Sharad Pawar : "शिवरायांची तुलना सावरकरांशी...", शरद पवारांनी PM मोदींना सुनावलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sharad Pawar On PM Narendra Modi
Sharad Pawar On PM Narendra Modi
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर साधला निशाणा

point

शिवरायांची माफी मागणाऱ्या पंतप्रधान मोदींचा शरद पवारांनी घेतला समाचार

point

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

Sharad Pawar On PM Narendra Modi :  मालवणच्या राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची राळ उडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेबाबत जाहीर माफी मागितली. पण सावरकरांच्या मुद्द्यावरून मोदींनी विरोधकांना धारेवर धरलं. अशातच शरद पवार यांनी याच विषयावरून मोदींचा समाचार घेतला आहे. (A statue of Chhatrapati Shivaji Maharaj collapsed in Rajkot, Malvan. After this incident, accusations and counter-accusations are flying in the political circles. Prime Minister Narendra Modi publicly apologized for the incident. But on the issue of Savarkar, Modi kept the opposition on edge. Similarly, Sharad Pawar has taken notice of Modi on this issue)

"शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. लोकांच्यात अस्वस्थता आहे. विषय काय आहे आणि सावरकरांचा मुद्दा त्यांनी मांडला. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकर अनेक वर्ष तुरुंगात गेले. हा त्याग त्यांनी केला, हे आपण मान्य करू. हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्यांनी केली, रयतेचं राज्य स्थापन करण्याचा विचार ज्यांनी मांडला, ते शिवाजी माहाराजांची तुलना देशाचे प्रधानमंत्री कशा पद्धतीने करतात आणि माफी मागितली असा संदेश पसरवला जातोय. याचा अर्थ असा की, तुम्ही चुकीच्या गोष्टी, चुकीच्या विचारांना प्रोत्साहित करता. ते अंगाशी आलं की माफी मागता", असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (SP) सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते मुंबईच्या कार्यक्रमात बोलत होते. 

हे ही वाचा >> Today Horoscope : 'या' राशीच्या लोकांना मिळणार पैसाच पैसा! जाणून घ्या आजचं राशी भविष्य

शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान

पवार पुढे म्हणाले, ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्या सत्तेचा उपयोग राज्याच्या उभारीसाठी योग्य पद्धतीने करण्याचं सूत्र या लोकांकडून पाळलं जात नाही. पुतळा पडला, माफी मागितली, असं सांगितलं जातंय. प्रधानमंत्र्यांनी (पंतप्रधान नरेंद्र मोदी) माफी मागितली. त्यानंतर लगेच म्हणाले की सावरकरांवर टीका-टीप्पणी केली जाते. त्यांच्यावर ज्यांनी टीका केली, त्यांनी कधी माफी मागितली नाही. त्यामुळे अशांच्या (नरेंद्र मोदी) हातात देशाची, राज्याची सत्ता द्यायची का, हा विचार करायचा आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Uddhav Thackeray : " मोदींनी भ्रष्टाचाऱ्यांवर पांघरूण घालण्यासाठी...", मविआच्या आंदोलनात उद्धव ठाकरे कडाडले

निवडणुकीच्या काळात तुम्ही बोलाल, आम्ही बोलू. प्रत्येकाची मतं असतात. पण या राज्यात विविध क्षेत्रात व्यक्तीगत स्वार्थाची कशाचीही अपेक्षा न करता समाजासाठी काम करावं. लोकांसाठी सामजिक आणि शैक्षणिक संस्था आहेत, त्यांची प्रतिष्ठा जपली पाहिजे. त्यांनी हातात घेतलं काम गतीनं होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केलं पाहिजे. त्यांना संकटाचे दिवस आले, तर बाकिच्या अन्य घटकांनी त्यांच्या पाठिशी उभं राहून त्यांच्या कामाला अखंड प्रोत्साहित केलं पाहिजे. हाच या परिषदेचा हेतू होता, असंही पवार म्हणाले. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT