पंतप्रधान मोदी 2014 नंतर पहिल्यांदा RSS मुख्यालयात, 'या' प्रकल्पांचं करणार उद्घाटन, वाचा यादी...
पंतप्रधान मोदी रेशीमबाग येथील डॉ.हेडगेवार स्मारक मंदिरात आदरांजली वाहणार आहेत. तसंच आरएसएसचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर (गुरुजी) यांचंही स्मारक याच स्मृती मंदिरात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पंतप्रधान मोदींचा 2014 नंतर पहिल्यांदा नागपूर दौरा

डॉ. हेडगेवार आणि गोळवलकरांच्या स्मृतीस्थळी होणार नतमस्तक

दोन मोठ्या प्रकल्पांचं करणार उद्घाटन
PM Narendra Modi Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याच्या दिवशी नागपुरात आलेआहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक डॉ. के. बी. हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक होणार आहे. विशेष म्हणजे 2014 साली पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरचा मोदींचा हा पहिलाच दौरा असणार आहे. त्यानंतर ते दिक्षा भूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचा हा दौरा आहे.
हे ही वाचा >> हिंदू व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्याच्या जावेद खान यांना थेट उद्धव ठाकरेंचा फोन म्हणाले, 'तुम्हाला तर...'
पंतप्रधान मोदी रेशीमबाग येथील डॉ.हेडगेवार स्मारक मंदिरात आदरांजली वाहणार आहेत. तसंच आरएसएसचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर (गुरुजी) यांचंही स्मारक याच स्मृती मंदिरात आहे.
दीक्षा भूमीवर अभिवादन करणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 मध्ये हजारो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्याच नागपूरमधील दीक्षाभूमीला पंतप्रधान मोदी या दौऱ्यात भेट देणार आहेत. यादरम्यान ते आंबेडकरांच्या विचारांना आणि सामाजिक सुधारणेतील त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहतील.
माधव नेत्रालयाच्या नवीन प्रीमियम केंद्राची पायाभरणी
पंतप्रधान मोदी या दौऱ्यात माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणीही पंतप्रधान मोदी करणार आहेत. 2014 मध्ये गोळवलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्थापन झालेल्या माधव नेत्रालय आय इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटरचा विस्तार करणारा हा प्रकल्प असणार आहे. या केंद्रात 250 खाटांचे हॉस्पिटल, 14 बाह्यरुग्ण विभाग (OPD), आणि 14 आधुनिक ऑपरेशन थिएटर असतील. यामुळे रूग्णांना नेत्रचिकित्सा क्षेत्रात प्रगत आणि सुलभ सुविधा मिळणार आहे.
संरक्षण आणि एअरोस्पेस क्षेत्रातील मोठे प्रकल्प
हे ही वाचा >> Maharashtra Weather 30th March: पुण्यासह प. महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, गुढी पाडव्याची दिवशी कसं असेल तुमच्या इथलं हवामान?
पंतप्रधान मोदी सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या शस्त्रास्त्र निर्मिती प्रकल्पालाही भेट देणार आहेत. नव्याने बांधलेल्या 1250 मीटर लांब आणि 25 मीटर रुंद हवाई पट्टीचं उद्घाटनही ते करणार आहेत. ड्रोन (Unarmed Aerial Vehicles - UAVs) च्या उड्डाणाच्या चाचण्यांसाठी आणि युद्धसामग्रीच्या चाचणीसाठी वापरलं जाईल. याशिवाय, थेट युद्धसामग्री आणि वॉरहेड चाचणी सुविधेचंही उद्घाटन केलं जाणार आहे. क्षेपणास्त्रे आणि इतर आधुनिक संरक्षण उपकरणांच्या चाचणीसाठी ते महत्वाचं ठरणार आहे.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा लक्षात घेऊन स्पेशल प्रोटेक्शन ग्रूप (SPG) आणि नागपूर पोलिसांनी कडेकोट सुरक्षा कवच तयार केलंय. पंतप्रधानांच्या ताफ्यात 20 विशेष वाहनं असतील, ज्यामध्ये VIP सुरक्षा वाहनं आणि रेडिओ कंट्रोल्ड इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (RCEID) जॅमर बसवलेल्या वाहनांचा समावेश आहे.