Rahul Gandhi : ''भाजपनेच या बदमाशांना...'', वृद्धाला मारहाण झाल्याच्या घटनेवर राहुल गांधी कडाडले!

मुंबई तक

ADVERTISEMENT

rahul gandhi slams bjp on dhule elderly man beaten up dhule csmt express train video viral shocking story
वृद्धाला मारहाण झाल्याच्या घटनेवर राहुल गांधी कडाडले!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

द्वेषाचा राजकीय अस्त्र म्हणून वापर सूरू आहे

point

सत्तेतील लोक देशात भितीचे राज्य प्रस्थापित करतायत

point

भापजमुळेच या बदमाशांच धाडस होतंय

Rahul Gandhi Reaction on Beef Carrying Man Assaulted Case : धुळे-सीएसएमटी एक्सप्रेसमध्ये (Dhule CSMT Express) एका वृद्ध व्यक्तीला गोमांस बाळगल्याच्या संशयावरून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर आता संताप व्यक्त होतोय. अशात या घटनेवर आता राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. जमावाच्या रूपात लपलेले द्वेषी घटक कायद्याला आव्हान देत खुलेआम हिंसाचार पसरवतायत. या बदमाशांना भाजप सरकारकडून मोकळे हात मिळतायत,  त्यामुळेच त्यांनी हे धाडस दाखवले आहे, असा हल्ला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपवर चढवला आहे. (rahul gandhi slams bjp on dhule elderly man beaten up dhule csmt express train video viral shocking story) 

ADVERTISEMENT

धुळे-सीएसएमटी एक्सप्रेसमध्ये वृद्धाला झालेल्या या मारहाणीच्या घटनेवर आता राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर आपली सतंप्त प्रतिक्रिया दिली आहे. ''द्वेषाचा राजकीय अस्त्र म्हणून वापर सूरू आहे आणि सत्तेच्या शिडीवर चढलेले लोक देशभरात भीतीचे राज्य प्रस्थापित करतायत असा हल्ला राहुल गांधी यांनी केंद्रावर चढवला आहे. तसेच जमावाच्या रूपात लपलेले द्वेषी घटक कायद्याला आव्हान देत खुलेआम हिंसाचार पसरवतायत. या बदमाशांना भाजप सरकारकडून मोकळे हात मिळाले आहेत, त्यामुळेच त्यांनी हे धाडस दाखवल्याची'' टीका राहुल गांधींनी भाजपवर केली आहे. 

हे ही वाचा : Pink Rickshaw Yojana : 'लाडकी बहिण'नंतर महिलांसाठी पिंक ई रिक्षा योजना, कुणाला मिळणार लाभ?

''अल्पसंख्याकांवर विशेषत: मुस्लिमांवर सातत्याने हल्ले होत असून सरकारी यंत्रणा मूक प्रेक्षक म्हणून पाहत आहे.अशा अराजकतावाद्यांवर कडक कारवाई करून कायद्याचे राज्य प्रस्थापित केले पाहिजे. भारताच्या सांप्रदायिक एकतेवर आणि भारतीय लोकांच्या हक्कांवर कोणताही हल्ला हा संविधानावरील हल्ला आहे, जो आम्ही अजिबात सहन करणार नाही. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी द्वेषाच्या विरोधात भारताची एकजूट करण्याची ही ऐतिहासिक लढाई आम्ही कोणत्याही किंमतीवर जिंकू'', असे देखील राहुल गांधी म्हणाले आहेत. 

हे वाचलं का?

नेमकी घटना काय? 

मुळचे धुळ्याचे रहिवासी असलेले 72 वर्षीय अश्रफ अली सय्यद हूसेन हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी धुळे सीएसएमटी एक्सप्रेसने कल्याणला निघाले होते. या दरम्यान ट्रेनमधल्या काही तरूणांसोबत त्याचा वाद झाला होता. हा वाद पुढे जाऊन इतका टोकाला पोहोचला की तरूणांनी वृद्धाला शिवीगाळ करून मारहाण केली. या मारहाणी दरम्यान अनेक सहप्रवाशांनी हा व्हिडिओ शुट करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. 

खरं तर या घटनेत वृद्ध त्याच्यासोबत दोन बरण्या घेऊन जात असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या बरण्यांमध्ये गोमांस असल्याचा दावा तरूणांनी केला होता. त्यामुळे गोमांस बाळगल्याच्या संशयातून या तरूणांच्या टोळक्याने वृद्धाला मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. धुळे एक्स्प्रेस ट्रेनमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. आणि व्हिडिओच्या माध्यमातून तरूणांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Nandurbar Crime : आई, पोटात दुखतंय; डॉक्टरांकडे जाताच बापाचं पितळ उघडं पडलं, नेमकं काय घडलं?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT