PM मोदींनी आधी शिवाजी महाराजांची मागितली माफी, पण नंतर विषय नेला सावरकरांकडे...

मुंबई तक

ADVERTISEMENT

 वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून PM मोदींनी विरोधकांवर साधला निशाणा
वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून PM मोदींनी विरोधकांवर साधला निशाणा
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांचा पुतळा प्रकरणी मोदींनी मागितली माफी

point

पंतप्रधान मोदींनी माफी मागितल्यानंतर काँग्रेसवर साधला निशाणा

point

'सावरकरांचा अपमान करणारी लोकं माफी मागत नाही', मोदींचा काँग्रेसवर हल्ला

पालघर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालघर येथील वाढवण बंदराच्या उद्घाटनासमयी केलेल्या भाषणात एक मोठं विधान केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी सिंधुदुर्ग येथे जो शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याप्रकरणी जाहीर माफी मागितली आहे. पण याच माफीनाम्यानंतर पंतप्रधान मोदींनी थेट वीर सावरकरांचा मुद्दा पुढे करत काँग्रेसवर हल्लाबोल केला तर दुसरीकडे शिवसेना (UBT) ला देखील कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. (pm modi first apologized to shivaji maharaj but then moved topic to the opposition criticism of veer savarkar)

ADVERTISEMENT

शिवाजी महाराजांची माफी मागितल्यानंतर अचानक सावरकरांचा विषय का काढला?, पाहा PM मोदी काय म्हणाले?

'मागील काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये जे घडलं माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव किंवा राजा, महाराजा नाही तर आमच्यासाठी शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहेत. मी आज मान झुकवून माझे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या चरणापाशी माझं मस्तक टेकवून माफी मागतो.'

हे ही वाचा>> Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मालवण पुतळा दुर्घटनेत पहिला आरोपी गजाआड, चौकशीतून नवीन माहिती समोर येणार?

'आमचे संस्कार वेगळे आहेत. आम्ही ती लोकं नाहीत की जे भारतमातेचे महान सुपुत्र वीर सावरकर यांना शिवीगाळ करतात. अपमान करतात त्यांचा.. देशभक्तांच्या भावनांचा अनादर करतात. त्यानंतरही ही लोकं वीर सावरकरांची माफी मागण्यास तयार नाहीत. कोर्टात जाऊन लढाई लढण्यास ही लोकं तयार आहेत.'

हे वाचलं का?

'एवढ्या मोठ्या सुपुत्राचा अपमान करून ज्यांना पश्चताप होत नाही अशा लोकांचे संस्कार काय आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेने जाणून घ्यावं.'

'पण आमचे  हे  संस्कार आहेत की, मी महाराष्ट्राच्या भूमीत आल्यानंतर पहिलं काम हे मी आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची माफी मागण्याचं करत आहे.'

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> PM Modi: 'मी नतमस्तक होऊन माफी मागतो', शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी PM मोदींचा माफीनामा

'एवढंच नव्हे तर जी लोकं शिवाजी महाराज यांना आराध्य दैवत मानतात त्यांच्या हृदयाला जो धक्का बसलाय मी अशा लोकांचीही विनम्रपणे माफी मागतो. माझे संस्कार वेगळे आहेत. माझ्यासाठी आराध्य दैवतापेक्षा कोणीही मोठं नाही.' असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. 

ADVERTISEMENT

सावरकरांच्या मुद्द्यावरून विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न? 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याप्रकरणी माफी मागितल्यानंतर अचानक वीर सावरकर यांच्यावर जी टीका केली जाते त्यावर भाष्य करत या सगळ्या प्रकरणाला एक वेगळं देण्याचा प्रयत्न केला. 

काँग्रेस आणि विशेषत: राहुल गांधी यांनी अनेकदा वीर सावरकरांवर टीका केली आहे. ज्यावरून भाजपने अनेकदा राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी एकीकडे शिवाजी महाराजांची माफी मागत हे प्रकरण थंड करण्याचा प्रयत्न केलेला असताना दुसरीकडे विरोधक मात्र सावरकरांचा अपमान करूनही त्यांची माफी मागत नाही असं ठसण्याचा प्रयत्नही केला आहे. 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT