‘भाकरी फिरवणार होते,पण तवाच फिरवला’, नेमकं कोणी केलं ट्विट?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sharad Pawar Retirement Announcement Sanjay raut Tweet
Sharad Pawar Retirement Announcement Sanjay raut Tweet
social share
google news

Sharad Pawar Retirement Announcement Sanjay raut Tweet : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या दरम्यान त्यांनी ही घोषणा केली होती. पवार यांच्या या निवृत्तीच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तसेच शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णय़ानंतर राष्ट्रवादीचे नेते भावूक झाले असून त्यांची मनधरणी करत आहेत. या सर्व घडामोडींवर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. (sharad pawar political retirement thackeray group mp sanjay raut reaction)

ADVERTISEMENT

भाकरी फिरवावी लागते. ती फिरवली नाही तर करपते. ती भाकरी फिरवण्याची वेळ आता आली आहे. आता विलंब करून चालणार नाही,असे विधान शरद पवार यांनी करून काही दिवसांपुर्वीच करून पक्षात नेतृत्व बदलाचे संकेत दिले होते. या विधानाच्या काही दिवसानंतर आज शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर संजय राऊत यांनी ट्वीट करून आपली भूमिका मांडलीय. शरद पवारांच्या भाकरीच्याच विधानाला घेऊन संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. भाकरी फिरवण्याचे संकेत होते, पण तवाच फिरल्याचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

हे ही वाचा : शरद पवारांची घोषणा! राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

संजय राऊत काय म्हणाले?

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याच्या घोषणेनंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांची प्रतिक्रीया समोर आली आहे. एक वेळ अशी आली..घाणेरडे आरोप..प्रत्यारोप..राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता.शरद पवार यांनी तेच केले आहे.जनतेच्या रेट्या मुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला.शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत,अशी प्रतिक्रिया संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे.

हे ही वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारं शरद पवारांचं ‘ते’ भाषण जसंच्या तसं…

ADVERTISEMENT

बाळासाहेब ठाकरे यांनी देखील एका भर सभेत असाच राजीनामा दिला होता. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंना राजीनामा देण्यापासून शिवसैनिकांनी अडवलं होते.शिवसैनिकांच्या मनधरणीनंतर बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा मागे घेतला होता.अशी आठवण संजय राऊत यांनी यानिमित्त सांगितली.ट्विटच्या शेवटी संजय राऊत यांनी शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास असल्याचे देखील म्हटले आहे.

ADVERTISEMENT

शरद पवार निवृत्तीवर काय म्हणाले?

“कोठेतरी थांबणे आवश्यक आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पुढील अध्यक्ष कोण याबाबतचा निर्णय घ्यावा. तसंच सध्याची राज्यसभेची टर्म संपल्यानंतर पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नाही. आता नवी जबाबदारी नको, असं म्हणतं शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या आणि संसदीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती. मुंबईत ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी याबाबतची घोषणा केली.

हे ही वाचा : शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण? NCP च्या अध्यक्षपदासाठी ‘पाच’ नाव चर्चेत

    follow whatsapp

    ADVERTISEMENT