Beed Crime: 'Walmik Karad ने एकदा नव्हे तर 6 वेळा...' धक्कादायक माहिती आली समोर, 'तो' जबाब जसाच्या तसा...

मुंबई तक

Santosh Deshmukh Murder Case: वाल्मिक कराडने आवादा कंपनीकडे एक वेळा नाही तर तब्बल सहा वेळा खंडणी मागितली होती. अशी खळबळजनक माहिती आता समोर आली आहे.

ADVERTISEMENT

वाल्मिक कराडविरोधातील 'तो' जबाब जसाच्या तसा...
वाल्मिक कराडविरोधातील 'तो' जबाब जसाच्या तसा...
social share
google news

Walmik Karad: बीड: बीडच्या मस्साजोग येथील आवादा कंपनीकडे वाल्मिक कराडने एकदा नाही तर तब्बल सहा वेळा खंडणी मागितल्याची खळबळजनक माहिती आता समोर आली आहे. आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या जबाबात त्याचा उल्लेख आहे. तसेच सुदर्शन घुलेने संतोष देशमुख यांना 'तुला बघून घेईल.. जिवंत सोडणार नाही..' अशी धमकी दिल्याचं या जबाबात म्हटलं आहे. 

वाल्मिक कराडने मागितलेली सहा वेळा खंडणी, तो जबाब जसाच्या तसा...

1. पहिल्यांदा खंडणी 28/8/2024 रोजी फोनवरून मागितली. यावेळी वाल्मिक कराडाने तुम्ही परळीत येऊन भेटा नाही तर काम बंद करा.. अशी धमकी दिली होती.

हे ही वाचा>> संतोष देशमुखांच्या हत्येचा जिथे कट रचला, तिथल्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब आला समोर, वाचून तुम्हीही जाल हादरून!

2. दुसऱ्यांदा खंडणी 11/09/2024 पुन्हा वाल्मिक कराडने फोनवरून खंडणी मागितली. यावेळी 'तुमचे बीड जिल्ह्यात कुठे कुठे काम चालू आहे. याची मला माहिती आहे. तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या..' असे वाल्मिक कराड फोनवरून म्हणालेला.

3. तिसऱ्यांदा खंडणी 08/10/2024 परळी येथे वाल्मीक कराड, विष्णू चाटे आणि माझे सहकारी शिवाजी थोपटे यांची परळीतील जगमित्र कार्यालयात भेट झाली होती. प्लांट सुरू ठेवायचा असेल तर दोन कोटी रुपये द्या. नाहीतर जिल्ह्यात कुठेही प्लांट सुरू ठेवू देणार नाही.. अशी धमकी दिली होती

4. चौथ्यांदा खंडणी 26/11/2024 रोजी मागण्यात आली. यावेळी सुदर्शन घुले हा कंपनीत येऊन वाल्मिक अण्णांनी सांगितलेले दोन कोटी रुपये दिले नाही तर बीड जिल्ह्यात कुठेही काम करू देणार नाही. अशी धमकी देऊन गेला होता.

हे ही वाचा>> Santosh Deshmukh Case : आरोपी फक्त 8 नाही, मुंडेंचा राजीनामा म्हणजे शेवट नाही? घडामोडींचा अर्थ काय?

5. पाचव्यांदा खंडणी 29/11/2024 रोजी मागितलेली. विष्णू चाटेला 11:30 च्या सुमारास कॉल केला. त्यावेळी वाल्मिक अण्णा बोलणार आहेत. ज्यानंतर कराड म्हणाला की. 'अरे ते काम बंद करा चालू ठेवलं तर वातावरण गढूळ होऊन बसेल.. ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितले आहे.. त्या परिस्थितीत काम बंद करा.. आणि तुम्ही पण तिथून निघून जा काम चालू कराल तर याद राखा...' असे म्हणाला होता.

6. 29 /11/2024 रोजी दुपारी एक वाजता सुदर्शन घुले मसाजोग येथे कंपनी ऑफिसमध्ये आला होता. वाल्मीक अण्णांनी ठेवलेली डिमांड तुम्ही लवकर पूर्ण करा.. अण्णा आज केजमध्ये येणार आहेत. त्यावेळी त्यांची भेट घ्या. असे धमकावून ऑफिसमधून निघून गेला होता.

7. सहाव्यांदा खंडणी मागताना 06/12/2024 रोजी सुदर्शन घुले कंपनी ऑफिसमध्ये आला. सुरक्षारक्षकाला शिवीगाळ करून मारहाण केली. थोपटे यांना दोन कोटी रुपये खंडणी द्या, नाहीतर कंपनी बंद करा अशी धमकीही त्याने यावेळी दिली. तेव्हा संतोष देशमुख यांनी मध्यस्थी करून कंपनी बंद करू नका असे सांगितले होते. त्याचवेळी सुदर्शन घुलेने 'तुला बघून घेतो.. तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती.' असं शिवाजी थोपटे यांनी सुनील शिंदे यांना सांगितलं होतं..

हा संपूर्ण जबाब सुनील शिंदे यांनी पोलिसात नोंदवला आहे. जो नुकताच मुंबई Takच्या हाती लागला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp