राऊतांनी ‘त्या’ फोटोवरून फडणवीसांना डिवचलं, ‘नागपूर स्टेशनला गेला असा फिरायला’

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

sanjay raut criticize devendra fadnavis ayodhya carseva photo nagpur raiway station ram mandir inaugration
sanjay raut criticize devendra fadnavis ayodhya carseva photo nagpur raiway station ram mandir inaugration
social share
google news

Sanjay Raut Criticize Devendra Fadnavis : राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येला कारसेवेसाठी जातानाच नागपूर रेल्वे स्टेशनवरचा एक जूना फोटो एक्स या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो ट्वीट करत फडणवीस  (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या फोटोवरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. ‘तुमचे नागपूर स्टेशनचे फोटो आहेत’,’गेला असाल फिरायला नागपूर स्टेशनला’, ‘लहानपणी जात असतात’, अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांची खिल्ली उडवत, आमच्याकडे प्रत्यक्ष घुमटावरचे फोटो, व्हिडिओ असल्याचा खुलासा केला आहे. (sanjay raut criticize devendra fadnavis ayodhya carseva photo nagpur raiway station ram mandir inaugration)

ADVERTISEMENT

संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना देवेद्र फडणवीसांनी ट्विटरवर शेअऱ केलेल्या फोटोबाबत प्रश्न विचारला होता. यावर राऊत म्हणाले, हा अत्यंत हास्यास्पद आणि पोरकट प्रश्न आहे. जर कुणाला प्रश्न पडला असेल अयोध्येच्या लढ्यात शिवसेनेचे योगदान काय? आणि ते कधी होते? तर असे प्रश्न विचारणे कोत्या आणि संकुचित मनोवृत्तीचे असल्यायची टीका संजय राऊतांनी फडणवीसांवर केली.

हे ही वाचा : Shoaib Malik सोबतच्या घटस्फोटावर अखेर सानिया मिर्झाने सोडलं मौन

अख्ख्या देशाला माहितीय शिवसेना अयोध्येत काय करत होती? शिवसेनेचे आणि बाळासाहेबांचे अयोध्येत योगदान काय आहे. आमच्याकडे पोलीस स्टेशन, आमच्यावर कारवाई झाल्याचे आणि आम्ही कोर्टापूढे हजर राहिलो, या सगळ्याचे फोटो आहेत. तुम्हाला पुरावा द्यायची आम्हाला आवश्यकता नाही. तुम्ही कोण, तुमचे लोक पळून गेले होते, सगळ्यांना माहिती आहे. शेवटी बाळासाहेब ठाकरेंनी जबाबदारी स्विकारली होती, असे संजय राऊतांनी सांगितले.

हे वाचलं का?

तुम्ही नागपूर स्टेशनला आहात, गेला असाल फिरायला. लहानपणी जात असाल फिरायला, पण पुढे पोहोचलात का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. तसेच तुमच्याकडे नागपूर स्टेशनचे फोटो आहेत. आमच्याकडे प्रत्यक्ष घुमटावरचे आहेत,अशा शब्दात संजय राऊतांनी फडणवीसांच्या त्या फोटोची खिल्ली उडवली.

हे ही वाचा : जरांगेंच्या मुलीचा सरकारला इशारा, ‘पप्पा मुंबईत पोहोचले तर घराबाहेरही पडता येणार नाही’

मला त्या विषयी वाद करायचा नाही. इथे प्रत्येकाचे योगदान आहे. लालकृष्ण अडवाणी असतील, मनोहर जोशी, उमा भारती असतील, त्या काळातले आमचे सगळे खासदार तिकडे उपस्थित होते. मनोहर जोशींपासून सरपोतदारांपर्यंत, विद्याधर गोखळे तिकडे पोहोचले होते. उद्या या साठी आम्ही एक प्रदर्शन भरवले आहे. या लढ्यात ज्यांचा सहभाग होता, त्या सर्व कारसेवकांना उद्याच्या शिबिरात आम्ही आमंत्रण दिले आहे. त्याचा उद्या सत्कारही करणार आहोत. डेमोक्रेसी क्लबला आम्ही त्यासाठी एक प्रदर्शनही भरवले आहे.या प्रदर्शनाला मी देवेंद्र फडणवीसांना आमंत्रित करतो. नागपूरला होतात तुम्ही पण उद्या डेमोक्रेसी क्लबला या. प्रत्यक्ष त्या कारसेवकांना भेटा,असा टोला देखील राऊतांनी फडणवीसांना लगावला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीसांकडून जून्या आठवणींना उजाळा

“जुनी आठवण…”, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणालेत “नागपूरहून प्रकाशित होणार्‍या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्‍या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे”, असे सांगत देवेंद्र फडणवीसांनी कारसेवकांमध्ये आपणही होतो, असा पुरावा दिला आहे. या फोटोची आता चर्चा होत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT