंडळाने माफी मागितली पाहिजे. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, संजय राऊत यांनी जे सांगितलं आहे, ते..."
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शरद पवारांनी घेतला नीलम गोऱ्हेेंचा समाचार

"महाराष्ट्राच्या विधिमंडळात चार टर्म झाल्या..."

शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या राजकीय वक्तव्यावर संजय राऊत यांनी म्हटलंय की, साहित्य महामंडळाने माफी मागितली पाहिजे. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, संजय राऊत यांनी जे सांगितलं आहे, ते शंभर टक्के बरोबर आहे. प्रश्न असा आहे की, नीलम गोऱ्हेंनी या संबंधीचं भाष्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती, असं माझं मत आहे. या अधिवेशनात सगळ्यांचा सहभाग आहे. त्याच्यात नाही त्या गोष्टी करायचं काय कारण नव्हतं. महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन त्यांना चार टर्म झाल्या असाव्यात. या सर्व चार टर्म कशा मिळवल्या आहेत, या सर्व महाराष्ट्राला माहिते. मर्यादित काळात चार पक्षांचा अनुभव त्यांनी घेतलेला दिसतोय. हा स्वत:चा अनुभव लक्षात घेता, त्यांनी असं भाष्य केलं नसतं तर योग्य झालं असतं. नीलम गोऱ्हेचं वक्तव्य मूर्खपणाचं आहे, असं म्हणत शरद पवार यांनी नीलम गोऱ्हेंवर हल्लाबोल केला.
'मी कोणाचा सत्कार करायचा यासाठी परवानगी घ्यावी का? असं जर असेल तर मी हे लक्षात ठेवतो', असं म्हणत शिंदेंच्या सत्कारावर पवारांनी उपाहासात्मक टीपण्णी केली. साहित्य संमेलनाचे दोन्ही कार्यक्रम यशस्वी झाले. साहित्य संमेलनाला उत्सफूर्त प्रतिसाद होता. साहित्य संमेलनाचा कार्यक्रम तालकोटरा स्टेडियममध्ये होता. नरेंद्र मोदींचा कार्यक्रम हा वेगळ्या ठिकाणी होता. देशाच्या कानाकोपऱ्यातून मराठी भाषिकांनी संमेलनाला गर्दी केली होती. साहित्य संमेलन यशस्वी झालं, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. साहित्य संमेलन म्हटलं की वाद हे होतातच, असंही पवार म्हणाले.
हे ही वाचा >> "ज्यांची नावं चुकीच्या कामात सामील आहेत, त्यांना मी...", माणिकराव कोकाटेंबाबत CM फडणवीस काय म्हणाले?
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही नीलम गोऱ्हेंवर सडकून टीका केलीय. सुषमा अंधारे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, दोन मर्सिडीज दिल्या असं म्हणत असतील, तर त्यांनी त्यांच्या 2 मर्सिडीज कुठून आणल्या? त्यांची कुठली मालमत्ता आहे, जी 250 कोटींची आहे. त्यांची मालमत्ता आता तपासावी लागेल. साहित्य संमेलनमध्ये ज्याला बोलावलं जातं, त्याचा किमान चारोळी लिहली असावी मग, त्यांना तिथे कशाला बोलावलं होतं?" असा सवाल उपस्थित करत अंधारेंनी नीलम गोऱ्हेंचा समाचार घेतला.