Uddhav Thackeray: "गद्दारांनो 'छावा' बघा..", उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर डागली तोफ, अबू आझमी, नीलम गोऱ्हेंनाही सुनावलं
Uddhav Thackeray Press Conference: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच सपाचे आमदार अबू आझमी यांना चांगलाच दणका दिला गेला आहे. औरंगजेबावर वक्तव्य केल्यानं त्यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी मोठी प्रतिक्रिया दिलीय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

उद्घव ठाकरेंनी अबू आझमींवर केला हल्लाबोल

एकनाथ शिंदेंसह नीलम गोऱ्हेंवर केली सडकून टीका

उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
Uddhav Thackeray Press Conference: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच सपाचे आमदार अबू आझमी यांना चांगलाच दणका दिला गेला आहे. औरंगजेबावर वक्तव्य केल्यानं त्यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी त्यांच्या निलंबनाची जोरदार मागणी केली होती. अबू आझमींना एक सत्रासाठी नव्हे, तर आमदार पदावरून निलंबित केलं पाहिजे, अशी मागणी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ सभागृहात हजेरी लावली. त्यानंर पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी अबु आझमी यांच्यासह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नीलम गोऱ्हे यांचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊयात सविस्तरपणे
अबू आझमींबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
"या विषयावर वेगळं काही बोलण्याची गरजच नाही. कोणीही जरी असला, त्याने जर आमच्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि जी आमची महाराष्ट्राची दैवतं आहेत, त्यांच्याबद्दल अपशब्द काढले तर त्याला चांगली अद्दल घडेल, तशी शिक्षा झालीच पाहिजे ही सगळ्यांची मागणी आहे. निलंबन किती मिनिटासाठी, तासासाठी, दिवसासाठी याची मला कल्पना नाही. पण पुन्हा असं कोणाशी बोलण्याची हिम्मत होता कामा नये. या सरकारची जबाबदारी आहे की, कठोरात कठोर शासन त्यांनी केलं पाहिजे. निलंबन तर कायमचं केलं पाहिजे", असं मोठं विधान उद्धव ठाकरेंनी केलं.
ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही साधला निशाणा
महायुती सरकारच्या वतीनं छावा चित्रपटाचा खेळ आयोजित केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, "ही कल्पना ज्यांनी मांडली. त्यांचं अभिनंदन करतो. कारण महायुतीमध्ये केवळ संभाजी महाराजांचा छावा चित्रपट दाखवत आहेत. पण शिवाजी महाराजांचाही चित्रपट दाखवला पाहिजे. खासकरून जे सुरतेला पळून गेले, त्यांना स्वराज्यासाठी सुरत लुटणारा आपला राजा कसा होता, त्याचं शोर्य हे ही समजलं पाहिजे. ज्यांनी स्वराज्यासाठी धर्म न सोडता मेलो तर बेहत्तर हे नुसतं बोलून नाही तर दुर्दैवाने त्यांना ते भोगावं लागलं. त्या संभाजी महाराजांचा पिक्चर या गद्दारांना दाखवलाच पाहिजे. भीतीने जे काही सगळे पळून गेले..ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय..म्हणून आम्ही राजांना दैवत मानतो. त्यांच्यापासून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे. विशेषत: या गद्दारांनी छावा चित्रपट पाहायलाच पाहिजे", असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना सुनावलं
"विरोधी पक्षाबाबत भाजप सकारात्मक नाही, अशा बातम्या आहेत. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, "मी बातम्यांवर का विश्वास ठेवू..आम्ही आमची मागणी रितसर केली आहे. त्यांच्याकडून उत्तर आल्यावर बोलू. उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात महाविकास आघाडीनं अविश्वास ठराव आणला आहे, यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, अविश्वास प्रस्ताव आणायला आमच्याकडून उशिर झाला. आतापर्यंत त्या निलंबितच व्हायला पाहिजे होत्या. कारण अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर त्यावरती या अधिवेशनाच्या चर्चा आम्हाला अपेक्षित आहेत".
कोणीजरी असलं तरी त्याने त्या कायद्याच्या नियमांचं भंग केलं असेल आणि अविश्वास ठराव ज्या कारणासाठी आणलाय, ती कारणं तुमच्यासमोर येतील. पण पक्षांतर हाही एक विषय आहे. मला असं वाटतं यापूर्वीचा ठराव आणला पाहिजे. त्यांना चार टर्म आमदार केल्यानंतर त्यांनी तुमच्यावर गंभीर आरोप केले, यावर ठाकरे म्हणाले, शिवसेनेच्या ज्या रणरागिणी आहेत, त्यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. सर्व शिवसैनिकांनी दिल्या आहेत. मी अशा प्रश्नांना कधी उत्तर देत नसतो, असंही ठाकरे म्हणाले.