Eknath Shinde : ‘शिवसेनेच्या 5 मंत्र्यांना काढा’, हायकमांडचा CM शिंदेंना आदेश, ‘ते’ मंत्री कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

shiv sena 5 minister Cabinet eknath shinde govt bjp high command maharashtra gulabrao patil tanaji sawant abdul sattar sanjay rathod sandipan bhumare
shiv sena 5 minister Cabinet eknath shinde govt bjp high command maharashtra gulabrao patil tanaji sawant abdul sattar sanjay rathod sandipan bhumare
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) अस्तित्वात असणारं महाविकास आघाडीचं सरकार (MVA Govt) पाडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे थेट भाजपच्या (BJP) पाठिंब्यावर मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणाऱ्या ठाकरेंना धडा शिकविण्यासाठी भाजपने शिंदेंना सर्वोतोपरी ‘ताकद’ही पुरवली. त्यामुळे सत्तेत आलेलं हे शिंदे-फडणवीस सरकार गुण्यागोविंदाने नांदेल अशी अनेकांना आशा होती. मात्र, या सरकारला वर्ष होत नाही तोच त्यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. अशातच आता असंही समोर आलं आहे की, शिंदेंच्या शिवसेनेतील पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून हटविण्याच्या सूचना या शिंदेंना करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार देखील रखडला आहे.

ADVERTISEMENT

पाचही दिग्गज मंत्र्यांना डच्चू देण्याचा भाजपचा आग्रह?

शिंदेंच्या सरकारमध्ये असणाऱ्या पाच दिग्गज मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवावा असं थेट भाजपच्या हायकमांडने मुख्यमंत्री शिंदेंना सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लवकरच विस्तार होईल असं वारंवार म्हटलं जात होतं. मात्र, शिंदेनी केलेल्या बंडात ज्या पाच दिग्गज नेत्यांचा समावेश होता त्यांनाच हटविण्याचे आदेश भाजप हायकमांडने दिल्याने मुख्यमंत्री शिंदेंची इकडे आड, तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.

भाजपकडून नेहमीच मंत्र्यांच्या कामगिरीचं अवलोकन केलं जात असतं. त्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा भाजपने तयार केली आहे. असं असताना शिंदेंचं पाच मंत्री हे पुढील निवडणुकीसाठी अडचण ठरू शकतात. असा शेरा या यंत्रणेने मारला आहे. ज्यामुळे आता भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने थेट शिंदेंना त्यांच्याच पक्षातील पाच मंत्र्यांना हटविण्याचे आदेश दिले असल्याचं समजतं आहे.

हे वाचलं का?

कोण ते पाच मंत्री? ज्यांच्यावर भाजप हायकमांडची वक्रदृष्टी

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, संजय राठोड आणि संदीपान भुमरे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. खरं तर भाजपने आतापर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळात आणि काही राज्यात हा फॉर्म्युला वापरला आहे. पण असं असलं तरी आता युतीतीलच पक्षाला मंत्र्यांना हटवा असा आदेश भाजपने शिंदेंना दिल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. ज्यावरुन विरोधक त्यांच्यावर आता निशाणा साधत आहेत.

हे ही वाचा >> Viral Video: क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं! गणपतीपुळेतील ‘ही’ लाट ‘बिपरजॉय’मुळे?

मुंबई Tak चावडीवर संजय राऊतांनीही केलेला हाच दावा..

चावडीवर बोलताना संजय राऊत म्हणालेले की, ‘शिंदेबरोबर 2 टक्के मतंही मिळणार नाही, हे भाजपला कळून चुकलं आहे. उद्या जर मंत्रिमंडळाचा विस्तार बेकायदेशीरपणे जरी झाला, तरी त्या विस्तारामध्ये सध्याच्या शिंदे गटातील चार मंत्र्यांना काढा, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, अशा सूचना त्यांना (एकनाथ शिंदे) आहेत. त्यामुळे विस्तारानंतर खरी मजा येणार आहे.’ असं संजय राऊत म्हणाले होते. आता.

ADVERTISEMENT

एकनाथ खडसेंचीही टीका

‘भाजपच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या पाच मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हे पाचही मंत्री त्यांच्या दृष्टीने निष्क्रिय आहेत. या पाचही मत्र्यांवर ज्या-ज्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या, त्या त्यांनी योग्यरीत्या पार पाडलेल्या नाहीत, अशा प्रकारचा अहवाल आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा खाते आहे. महाराष्ट्रात जलजीवन मिशन ही योजना अयशस्वी झाली आहे. या जलजीवन मिशनमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी विधानसभेत करण्यात आलेल्या आहेत.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Mira Road Murder: मृतदेहाचे अर्धे तुकडे केल्यानंतर मनोज का गेलेला ‘या’ दुकानात?

‘आवश्यकता नसताना योजना घेणे आणि ज्याठिकाणी उद्भव नाही, त्याठिकाणी बनावट दाखले देऊन कामं करणं अशा स्वरुपाचा आरोप गुलाबराव पाटलांच्या या खात्यावर घेण्यात आला होता. आणखीही काही कारणे असू शकतात. यामुळे विस्तार लांबला असेल, तर मला वाटतं की, केंद्र सरकारच्या पदाधिकाऱ्यांनी जे धोरण घेतले आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी.’ असं एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.

दरम्यान, आता या सगळ्या घडामोडीनंतर शिंदे आपल्या पाच मंत्र्यांना डच्चू देऊन भाजप हायकमांडची मर्जी राखणार की, पाचही मंत्र्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवून त्यांच्या पाठिशी उभं राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT