रत्नागिरी: होळीदरम्यान मशिदीचा गेट तोडला? काय खरं-काय खोटं.. नेमकं प्रकरण काय?
रत्नागिरीत होळी मिरवणुकीत मशिदीचे गेट तोडल्याचा एका व्हिडिओ व्हायरल झाल्याने परिसरात वातावरण तापलं होतं. पण आता ही नेमकी घटना काय याबाबत सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT

रत्नागिरी: रत्नागिरी येथील एका मशिदीच्या गेटवर काही लोक झाडाच्या खोडाने हल्ला केल्याच एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानं परिसरात अचानक वातावरण तापलं. या घटनेवरून आता राजकीय टीका टिप्पणी सुरू झाली आहे. दरम्यान, मशिदीजवळ घोषणाबाजी आणि बेकायदेशीर सभा घेतल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे.
कोकणात होळीच्या वेळी काढल्या जाणाऱ्या शिमगा मिरवणुकीदरम्यान 12 मार्च रोजी ही घटना घडल्याचे वृत्त आहे. जेव्हा मिरवणूक एका मशिदीच्या गेटजवळ पोहोचली तेव्हा जमावातील लोकांनी गेटवर हल्ला केला, ज्यामुळे तो तुटला.
हे ही वाचा>> Mumbai : मुंबई पोलिसांकडून मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, हिंदी मालिकेतील अभिनेत्रीला...
मिरवणूक का काढली गेली?
ही दोन किलोमीटर लांबीची मिरवणूक वार्षिक कार्यक्रम होती, जी जवळच्या मंदिरात संपत असे. परंपरेनुसार, मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोक हे एक लांब झाडाचे खोड घेऊन पुढे जात होते. जे मशिदीच्या पायऱ्यांवर ठेवलेल होते. कथितपणे, काही लोकांनी मशिदीच्या त्या खोडाने गेटवर धडक मारण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे इथे घोषणाबाजी सुरू झाली.
तथापि, पोलिसांनी सांगितले की, मशिदीत जबरदस्तीने प्रवेश करण्यात आला नव्हता आणि पोलिसांनी ताबडतोब हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांनी फेटाळून लावला दावा
रत्नागिरीचे एसपी धनंजय कुलकर्णी म्हणाले, "राजापूर घटनेत, मिरवणुकीत वापरल्या जाणाऱ्या झाडाच्या खोडाला पारंपारिकपणे धार्मिक स्थळांवर स्पर्श केला जातो. मशिदीतही असेच करण्यात आले होते, त्यामुळे मशिदीवर हल्ला झाला नाही. काही तरुणांनी घोषणाबाजी केली पण आम्ही या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे."
हे ही वाचा>> Palghar Crime : बेेवारस सुटकेस लहान मुलांनी उघडली, सुटकेसमध्ये जे सापडसलं ते पाहुन सगळेच हादरले
या घटनेनंतर सोशल मीडियावर एक नवीन वाद सुरू झाला ज्यामध्ये राजकीय नेत्यांनीही आपले विचार मांडले. काहींनी या घटनेवर कारवाईची मागणी केली तर काहींनी असा दावा केला की पारंपारिक कार्यक्रमाव्यतिरिक्त कोणतीही तोडफोड झाली नाही.
या मुद्द्यावरून राजकारण तापलं
आमदार आणि शिवसेना नेते निलेश राणे यांनी एका व्हिडिओ संदेशात आरोप केला आहे की, ही घटना उगाच मोठी करून सांगितली जात आहे. त्यांच्या मते, मशिदीचे गेट बंद असल्याने परिस्थिती काहीशी चिघळली होती. त्यांनी या भागात जातीय अशांततेचे वृत्तही फेटाळून लावले.
राणे म्हणाले, "उत्सवादरम्यान आम्ही कोणताही गोंधळ होऊ देणार नाही. एक मिरवणूक दोपेश्वर मंदिराकडे जात होती आणि परंपरेनुसार ती एका मशिदीजवळून जाते. या वर्षी मशिदीचे दार बंद करण्यात आले. दोन्ही बाजूंनी काही घोषणाबाजी करण्यात आली, परंतु परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली."
त्यांनी यावेळी असाही आरोप केला की, "काही राजकारणी आणि माध्यमे परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, जे खरे नाही. रत्नागिरीतील परिस्थिती शांत आहे."
'कायदा त्याचे काम करेल का?'
दरम्यान, AIMIM नेते असदुद्दीन ओवैसी यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले की सरकार योग्य कायदेशीर कारवाई करेल का? त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "देवेंद्र फडणवीस साहेब, कायदा आपले काम करेल का? पोलिसांच्या उपस्थितीत मशिदीवर हल्ला झाला हे लज्जास्पद आहे."
महाराष्ट्रातील वकील ओवेस पेचकर यांनी रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून दोन्ही समुदायांमधील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली.
'मशिदीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न...'
इंडिया टुडेशी बोलताना पेचकर म्हणाले, "मशिदीत झाडाचे खोड किंवा मिरवणूक येण्याची कोणतीही परंपरा नाही. तरावीहच्या नमाजाच्या वेळी मशिदीचा दरवाजा तोडण्याचा जो प्रयत्न करण्यात आला त्याने सुसंवाद बिघडला आहे."
दंगल भडकवणे, शत्रुत्वाला प्रोत्साहन देणे, प्रार्थनेचे ठिकाण अपवित्र करणे आणि धार्मिक भावना दुखावणे यासारख्या इतर आरोपांखाली गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
पोलिसांनी सांगितले की ही बातमी दिशाभूल करणारी
दरम्यान, पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम 135 अंतर्गत बेकायदेशीर जमवाजमव केल्याबद्दल अज्ञात आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि कोणीतरी परिसरातील परिस्थितीबद्दल चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्याचा आरोप केला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, परिस्थिती शांत आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न नाही.