Sharad Pawar: '...तर मी स्वत: आंदोलनाला उतरणार', शरद पवारांचा सरकारला थेट इशारा! नेमकं घडलं काय?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवारांचा शिंदे सरकारला अल्टीमेटम

point

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

point

विद्यांर्थ्यांकडून का केलं जातंय आंदोलन?

Sharad Pawar on Pune Protest: पुण्यात गेल्या तीन दिवसांपासून MPSC च्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. नवी पेठ शास्त्री रोडवर विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सुरु आहे. कृषीसेवेच्या 258 पदांचा एमपीएसीत समावेश करण्याची मागणी या विद्यार्थ्यांची असून या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. यासोबतच MPSC, IBPS परीक्षा एकाच दिवशी आल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे. यावरून आता विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा शरद पवारांनी दिला आहे. (pune mpsc students protest ncp sharad pawar ultimatum eknath shinde government

शरद पवारांचा शिंदे सरकारला अल्टीमेटम

शरद पवार यांनी ट्विट करत इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमधून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. "पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार", असं ट्विट शरद पवारांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे.' 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : Maharashtra Weather: राज्यात पावसाचा जोर वाढला! मुंबईकरांसाठी पुढील 24 तास महत्वाचे...

विद्यांर्थ्यांकडून का केलं जातंय आंदोलन?

राज्यात IBPS आणि MPSC राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी (25 ऑगस्ट) रोजी आल्या आहेत. त्यामुळे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यांर्थ्यांसाठी हा मोठा धक्का आहे. त्यामुळे परीक्षांच्या तारखा बदलाव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहेत.

हेही वाचा : बदलापूर अत्याचार: डोक्यात तिडीक जाणाऱ्या शाळेच्या 'त्या' चुका!

याव्यतिरिक्त २०२१ व २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमधून कृषी विभागात निवड झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. यासंदर्भातही परीक्षार्थींनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT