NCP : 'माझ्याऐवजी अजित पवार प्रदेशाध्यक्षही झालेले...' जयंत पाटलांचा 'चावडी'वर गौप्यस्फोट

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

जयंत पाटील यांनी मुंबई तकच्या चावडीवर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पक्षात काय घडामोडी घडत होत्या. याबाबतचा किस्सा सांगितला.
ncp political crisis ajit pawar jayant patil mumbai taj chawadi sharad pawar election commission maharashtra politics
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तुम्ही (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष व्हा मी विरोधी पक्षनेता होतो

point

(अजित पवार) ते प्रदेशाध्यक्ष झालेच असते

point

जयंत पाटलांनी सांगितला तो किस्सा

Jayant Patil Mumbai Tak Chawadi : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार (Ajit Pawar) गटाला बहाल केले आहे. त्यामुळे अधिकृतपणे आता अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा शिक्कामोर्तब झालं. असे असले तरी राष्ट्रवादीच्या फुटीदरम्यान नेमक्या पक्षात काय घडामोडी घडलेल्या? आमदारांनी शरद पवारांची (Sharad Pawar) साथ का सोडली? पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून काय घडामोडी घडत होत्या? तसेच शरद पवार गटाची पुढची वाटचाल कशी असणार आहे? या सर्व प्रश्नांवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबई तक चावडीवर दिलखुलास उत्तरे दिली आहेत.  (ncp political crisis ajit pawar jayant patil mumbai taj chawadi sharad pawar election commission maharashtra politics) 

ADVERTISEMENT

जयंत पाटील यांनी मुंबई तकच्या चावडीवर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पक्षात काय घडामोडी घडत होत्या. याबाबतचा किस्सा सांगितला. जयंत पाटील म्हणाले, पवार साहेबांनी मलाला सांगितेलेल, (अजित पवार)  त्यांची इच्छा दिसतेय, आपण त्यांच्यावर जबाबदारी द्यायला तुमची हरकत आहे का? मी म्हटलं माझी काहीच हरकत नाही. या उलट ते (अजित पवार) ज्यावेळेस विरोधी पक्षनेते झाले. त्यावेळेसच मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष व्हा मी विरोधी पक्षनेता होतो. ही आमची चर्चा मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांच्यासमोर झाली होती. त्यामुळे तो प्रॉब्लेम नव्हता, असे जयंत पाटील सांगतात. 

हे ही वाचा : Balu More : शिवसेनेनंतर भाजप नेत्याचा गोळीबारात घेतला जीव

हे वाचलं का?

दरम्यान पुढे 30 तारखेला आमची बैठक झाली, मी आणि पवार साहेब समोरासमोर बसलो होतो. त्यावेळेस पहिली फळी (फ्रंटल ऑर्गनायझेन) चेंज करण्याचं ठरलं होते. पवार साहेब इतके मुरब्बी आहेत की, त्यांनी त्यावेळेस 6 तारखेला सुनील तटकरे यांच्या नावानीशी पत्रक काढून बैठक बोलावली आणि ती बैठक माझ्या सहीने न बोलवता त्यांच्या सहीने बोलावली होती. त्यामुळे (अजित पवार) ते प्रदेशाध्यक्ष झालेच असते. पण त्यांनी गडबड केल्याचे अजित पवार सांगतात. 

हे ही वाचा : 'तुमच्या मनोरुग्ण स्वभावाचे..', BJPचा ठाकरेंवर पलटवार

ADVERTISEMENT

ते  (अजित पवार) वारंवार सांगायचे मला दिल्लीत काहीच इच्छा नाही. पण आता त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव लागलं. या सगळ्यांनी घोड्यावर बसवलं म्हणून आहेत ते, पण त्यांना दिल्लीला जाययी काहीच इच्छा नव्हती, असे देखील जयंत पाटील यांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT