Eknath Shinde: CM पदावर पाणी सोडणाऱ्या शिंदेंना BJP देणार 'या' गोष्टी?, मुलाला उपमुख्यमंत्रिपद अन्...

मुंबई तक

ADVERTISEMENT

CM पदावर पाणी सोडणाऱ्या शिंदेंना BJP देणार 'या' गोष्टी?
CM पदावर पाणी सोडणाऱ्या शिंदेंना BJP देणार 'या' गोष्टी?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावर सोडलं पाणी

point

भाजप एकनाथ शिंदेंना काय-काय देणार?

point

भाजप एकनाथ शिंदेंच्या मुलाला उपमुख्यमंत्री पद देणार?

मुंबई: महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांना भाजपचा मुख्यमंत्री मान्य आहे. आज (27 नोव्हेंबर) दिवसभर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदासाठी राजी नसल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. दुसरीकडे शिवसैनिक उघडपणे त्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत होते. मात्र दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली. (what is eknath shinde going to get in return for sacrificing the cm post shrikant shinde likely to get the post of deputy chief minister)

ADVERTISEMENT

'आम्ही काम करणारे लोकं आहोत. महाराष्ट्राच्या विकासासाठी काहीही करायला तयार आहोत. गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांचा प्रत्येक निर्णय मला मान्य आहे. ते मुख्यमंत्री म्हणून ज्याची निवड करतील त्याला आपला पाठिंबा असेल.' असं शिंदे यावेळी म्हणाले.

हे ही वाचा>> Maharashtra New CM: महाराष्ट्रातील सत्तेचा नवा फॉर्म्युला आला समोर, पण मुख्यमंत्री...

दरम्यान, हा निर्णय घेण्यासाठी 4 दिवस का लागले, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने सत्तेतील पदासाठी दबावतंत्र सुरू होतं? एकनाथ शिंदे हे सहजासहजी राज्याचे मुख्यमंत्रिपद सोडायला तयार झाले नसतील यात शंका नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात त्यांना काय-काय मिळू शकतं हे आपण पाहूया...

हे वाचलं का?

1- मुलाला उपमुख्यमंत्री आणि स्वतः महायुती सरकारचे समन्वयक 

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना एक प्रकारे मेसेज देण्यासाठी एकनाथ शिंदे हे त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद मिळावं अशी इच्छा असल्याचं बोललं जात आहे. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून लोकसभा सदस्य आहेत.

हे ही वाचा>> Maharashtra New CM: शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला, पण मोदी-शाह पुन्हा वापरणार धक्कातंत्र?

सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाला सांगितले आहे की, जर त्यांना मुख्यमंत्री बनविण्यात आलं नाही तर त्यांना महायुती सरकारचं संयोजक बनविण्यात यावं. कारण निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली. मात्र, या मागण्यांबाबत भाजपकडून अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही. दुसरीकडे सूत्रांचे असं म्हणणे आहे की, आतापर्यंत मुख्यमंत्रिपदासाठी नाव जाहीर न करण्यामागे सत्तेचं वाटप कसं करावं याच्या चर्चा सुरू असणं हेही एक कारण आहे.

ADVERTISEMENT

2- गृहमंत्री पद आणि अनेक महत्त्वाची खाती

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार नाहीत हे आता निश्चित झालं आहे. पण त्यांना महाराष्ट्र सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्याच तोडीचं असं खातं हवं आहे. यासाठी एक असाही मार्ग आहे की, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याप्रमाणे महायुतीचे संयोजक पद निर्माण करणे. हे पद केवळ दिखाव्यापुरते असले तरी आज शिंदे यांना त्यांच्या समर्थकांमध्ये विश्वासार्हता टिकवणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. 

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये मोठ्या पदाची मागणी केल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री झाले तर त्यांना गृहमंत्रालय नक्कीच हवे आहे. महाराष्ट्रात गृहमंत्रालयाचे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. आज कोणत्याही मुख्यमंत्र्याला गृहमंत्रालयाशिवाय मुख्यमंत्री व्हायचे नाही. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी देखील गृहमंत्रालय स्वतःकडे ठेवलं आहे. यापूर्वी महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी गृहखातेही स्वतःकडे ठेवलं होतं. 

दरम्यान, आता शिंदेंनी मुख्यमंत्रिपद सोडल्याने त्यांना आणि त्यांच्या इतर मंत्र्यांना काही अत्यंत महत्त्वाची खातीही मिळण्याची शक्यता आहे.

3- मुबंई महापालिका (BMC) चे महापौर पद

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आणि सत्ता कोणत्याही राज्य सरकारपेक्षा कमी नाही. जो बीएमसीवर राज्य करतो तोच खऱ्या अर्थाने मुंबईचा राजा असतो. मुंबईत शिवसेना आपल्या सहकारी पक्षांपेक्षा ताकदवान आहे. मात्र, असं असलं तरी भाजपने महापालिका निवडणुकीत अधिक जागा जिंकल्या तरी महापौर पद हे शिंदेंच्या शिवसेनेकडे जाऊ शकतं. असाही एक करार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

4- केंद्रात महत्त्वाचं मंत्रिपद मिळण्याची शक्यता

महिलांना दरमहा पेन्शन देऊन भारतीय जनता पक्षाला चौथ्यांदा मध्य प्रदेशात विजय मिळवून देणाऱ्या शिवराजसिंह चौहान यांना सुरुवातीला मुख्यमंत्रिपद नाकारण्यात आलं. पण केंद्रात त्यांना सन्मानाने मोठं मंत्रिपद देण्यात आलं. असंच काहीसं एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत घडू शकतं. 

एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप विरोधात न जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांना देखील केंद्रीय मंत्रिमंडळात शिवराजसिंह चौहान यांच्यासारखे सन्माननीय स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT