Santosh Deshmukh Murder: 'ते' CCTV फुटेज समोर येताच धनंजय देशमुख संतापले, म्हणाले पोलिसांना तर...
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचं नवं सीसीटीव्ह फुटेज समोर आल्यानंतर धनंजय देशमुख यांनी संताप व्यक्त करत पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थि केलं आहे.
ADVERTISEMENT

योगेश काशिद, बीड: 'पत्रकारांना सीसीटीव्ही फुटेज सापडतात मात्र, पोलीस यंत्रणांना सीसीटीव्ही फुटेज का सापडत नाहीत? वेळीच सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असते तर माहिती मिळाली असती. कृष्णा आंधळे अद्यापपर्यंत मोकाट आहे. तोच कृष्णा आंधळे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पळताना दिसत आहे.' असं म्हणत धनंजय देशमुख यांनी या सगळ्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे.
'माझ्या भावाची हत्या करून फरार झालेले आरोपी मोकाट आहेत. कृष्णा आंधळे हा अद्यापपर्यंत पोलिसांना सापडू शकले नाहीत हे दुर्दैव आहे.' असंही धनंजय देशमुख यावेळी म्हणाले.
हे ही वाचा>> 'तो' VIDEO आला समोर, संतोष देशमुखांची हत्या करून 6 आरोपी वाशीतून कसे पळाले?
नेमकं काय म्हणाले धनंजय देशमुख?
'आतापर्यंत पाच-सहा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पोलिसांनी वेळेत सीसीटीव्ही घेतले असते तर कदाचित माहीत झाले असते आरोपी कुठे पळून गेले आहेत. आम्ही पहिल्या दिवसापासून बोलत आहोत की, सीसीटीव्ही फुटेज आणि पोलीस नेमका काय तपास करत आहेत हे आमच्या समोर मांडा. खरंतर सीसीटीव्ही शोधून पोलीस यंत्रणेने पत्रकारांना सीसीटीव्ही फुटेज द्यायला हवे होते. मात्र, पत्रकारच हे सीसीटीव्ही फुटेज पोलिस यंत्रणेकडे देत आहेत.'
हे ही वाचा>> बीडमध्ये हे चाललंय तरी काय? वाल्मिक कराडच्या बातम्या पाहणाऱ्या तरुणाला तुफान मारहाण
'सीआयडी आणि एसआयटी यांचा तपास चांगला सुरू आहे. मात्र, पहिल्या दिवसाचा तपास कोणत्या पद्धतीने गेला यात शंका आहे. आरोपी पोलिसांसमोर पळून जात असतील तर ते कोण शोधणार? पळून जाताना कृष्णा आंधळे देखील दिसत आहे. पण हे सोडून आंदोलन कसे मोडीत काढायचे यावर प्रशासनाने भर दिला.'
'मोबाइलचे कॉल डिटेल्स काढा.. कारण हे सर्व शंकेच्या भोवऱ्यात आहे. त्यामुळे आम्ही सुरुवातीचा तपास पुन्हा री-इन्वेस्टीगेशन करण्याची मागणी करत आहोत. सुरुवातीच्या चार ते पाच दिवसात काय झालं? आज सर्व आरोपी आत असते, त्यांना शिक्षा झाली असती. केवळ त्याला मिळालेल्या अभयामुळे आरोपी मोकाट आहे.' असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.