Sambhajiraje : संभाजीराजेंनी दाखवले 3 जुने फोटो, वाघ्या कुत्र्याचा पुरावा नाही, हाकेंच्या 'त्या' आरोपालाही उत्तर
लक्ष्मण हाके यांनी काही आरोप करत वाघ्या कुत्र्याची समाधी काढण्यास विरोध दर्शवला होता. त्यावर संभाजीराजे यांनी आपली भूमिका मांडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वाघ्या कुत्र्याची समाधी काढण्याची मागणी

छत्रपती संभाजी महाराज पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटले

लक्ष्मण हाके यांनी केलेल्या आरोपांवर संभाजीराजेंचं उत्तर
Sambhajiraje on Laxman Hake : छत्रपती संभाजी हे आज पुरातत्व खात्याच्या महासंचालकांच्या भेटीसाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली. "वाघ्या कुत्र्याचं स्मारक हटवावं हे मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. आज पुरातत्व खात्याच्या महासंचालकांची भेट घेतली आणि सविस्तर इतिहास सांगितला. पुरातत्व खात्याकडून मिळालेल्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडल्या." असं संभाजीराजे म्हणाले. यावेळी त्यांनी काही जुने पुरावे दाखवले आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपांनाही उत्तर दिलं आणि 31 तारखेचा अल्टीमेटम का दिला याचं कारणही सांगितलं.
अन्यथा ते संरक्षित स्मारक होईल...
संभाजीराजे म्हणाले, पुरातत्व खात्याकडून माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीमध्ये स्पष्टपणे सांगितलंय की, वाघ्या कुत्र हे संरक्षित स्मारकामध्ये नाही. 1936 ला हे स्मारक बांधलं. जर 2036 पर्यंत ते काढलं नाही, तर 100 वर्ष पूर्ण होतील आणि ते प्रोटेक्टेड मॉन्यूमेंट म्हणून संरक्षित होईल असं संभाजीराजे म्हणाले.
हे ही वाचा >> The Habitat Studio : कुणाल कामरा, इंडियाज् गॉट लॅटेंटमुळे वाद, 'द हॅबिटॅट स्टुडिओ' नेमका आहे तरी कुणाचा?
राजसंन्यास नाटकातून वाघ्याची दंतकथा...
संभाजीराजे यांनी पुढे सांगितलं की, वाघ्या कुत्र्याच्या समाधीला कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही. महाराजांना अग्नी देत असताना त्यानं उडी मारल्याचीही माहिती नाही असं संभाजीराजे यांनी सांगितलं. यावेळी संभाजीराजेंनी तीन वेगवेगळे फोटो दाखवत तिथे वाघ्या कुत्र्याची समाधी नव्हती असं सांगितलं. डाव्या, उजव्या, सेंटरच्या अशा कुठल्याही इतिहासकारांनी याचा उल्लेख केला नाही. शिवाजी महाराजांकडे कुत्रे असतील. मात्र, छत्रपची संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या राजसंन्यास नाटकातून वाघ्या कुत्र्याची दंतकथा निर्माण झाली. शिवरायांच्या समाधीपेक्षा ही समाधी उंच आहे, यावरूनही त्यांनी सवाल उपस्थित केला.
विरोध करणाऱ्यांनी पुरावे दाखवावेत
लक्ष्मण हाके यांनी काही आरोप करत वाघ्या कुत्र्याची समाधी काढण्यास विरोध दर्शवला होता. त्यावर संभाजीराजे म्हणाले, जे लोक वाघ्या कुत्र्याची समाधी काढण्याला विरोध करत आहेत, त्यांना आणि आम्हाला सरकारने बोलवावं. पुरावे दाखवावे असं संभाजीराजे म्हणाले.
हे ही वाचा >> साताऱ्यातील दोघांचा थायलंडमध्ये तरूणीवर बीचवरच अत्याचार, पोलिसांकडून अटक, किती वर्षांची होऊ शकते शिक्षा?
लक्ष्मण हाके यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना संभाजीराजे म्हणाले, दुर्दैवानं तुकोजीराव होळकर महाराजांचं नाव तिथे प्रोजेक्ट केलं जातंय. त्यांनी या स्मारकासाठी मदत केली असं म्हटलं जातंय. मात्र, मला स्पष्ट करायचं की, मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, अहिल्यादेवी यांनी स्वराज्य स्थापनेसाठी योगदान दिलं. अशावेळी तुकोजीराव महाराज कुत्र्याच्या समाधीला मदत कशी करतील? तुम्ही त्यांना बदनाम करत आहात असं संभाजीराजे म्हणाले. छत्रपती घराण्याचे आणि होळकर घराण्याचे जुने संबंध आहेत. तसंच, धनगर बांधवांचं आणि आमचं जवळचं नातं आहे हे सांगत माझा चालक, स्वयंपाकी, अंगरक्षक सगळे धनगर आहे असं संभाजीराजे म्हणाले.
31 मेचा अल्टीमेटम का?
31 मेचा अल्टीमेटम का दिला असाही सवाल उपस्थित होत होता. त्यावर संभाजीराजे म्हणाले, मी 31 मेचा अल्टीमेटम दिलेला नाही. राज्य शासनाचं धोरण आहे. धोरण सांगतंय की 31 मे पर्यंत गडकोटांवरचं अतिक्रमण काढा. त्यामुळे मी विनंती केली की, ज्या वाघ्या कुत्र्याचे पुरावे नाही ते सुद्धा 31 मे रोजी काढून टाका अशी भूमिका मांडली.