Rashmi Shukla: मिलिंद नार्वेकरांच्या ‘त्या’ शुभेच्छांनी ठाकरेंची मोठी पंचाईत?

मुंबई तक

पोलीस महासंचालक व महानिरीक्षकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे पर्सनल सेक्रेटरी मिलिंद नार्वेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या त्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे आता राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

ADVERTISEMENT

Post Uddhav Thackeray personal secretary Milind Narvekar Director General of Police and Rashmi Shukla as Inspector General
Post Uddhav Thackeray personal secretary Milind Narvekar Director General of Police and Rashmi Shukla as Inspector General
social share
google news

Rashmi Shukla: राज्यातील राजकारण राम मंदिर, जितेंद्र आव्हाड आणि इंडिया आघाडीच्या अनेक मुद्यांनी आज ढवळून निघाले होते. त्यातच आज उद्धव ठाकरे यांचे पर्सनल सेक्रेटरी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या एका ट्विटमुळेही जोरदार खळबळ उडाली आहे. पोलीस महासंचालक व महानिरीक्षकपदी (DGP and IG) रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पर्सनल सेक्रेटरी मिलिंद नार्वेकर यांनी यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठीही शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

फोन टॅपिंगमुळे वादात

महाविकास आघाडीच्या काळात रश्मी शुक्ला यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र केंद्राने त्यांना वाचवत त्यांची बदली इतर राज्यात केली होती. त्यावेळेपासून आणि फोन टॅपिंग प्रकरणामुळे रश्मी शुक्ला नाव चर्चेत आहेत. त्यातच आता मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्या अभिनंदनाची पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याने चर्चेला उधान आले आहे.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp