Video :”सनातन धर्म संपवायचा”, उदयनिधी स्टॅलिनचे वादग्रस्त विधान काय?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

udhayanidhi stalin sanatan dharma like malaria dengu controversial statement bjp oppose amil malviya
udhayanidhi stalin sanatan dharma like malaria dengu controversial statement bjp oppose amil malviya
social share
google news

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचे सुपूत्र क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना कोरोना, डेग्यू,मलेरीया या आजारांशी केली आहे. तसेच याचा विरोध न करता तो संपवला पाहिजे असे विधान केले आहे. स्टॅलिन यांच्या या विधानावरून भाजप आक्रमक झाली असून त्यांनी या विधानाचा निषेध केला आहे.  (udhayanidhi stalin sanatan dharma like malaria dengu controversial statement bjp oppose amit malviya)

ADVERTISEMENT

उदयनिधी स्टॅलिनचे विधान काय?

उदयनिधी स्टॅलिन 2 सप्टेंबरला सनातन सम्मेलनाला पोहोचले होते. या सम्मेलनात त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या संपवल्याच पाहिजेत. आपण डेंग्यू, मलेरिया किंवा कोरोनाचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलंच पाहिजे. त्याचप्रमाणे सनातनलाही संपवायचे आहे, असे विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी केले आहे.

हे ही वाचा : Chandrayaan 3 : लँडर-रोव्हर चंद्राच्या कुशीत झोपणार, चांद्रयान 3 मोहिमेचं काय होणार?

या विधानावर भाजपने आक्षेप घेतला आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्वीट करत स्टॅलिन यांना लक्ष्य केलं आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म मानणाऱ्या देशातील 80 टक्के लोकसंख्या संपवण्याची भाषा केली आहे. अमित मालवीय यांनी स्टँलिनचा व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसवर देखील निषाणा सांधला आहे.

हे वाचलं का?

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिने यांचे सुपूत्र क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माला डेंग्यू,मलेरीयाशी जोडलं आहे. तसेच याचा विरोध नाही केला पाहिजे, तर याला संपवलं पाहिजे, असे विधान केले आहे. याचाच अर्थ सनातन धर्म मानणाऱ्या देशातील 80 टक्के लोकसंख्या संपवण्याची भाषा स्टॅलिन यांनी केल्याचा आरोप अमित मालवीय यांनी केला आहे. तसेच डिएमके हे विरोधकांच्या इंडिया आघाडीचे सदस्य आहेत आणि काँग्रेसचा दीर्घकालीन सहयोगी आहे. त्यामुळे मुंबईच्या बैठकीतच यावर सहमती झाली होती का?” असा सवाल देखील मालवीय यांनी उपस्थित केला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

अमित मालवीय यांच्या पोस्टवर उदयनिधी यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. उदयनिधी म्हणाले की, मी कधीही सनातन धर्म संपवण्याचे आवाहन केले नाही. सनातन धर्म हे धर्म आणि जातीच्या नावाखाली लोकांमध्ये फूट पाडणारे तत्व आहे. सनातन धर्माचा समूळ उच्चाटन करणे म्हणजे मानवता आणि मानवी सभ्यता टिकवणे होय.”माझ्या वक्तव्याच्या संदर्भात मी कोणत्याही कायदेशीर आव्हानाला सामोरे जाण्यास तयार असल्याचे स्टॅलिनने म्हटले आहे.

हे ही वाचा : Adani Group : OCCRP Report मुळे चर्चेत आलेले विनोद अदाणी कोण आहेत?

दरम्यान हिंदू सेनेने उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात दिल्ली पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीन सनातन धर्माचा अवमान झाल्याचा आरोप करत एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT